रितेशला कोविड काळात बिझनेसमध्ये खूप लॉस झाला. बिझनेस चालवण्यासाठी त्याने कर्ज घेतलं होतं. आता व्यवसाय सुरळीत चालू झाला आहे, पण कर्जाचा EMI खूप जास्त आहे. म्हणून गावाकडची शेतजमीन विकून कर्ज फेडून टाकू, असा निर्णय रितेशने घेतला आणि त्याची शेतजमीन विकली.. मिळालेल्या पैशातून कर्ज फेडू आणि टेन्शन फ्री होऊ, अश्या विचारात असतानाच त्याचा मित्र त्याला सांगतो कि तुला जमीन विक्रीतून मिळालेल्या पैशावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल
रितेशसारखे अनेक लोक आहेत, जे पैशाची गरज आहे म्हणून आपली शेतजमीन विकतात. पण यावर किती टॅक्स भरावा लागेल, हे त्यांना माहित नसतं. शेतजमीन विकल्यावर किती कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो आणि हा टॅक्स वाचवायचा असेल तर काही मार्ग आहे का, ते आता जाणून घेऊया. शेती जमीन दोन प्रकारची असते. पहिली ग्रामीण भागातील शेतजमीन… आणि दुसरी शहरी भागातील शेतजमीन… शेतीमध्ये वापरल्या जाणार्या प्रत्येक जमिनीचा तुकडा आयकर कायद्याच्या दृष्टीने शेतजमीन मानला जात नाही… तुमची जमीन आयकर कायद्यानुसार शेतजमीन असायला पाहिजे. इन्कम टॅक्स कायद्याच्या सेक्शन 2 (14) मध्ये नमूद केलेल्या अटींचे पालन होतं असेल, तरच ती जमीन शेतजमीन मानली जाते.
उदाहरणार्थ… – जर शेतजमीन नगरपालिका, टाउन एरिया कमिटी किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये येत असेल, आणि तिथे लोकसंख्या 10,000 किंवा त्याहून अधिक असेल, तर ही जमीन शेतजमीन मानली जाणार नाही.. जर नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डची लोकसंख्या 10 हजारांपेक्षा जास्त आणि 1 लाखांच्या आत असेल, तर नगरपालिका क्षेत्रापासून 2 किलोमीटरच्या रॅडियसमध्ये येणारी जमीन शेतजमीन नसेल… जर पालिकेची किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डची लोकसंख्या 1 लाख ते 10 लाखांपर्यंत असेल, तर सर्व बाजूंनी 6 किलोमीटरच्या रेडियसमध्ये येणारे क्षेत्र शेतजमीन म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. त्याचप्रमाणे, नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंटमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर, तर 8 किलोमीटरपर्यंतच्या रेडियसमध्ये असलेली जमीन शेतजमीन म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही…
आता कोणत्या जमिनीच्या विक्रीवर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल, ते जाणून घेऊया.
इन्कम टॅक्स कायद्यानुसार रितेशची जमीन शेतजमीन नाहीये. ती जर शेतजमीन असती, तर त्याला काहीच टॅक्स भरावा लागला नसता. पण आता त्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. त्याने जमीन घेऊन 2 वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असेल तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. हा टॅक्स त्याच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार असेल. जर जमीन घेऊन 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर नफ्यावर त्याला 20% कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. मात्र, रितेश यामध्ये इंडेक्सेशनचा लाभ घेऊ शकतो. जर त्याने दुसरी शेतजमीन खरेदी केली तर त्याला सेक्शन 54 बी अंतर्गत कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र, जमीन विकल्यानंतर दोन वर्षांच्या आत शेतजमीन खरेदी करणं आवश्यक आहे. दुसरी शेतजमीन ही ग्रामीण किंवा शहरी शेतजमीन असू शकते…तसेच नवीन शेतजमीन 3 वर्षांच्या आत विकता येणार नाही. 3 वर्षाच्या आधीच नवीन शेतजमीन विकली तर जुन्या शेतजमिनीवर मिळालेला टॅक्स बेनिफिट काढून घेतला जाईल.
शेतजमीन विकून मिळालेल्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स वाचवायचा असेल, तर निवासी मालमत्ता किंवा प्लॉट खरेदी करून, सेक्शन 54 F अंतर्गत टॅक्स वाचवता येईल, अशी माहिती टॅक्स एक्सपर्ट बळवंत जैन यांनी दिली आहे. जमीन विकल्यानंतर 2 वर्षाच्या आत नवीन घर किंवा प्लॉट खरेदी करावा लागेल. प्लॉट घेतला तर त्यावर 3 वर्षाच्या आत घर बांधले पाहिजे, अशी माहिती बळवंत जैन यांनी दिली आहे. तसेच, कॅपिटल गेन बॉण्डमध्ये गुंतवणूक करून सेक्शन 54 EC अंतर्गत टॅक्स वाचवता येईल. मात्र, आर्थिक वर्ष 2023-24 पासून, सेक्शन 54 F अंतर्गत, केवळ 10 कोटी रुपयांपर्यंतच्या लॉन्ग टर्म कॅपिटल गेनवर टॅक्स बेनिफिट मिळणार आहे. 10 कोटींपेक्षा जास्त कॅपिटल गेनवर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App