अनेक जण घर खरेदीकरताना बांधकामाचा दर्जा न पाहता केवळ बजेट आणि लोकेशनवर लक्ष देतात. काही दिवसांपूर्वी चिंटल सोसायटीमध्ये बिल्डिंगचा भाग कोसळल्याने 2 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ऑडिटमध्ये काही टॉवर हे राहण्यासाठी सुरक्षित नसल्याचे आढळून आले. तुमच्या कष्टाच्या कमाईचे नुकसान होऊ नये यासाठी घर खरेदीआधी कन्स्ट्रक्शनची क्वालिटी तपासणे गरजेचे आहे. आता खराब बांधकामाची तक्रार कोणाकडे आणि कशी करावी हे जाणून घेऊया.
घर किंवा फ्लॅट बुक करण्याआधी थोडी पाहणी केली तर तुम्हाला समस्या येणार नाहीत. बुकिंग करण्याआधी तुम्ही प्रोजेक्ट साईटवर जाऊन कॉंक्रिट आणि इतर कामासंबंधी जाणून घ्या. तसेच तिथे असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनियरकडून कन्स्ट्रक्शन क्वालिटी सर्टिफिकेट मागू शकता. घर खरेदीदार बिल्डरचे जून प्रोजेक्ट पाहू शकतात. तसेच तिथे राहणाऱ्या लोकांकडून तुम्ही तिथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दल माहिती घेऊ शकता. बिल्डर किंवा स्थानिक प्राधिकरणांकडून कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि ऑक्युपेन्सि सर्टिफिकेट दाखवायला सांगू शकता. या कागदपत्रामुळे प्रकल्प कायद्यानुसार बांधण्यात आला की नाही याची माहिती मिळते.
प्रॉपर्टी ताब्यात घेताना फिनिशिंग, किचन बाथरूम फिटिंग्स, टाईल्ससहित ज्यामध्ये खराबी वाटत असेल ते स्नॅग लिस्टममध्ये समाविष्ट करा. हे सर्व बिल्डरला सांगून ठीक करू शकता. कस्ट्रक्शन क्वालिटी तपासण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनियरची मदत घेऊ शकता. बिल्डिंग लेआऊट आणि डिझाईनपासून बिल्डिंग मटेरियल तपासून कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे हे तपासू शकता. जुने घर खरेदी करताना स्ट्रक्चरल इंजिनियरकडून त्या घराची तपासणी नक्की करून घ्या.
रियल इस्टेट रेग्युलेटरी अॅक्ट म्हणजे RERA ने कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये महत्वाच्या सुधारणा करण्यास सहाय्य होते. बिल्डरकडून ज्या सुविधा मिळतील असे सांगितले नंतर तो पलटू नये यासाठी त्या सर्व सुविधांचा उल्लेख बिल्डर बायर अॅग्रीमेंटमध्ये करावा.
रेरा कायदा 14 (3) मध्ये सांगितल्यानुसार 5 वर्षांच्या आत स्ट्रक्चरल डिफेक्ट , काम, गुणवत्ता आणि सर्व्हिसशी अशा अडचणी आल्या तर त्या सर्व बिल्डरला 30 दिवसांच्या आत ठीक करून द्याव्या लागतात. ठराविक कालावधी या समस्या दूर नाही झाल्या तर घर खरेदीदाराला नुकसान भरपाई द्यावी लागते.
जर एखाद्या प्रकल्पाचा रियल इस्टेट एजंट रियल इस्टेट रेग्युलेशन अॅक्टच्या नियमांचे उल्लंघन केले तर संबंधित राज्याची रियल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटि म्हणजे RERA मध्ये तक्रार दाखल करू शकता. घर खरेदीदार रेरा व्यतिरिक्त कंज्यूमर कोर्टामध्ये खराब कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दल तक्रार दाखल करू शकतात.
रेरामध्ये तक्रार कशी दाखल करावी: घर खरेदीदार ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे तक्रार दाखल करू शकतो. यासाठी RERA च्या वेबसाइटवर जाणून complaint सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन तक्रार करू शकता. तसेच Form-M भरुन रेराच्या कार्यालयात तक्रार दाखल करता येते. यासाठी 1000 रुपये शुल्क भरावे लागते.
कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दल तुमची तक्रार असेल तर आधी याबद्दलची तक्रार बिल्डरकडे करा. जर बिल्डर तुमची तक्रार ऐकून घेत नसून तर रेरामध्ये तक्रार करू शकता. रेरा घराच्या दुरुस्तीसोबतच बिल्डरकडून देखील तुम्हाला नुकसान भरपाई देण्याचा आदेश मिळू शकतो.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App