THUMB RBI च्या या नियामुळे बँक आणि NBFC शेअर्समध्ये घसरण
नमस्कार मी शामल बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत
डिसेंबर महिन्यात तुमचं बँकेत महत्तवाचं काम असेल तर ते आत्ताच करा. येत्या चार डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत बँकांमधील कर्मचारी संपावर जाणार आहेत. बँकांमध्ये पुरेशे कर्मचाऱ्यांची मागणी,आऊटसोर्सिंग बंद करून कायम स्वरूपी नोकऱ्यांमध्ये वाढ करा या मागणीसाठी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.
केवायसी नियमांचं उल्लंघन केल्यानं आरबीआयनं Axis Bank ला 90 लाख 92 हजार रुपयांचा दंड लावलाय. तसेच अनेक ग्राहकांचा पत्ता आणि ओळखपत्रांची नोंद ठेवण्यातही Axis Bank अपयशी ठरलीय. आरबीआयनं दंड लावल्यानंतर शुक्रवारी अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये तीन टक्के घसरण झालीय.
…
व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत पुन्हा एकदा कमी करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कार्पोरेशननं नवीन किमती 16 नोव्हेंबरपासून लागू झाल्यात. मुंबईत आता व्यावसायिक सिलेंडर 1728 रुपयांना मिळणार आहे.
सोनं आणि चांदीच्या किमती पुन्हा एकदा तेजी आलीय. गुरुवारी MCX वर दहा ग्रॅम सोन्याची किंमत 61914 रुपयांवर पोहचलीय. तर सराफा बाजारात सोन्याची किमत 60505 रुपयांवर पोहचली. MCX वर प्रति किलो चांदीची किमत 73392 रुपयांवर पोहचलीय. तर सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर हा 72855 रुपयांवर पोहचला होता.
आरबीआयनं पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्सह सर्वच किरकोळ कर्ज देणाऱ्या उत्पादनाबाबत नियम कठोर केले आहेत. या नियमामुळे बँका आणि NBFC ना असुरक्षित कर्जासाठी 125 टक्के गुंतवणूक वेगळी ठेवावी लागणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या बँकेनं किंवा NBFC नं एक लाख रुपयाचं असुरक्षित कर्ज दिल्यास त्यांना त्याबदल्यात सव्वा लाख रुपये वेगळे ठेवावे लागणार आहेत. आतापर्यंत एक लाख रुपयांच्या कर्जावर एक लाखच वेगळे ठेवावे लागत होते. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँकिंग क्षेत्रातील आणि NBFC च्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
सुंगधी दूध तयार करणाऱ्या जीएसटीबाबत दिलासा मिळालाय. कंपन्यांना आता सुगंधी दुधावर फक्त पाच टक्केच GST द्यावा लागणार आहे. या अगोदर 12 टक्के जीएसटी द्यावा लागत होता. जीएसटी कमी करावा यासाठी पार्ले अॅगोनं मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुंगधी दुधावरील जीएसटी कमी करण्यात आलाय.
पुढील काही महिन्यात कांद्यानंतर आता डाळी आणि धान्यामुळे किरकोळ आणि ठोक महागाईत वाढ होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात डाळीच्या दरात 19.4 टक्के वाढ झाली आहे. तर धान्याची महागाई दोन अंकावर पोहचलीय. तसेच यंदा पाऊस कमी झाल्यानं डाळ आणि धान्याच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. तसेच रब्बीच्या लागवडीनंही वेग पकडला नाही. त्यामुळे धान्य आणि डाळींच्या दरात तेजी आलीय.
बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इतकच पाहात राहा मनी9 मराठी