पैशाची गरज कोणालाही कधीही पडू शकते. ही पैशांची गरज आपण घर गहाण ठेऊन , दागिने गहाण ठेऊन पूर्ण करतो. पण वाहन गहाण ठेऊन देखील आपल्याला ही गरज पूर्ण करता येते. ती कशी , याबद्दल माहिती घेऊया
वाहनावर कर्ज मिळते हे ऐकून तुम्हाला पटणार नाही पण हो वाहनांवर कर्ज मिळू शकते. ज्या प्रकारे मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज मिळते तसेच वाहन गहाण ठेऊन देखील कर्ज मिळते. याला लोन अगेंस्ट कार असे देखील म्हणतात. तुमच्या जुन्या कारवर किती आणि कसे कर्ज मिळेल ? हा पर्याय किती योग्य आहे ? हे कर्ज कधी घेऊ शकतो ? कर्जाच्या स्वरूपात किती रक्कम मिळेल? हे आता जाणून घेऊया.
वाहनकर्जासाठी वयोमार्यादा : हे लोन सिक्युअर्ड लोन आहे. यामध्ये तुमची गाडी गॅरंटी म्हणून भूमिका बजावते. ही प्रक्रिया सोपी असून तत्काळ पैशांची गरज असेल तर हा पर्याय योग्य आहे. 21 वर्षापेक्षा अधिक आणि 70 वर्षापेक्षा कमी वय असेलेली व्यक्ति या कर्जासाठी अर्ज करु शकतात. पगारदार व्यक्तीसाठी ही मर्यादा 60 वर्ष आहे .
हे कर्ज कसे मिळते :
अनेक बँका आणि NBFC कारच्या बदल्यात कर्ज देऊ करतात. या वेबसाइटवर जाऊन किंवा बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज करता येतो. अर्ज दाखल केल्यानंतर बँक किंवा संस्थांकडून कारचे व्हॅल्यूएशन केले जाते. सहसा कारच्या व्हॅल्यूची 50 ते 150 % पर्यंत कर्ज मिळू शकते. आता हे समजून घेऊया.
समजा कारवर कर्ज घेतले तर बँक त्याच्या कारचे व्हॅल्यूएशन करेल. ही व्हॅल्यू 5 लाख रु. पर्यंत निघाली तर मनोजला अडीच लाख ते साडेसात लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
कर्जाची रक्कम ठरवताना बँक किंवा NBFC तुमचे उत्पन्न, सध्याच्या लोनची परतफेड आणि क्रेडिट हिस्ट्री तपासतात. कर्ज फेडण्याचा कालावधी 12 महीने ते 84 महीने इतका असतो. काही वेळेस हा कालावधी जास्त देखील असू शकतो. याव्यतिरिक्त आर्थिक संस्था 1 ते 3 % पर्यंत प्रोसेसिंग फीदेखील वसूल करतात. तसेच कर्जाचा कालावधी पूर्ण होण्याआधी कर्ज चुकवल्यास तुमच्याकडे फॉरक्लोजर चार्ज देखील मागितला जातो.
कर्ज किती मिळते :
कारच्या बदल्यात कर्ज घेतल्यास व्याजदर 14 ते 18 % पर्यंत असतो. IDFC फर्स्ट बँकेचे व्याजदर 14.9 % आणि HDFC बँकेचे व्याज दर 13.75 % पासून सुरू होतात. HDFC बँक पर्सनल लोनच्या तुलनेत 2 % कमी दराने कर्ज देण्याचे सांगते. वेगवेगळ्या आर्थिक संस्थांचे व्याजदर वेगवेगळे असतात. गरजेच्या वेळेत एखाद्या एखाद्या साधनाच्या मोबदल्यात कर्ज घेणे हे आपले ठरवलेली गुंतवणूक तोडण्यापेक्षा चांगला पर्याय आहे.
कर्ज कोणाला मिळत नाही :
सहसा 10 वर्षांपेक्षा कमी जुनी कार असेल तर कर्ज दिले जाते. यापेक्षा जुनी कार असेल तर कर्ज दिले जात नाही. त्याचप्रमाणे सर्व सरकारी परवानग्या नसतील तरीही कर्ज मिळत नाही. तसेच व्यावसायिक म्हणजे पिवळी नंबर प्लेट असलेली कार असेल तरीही कर्ज घेण्यास अडथळे येतात.
कार अगेंस्ट लोन म्हणजे काय ? हे तर आता तुम्हाला समजले असेलच. परंतु कर्ज घेतल्यानंतर बँक तुमची गाडी स्वतःच्या ताब्यात घेईल का ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तसे नाही. जोपर्यंत तुम्ही कर्जाचे हप्ते भरत राहाल तोपर्यंत कार तुमच्याकडेच राहील. परंतु हप्ते भरले नाहीत तर कार जप्त करण्याचा अधिकार बँकेला असतो. या प्रकारचे कर्ज घेण्याआधी सर्व बँकांचे आणि आर्थिक संस्थांचे व्याज दर आणि रीपेमेंटच्या अटी आणि नियमांची तुलना करा. बँकेमध्ये बोलून व्याज दर कमी करण्याचा प्रयत्न करा. घाई-गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App