बँकांच्या Credit To Deposit रेशोमध्ये वाढ php // echo get_authors();
?>
भारतातल्या बँकांच्या क्रेडिट टू डिपॉजिट रेशोमध्ये वाढ झाली आहे. मागच्या वर्षी हा आकडा ७२.२२% होता. मात्र, कर्जाची मागणी वाढल्याने क्रेडिट टू डिपॉजिट रेशो ७५.८% टक्यापर्यंत वाढला आहे.
आरबीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातल्या बँकांच्या क्रेडिट टू डिपॉजिट रेशोमध्ये वाढ झाली आहे. मागच्या वर्षी हा आकडा ७२.२२% होता. मात्र, कर्जाची मागणी वाढल्याने क्रेडिट टू डिपॉजिट रेशो ७५.८% टक्यापर्यंत वाढला आहे. बँकांनी दिलेल्या कर्जामध्ये १६% वाढ झाली असून, त्या तुलनेत बँकांनी जमा केलेल्या डिपॉजिटमध्ये केवळ ९ ते १० टक्याची वाढ झाली आहे. महागाईमध्ये झालेल्या वाढीमुळे लोकांकडे गुंतवणुकीसाठी अतिरिक्त असणारा पैसा कमी झाला आहे. त्यामुळे, डिपॉजिट बेसमध्ये अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाली आहे. येणाऱ्या काळात, क्रेडिट टू डिपॉजिट रेशोमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून, यामुळे, बँकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.
Published: April 12, 2023, 13:52 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App