पुण्यातील एका खासगी कंपनीत सौरभ सेल्स मॅनेजर म्हणून करत होता. त्याला पगारही व्यवस्थित मिळत होता. दुर्देवानं एके दिवशी ऑफिसहून घरी जाताना त्याचा अपघात झाला. पाय फ्रॅक्चर झाल्यानं गेल्या सहा महिन्यांपासून तो घरीच आहे. अपघातानंतर नोकरी गेल्यानं संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलंय.
देशातील अपघातांच्या प्रमाणात झपाट्यानं वाढ होतेय. 2022 मध्ये संपूर्ण देशभरात 4 लाख 61 हजार अपघातात 1 लाख 68 हजार लोकांचा मृत्यू झालाय तर 4 लाख 45 हजार जण जखमी झाले, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं दिलीय. 2021 ची तुलना केल्या रस्ते अपघातात 12 टक्के वाढ झालीय.
सौरभप्रमाणेच कुणालाही अपघातासारख्या दुर्देवी घटनाचा सामना करावा लागू शकतो. ड्रायव्हिंग करणाऱ्याचेच अपघात केवळ. रस्तावरून चालणाऱ्या व्यक्तीही अपघातात बळी पडत आहेत. अशा वेळी अपघाताच्या जोखिमेपासून संरक्षण मिळवण्यासाठी वैयक्तिक अपघात विमा हा एक चांगला पर्याय आहे. संकटकाळात वैयक्तिक अपघात विमा तुमच्या मदतीला येतो.
वैयक्तिक अपघात विमा :
अपघाता विम्यात पॉलिसीधारकाचा मृत्यू, कायमस्वरूपी, तात्पुरता किंवा अंशत: अपंगत्वाच्या जोखिमेपासून संरक्षण मिळते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर वारसाला विम्याची रक्कम मिळते. अपघातातील अपंगत्व किती टक्के आहे यावर विम्याची रक्कम अवलंबून आहे. . कायमस्वरूपी अपंगत्वानंतर अनेक कंपन्या 10 ते 20 वर्षे दरमहा नियमित उत्पन्न देतात. काही कंपन्या नियमित उत्पन्नाशिवाय मुलांचे शिक्षण, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाईचा खर्च देखील देतात.
अपघात विमा मुख्यत: तीन प्रकारचा असतो. पहिला आयुर्विमा. टर्म विमा आणि इतर पारंपारिक विम्यात अपघात विमा हा रायडरच्या स्वरूपात असतो. दुसरा म्हणजे सध्या बहुतांमश कंपन्या कर्मचाऱ्यांना सामूहिक अपघाता विम्याची सुविधा देतात. तिसरा म्हणजेच सर्वच विमा कंपन्या विविध अपघात विमा पॉलिसीची विक्री करत आहेत. अपघात विमा पॉलिसीमध्ये सर्वच जोखिमांपासून संरक्षण मिळतं.
इतर विम्याच्या तुलनेत अपघाती विम्याचा हप्ता कमी असतो. तुमचं वय, व्यवसाय आणि आजारावर अपघाती विम्याचा हप्ता ठरवण्यात येतो. कीटकनाशकं किंवा रासायनिक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना जास्त हप्ता द्यावा लागतो. अपघाती विम्यात साधारणपणे एक लाखाला 140 रुपयांचा हप्ता द्यावा लागतो. उदाहरणार्थ 20 लाखांच्या अपघाती विम्यासाठी वार्षिक 2,800 रुपयांचा हप्ता भरावा लागतो.
अपघाती विम्याची विक्री विमा कंपन्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं करत आहेत. पॉलिसी बाजासारख्या वेबसाईटवरूनही अपघाती विमा खरेदी करता येतो. अपघाती विमा खरेदी करताना विमा एजन्टचीही मदत घेऊ शकता. मुदत विम्याप्रमाणेच अपघाती विम्यात विमा संरक्षण निवडावं. अपघाती विम्यात तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या दहा पट किमान विमा संरक्षण असावं.
विमाधारकाच्या चुकीमुळे अपघात झाल्यास कंपन्या दावा मंजूर करत नाहीत.तसेच दंगलीत झालेल्या जखमींना,युद्धातील जखमी आणि मृतांना तसेच जन्मजात अपंगत्वाला विम्याचे संरक्षण मिळत नाही. नशा करून दुर्घटनेत बळी गेल्यास कंपन्या विम्याचा दावा मंजूर करत नाहीत. तसेच साहसी खेळात अपंगत्व आल्यास विम्यासाठी दावा करता येत नाही.
दुर्घटनेचं संकट कुणावरही आणि कधीही ओढावू शकतं. त्यामुळे कमावत्या व्यक्तीनं मुदत विम्यासोबतच अपघाती विमा घ्यावा. या प्रकरणात ग्रुप विमा अथवा रायडरवर अवलंबून राहू नये. वैयक्तिक विमा पॉलिसी घेणं फायद्याचे आहे. विविध विमा पॉलिसीमुळेच संकटकाळात तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते.असा सल्ला पर्सनल फायनान्स एक्सपर्ट जितेंद्र सोळंकी यांनी दिलाय. काही कंपन्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीसोबतच पत्नी आणि मुलांनाही विम्याचे संरक्षण देतात. अतिरिक्त हप्ता भरल्यानंतर अशा पॉलिसीमध्ये पत्नीला मूळ पॉलिसीधारकाच्या 50 टक्के आणि मुलांना 25 ते 30 टक्क्यांपर्यंत विमा संरक्षण मिळतं,अशी माहितीही सोळंकी यांनी दिलीय. अद्याप तुम्ही अपघाती विमा पॉलिसी घेतली नसल्यास तात्काळ घ्या. सौरभसारखी चूक तुम्ही कधीही करू नका. तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसतो.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App