SIP द्वारे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत वाढ

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

आर्थिक संकटातून सावरत असलेली पेटीएम कंपनी आता ओला आणि उबरशी स्पर्धा करणार आहे. येत्या काही दिवसात पेटीएमकडून राईड हेलिंग सेवा देण्यात येणार आहे. ही सुविधा देण्यासाठी कंपनीनं ऑटोरिक्शासोबत राई़ड हेलिंग सुविधेची चाचणी सुरू केलीय. येत्या काही दिवसात पेटीएमकंपनीकडून बंगळुरू,चैन्नईसारख्या महागनरात पेटीएमद्वारे ऑटो बुक करता येणार आहे. यासाठी पेटीएम ONDC चे सहकार्य घेत आहे. सध्या या सेवेची चाचपणी करण्यात येत आहे,तसेच कंपनीनंही अधिकृतपणे याबाबत जाहीर माहिती दिली नाही.

आता बातमी पंजाब नॅशनल बँकेची
पंजाब नॅशनल बँक भारतातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेतील लाखो ग्राहकांचं खातं बंद होण्याची शक्यता आहे. ज्या ग्राहकाच्या खात्यात गेल्या तीन वर्षांपासून व्यवहार होत नाहीत ते खातं बंद करणार असल्याची माहिती बँकेनं दिलीय. मात्र,जे खाते डिमॅटसोबत लिंक आहेत ते बंद करण्यात येणार नाहीत,असंही बँकेनं स्पष्ट केलंय .तसेच 25 वर्षांहून कमी वय असणाऱ्या विद्यार्थ्यांचे खातेही बंद केले जाणार नाहीत. तुम्हाला तुमचं खातं सुरू ठेवायचं असल्यास तात्काळ बँकेच्या शाखेशी संपर्क करा आणि केवायसी अपडेट करा.

आता बातमी म्युच्युअल फंडाची

इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ घटत आहे. एप्रिलमध्ये इक्विटी फंडातील गुंतवणुकीचा ओघ चार महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहचलाय. गुंतवणूकदारांचा स्मॉल अँड मिड-कॅप फंडांकडे ओढा कायम आहे, तसेच गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप फंडांकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतंय. इक्विटी म्युच्युअल फंडातील निव्वळ गुंतवणूक एप्रिलमध्ये 16.4 टक्क्यांची घटून 18,917 कोटी रुपये एवढी झालीय
म्युच्युअल फंड उद्योगाने मागील एप्रिलमध्ये नियोजनबद्ध गुंतवणूक म्हणजेच ‘एसआयपी’च्या माध्यमातून प्रथमच वीस हजार कोटी रुपयांवर गुंतवणूक गोळा करून आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे.

आता बातमी निर्यातीची
जगभरात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत मंदी आहे. तरीही 2023-24 या आर्थिक वर्षात 238 पैकी 115 देशांमध्ये भारताच्या निर्यातीत वाढ झालीय. एकूण निर्यातीत या देशांचा 46.5 टक्के वाटा असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं दिलीय. अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, चीन, ब्रिटन, सौदी अरब, सिंगापूर, बांगलादेश, जर्मनी आणि इटली या प्रमुख देशांमध्ये भारतातून निर्यात होत आहे. भारताची एकूण निर्यात यात वस्तू आणि सेवा मिळून गेल्या आर्थिक वर्षात उच्चांकी पातळीवर पोहोचली. जागतिक पातळीवर आव्हानानंतरही निर्यात 778.2 अब्ज डॉलरवर पोहोचली.

Published: May 10, 2024, 15:22 IST

SIP द्वारे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत वाढ