वापरात नसलेले UPI आयडी बंद होणार

सर्वच बँका आणिPhonePe आणि Google Pay सारखे अॅप्स वापरात नसललेले यूपीआय आयडी बंद करणार आहेत. 31 डिसेंबरपर्यंत एक वर्षांहून अधिक काळ बंद असलेले UPI आयडी बंद करण्याचे निर्देश नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI नं सर्वच बँका आणि अॅपला दिले आहेत. UPI बंद करण्यापूर्वी ग्राहकांना ई-मेल आणि मॅसेजद्वारे सूचना दिली जाणार आहे. एनपीसीआयच्या या निर्णयामुळे चुकीच्या व्यवहारावर नियंण येणार असल्यानं UPI व्यवहार आणखी सुरक्षित होणार आहेत.

  • Team Money9
  • Last Updated : November 16, 2023, 15:42 IST

नमस्कार मी शामल बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत

तुमच्या UPI आयडी बाबत एक महत्वाची बातमी. सर्वच बँका आणिPhonePe आणि Google Pay सारखे अॅप्स वापरात नसललेले यूपीआय आयडी बंद करणार आहेत. 31 डिसेंबरपर्यंत एक वर्षांहून अधिक काळ बंद असलेले UPI आयडी बंद करण्याचे निर्देश नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI नं सर्वच बँका आणि अॅपला दिले आहेत. UPI बंद करण्यापूर्वी ग्राहकांना ई-मेल आणि मॅसेजद्वारे सूचना दिली जाणार आहे. एनपीसीआयच्या या निर्णयामुळे चुकीच्या व्यवहारावर नियंण येणार असल्यानं UPI व्यवहार आणखी सुरक्षित होणार आहेत.

पीएम शेतकरी सन्मान निधीचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यावेळी आठ हजार कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत.

आरबीआयनं Bajaj Finance Ltd ला eCOM आणि Insta EMI Card अंतर्गत कर्ज देण्यास मनाई केलीय. कंपनीनं डिजिटल कर्ज देण्याबाबत नियमाचं उल्लंघन केल्यानं आरबीआयनं ही बंदी घातलीय.

Tata Consultancy Services नं दोन हजार कर्मचाऱ्यांची बदली केलीय. सर्वच कर्मचाऱ्यांना नव्या ठिकाणी येत्या पंधरा दिवसात रुजू होण्याचे आदेश दिलेत. या अगोदर टीसीएसनं कर्मचाऱ्यांना किमान पाच दिवस ऑफिसमध्ये काम करण्याचा नियमही लागू केलाय

अॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्यात आलीय. गेम निर्मितीमध्ये असणाऱया 180 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. या अगोदर ही याच विभागातल्या शंभर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं.

भारतात बेरोजगारीच्या दरात घट झालीय. पंतप्रधान मुद्रा योजना आणि पीएस स्वनिधी सारख्या योजनांमुळे उद्योजकता वाढल्यानं रोजगार निर्मितीतही वाढ झालीय.

IDBI बँकेनं अमृत महोत्सवी एफडीच्या शेवटच्या तारखेत वाढ केलीय . अमृत महोत्सवी एफडीमध्ये आता 31 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येते. तसेच या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.10 टक्के दरानं व्याज मिळतो.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इतकच पाहात राहा मनी9 मराठी

Published: November 16, 2023, 15:42 IST

वापरात नसलेले UPI आयडी बंद होणार