• English
  • हिन्दी
  • ગુજરાતી
  • বাংলা
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • money9
  • विमा
  • बचत
  • शेअर मार्केट
  • कर्ज
  • गुंतवणूक
  • ट्रेंडिंग
  • Breaking Briefs
downloadDownload The App
Close
  • Home
  • Shows
  • Podcast
  • कर
  • Money Time
  • म्युच्युअल फंड
  • सोने
  • स्टॉक
  • Exclusive
  • Breaking Briefs
  • विमा
  • बचत
  • शेअर मार्केट
  • कर्ज
  • गुंतवणूक
  • म्युच्युअल फंड
  • बांधकाम व्यवसाय
  • कर
  • ट्रेंडिंग
  • Home / कर्ज }

 महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची ९.३९ टक्के दराने होणार परतफेड  

रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील

  • Team Money9
  • Last Updated : October 20, 2023, 18:23 IST
  • Follow
  • Follow

राज्य शासनाने वित्त विभागाच्या १४ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या अधिसूचनेनुसार ९.३९ टक्के दराने घेतलेल्या महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ अदत्त शिलक्क रकमेची १९ नोव्हेंबर  २०२३  पर्यंत देय असलेल्या व्याजासह २० नोव्हेंबर २०२३ रोजी  सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे सचिव शैला ए. (वित्तीय सुधारणा) यांनी  प्रसिध्दीस दिलेल्या  पत्रकान्वये कळविले आहे.

             “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर २० नोव्हेंबर, २०२३ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही,

            सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ९.३९ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे   यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत. भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे. रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील,असे प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

Published: October 20, 2023, 18:23 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App    

  • finance
  • money

Related

  • सुरक्षित कर्ज की असुरक्षित कर्ज ? कर्ज घेण्यासाठी कोणता पर्याय योग्य ?
  • कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ‌ स्थापनेबाबत सरकार सकारात्मक
  • गृहकर्ज कराराची कागदपत्रे लक्षपूर्वक वाचा
  • कर्जावर फोन घेणं किती महागात पडेल ?
  • HOMELOAN REPAYMENT गृहकर्जाचे ओझे लवकर कसे कमी करावे ? : जाणून घ्या काही सोप्या टिप्स
  • कर्जासाठी आता पर्याय फ्लोटिंग आणि फिक्स दरांचा

Latest

  • 1. Retirement साठी या फंडमध्ये गुंतवणूक करा
  • 2. डेअरी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?
  • 3. म्युच्युअल फंडसाठी 3 स्ट्रॅटेजी !
  • 4. Tokenizationमुळे बँकिंग व्यवहार सुरक्षित
  • 5. आरोग्य विमा घेताना हे लक्षात घ्या
  • Trending Stories

  • Retirement Planning साठी या फंडमध्ये गुंतवणूक करा
  • डेअरी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?
  • म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी 3 स्ट्रॅटेजी !
  • Tokenization मुळे बँकिंग व्यवहारांची सुरक्षितता वाढणार
  • कांदानिर्यात, उसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी मार्ग काढणार
  • TV9 Sites

  • TV9Hindi.com
  • TV9Telugu.com
  • TV9Marathi.com
  • TV9 Gujarati
  • TV9 Kannada
  • TV9 Bangla
  • News9 Live
  • Trends9
  • Money9 Sites

  • Money9 Hindi
  • Money9 English
  • Money9 Marathi
  • Money9 Telugu
  • Money9 Gujarati
  • Money9 Kannada
  • Money9 Bangla
  • Topics

  • विमा
  • बचत
  • कर्ज
  • स्टॉक, शेअर
  • म्युच्युअल फंड
  • बांधकाम व्यवसाय
  • कर
  • क्रिप्टो
  • ट्रेंडिंग
  • Follow us

  • FaceBook
  • Twitter
  • Youtube
  • Instagram
  • Linkedin
  • Download App

  • play_store
  • App_store
  • Contact Us
  • About Us
  • Advertise With Us
  • Privacy & Cookies Notice
  • Complaint Redressal
  • Copyright © 2023 Money9. All rights reserved.
  • share
  • Facebook
  • Twitter
  • Whatsapp
  • LinkedIn
  • Telegram
close