गुंतवणुकीसाठी सध्या अनेकजण पर्याय शोधत आहेत. ज्याना गुंतवणूक करून अधिक पैसे जमा करायचे आहेत त्यांच्यासाठी आता किसान विकास पत्र योजना हा एक चांगला पर्याय आहे.बँकांच्या मुदत ठेवींच्या म्हणजे FDतील व्याजदरातील चढउतारांमुळे या योजनेचे आकर्षण आणखी वाढले आहे.सध्या KVP ला बँक FD पेक्षा एक टक्का जास्त व्याज मिळत आहे.
नोकरी व्यवसाय आणि शेतीशी संबंधित लोक त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी अल्प भांडवलाने किसान विकास पत्र खरेदी करतात. मोठ्या संख्येने लोक आपल्या मुलांच्या लग्नाच्या उद्देशाने या योजनेत गुंतवणूक करतात. दीर्घ कालावधीसाठी निश्चित व्याज उत्पन्न यामुळे या योजनेचे आकर्षण अधिक वाढले आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी किसान विकास पत्रे कठीण प्रसंगी खूप उपयुक्त ठरतात.जेव्हा शेतीसाठी खते आणि बियाणांसाठी पैशांची गरज असते तेव्हा KVP योजना उपयुक्त ठरते . ही पत्रे तारण ठेवून कर्ज सहज मिळते.
किती व्याज मिळते ? KVP मध्ये गुंतवणूक केल्यास ही रक्कम 115 महिन्यांत म्हणजे नऊ वर्षे आणि सात महिन्यांत दुप्पट होईल. सध्या या योजनेवर वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळत आहे, जे बँक एफडीपेक्षा खूप चांगले आहे. यामध्ये मॅच्युरिटी आणि व्याजदर अशा प्रकारे समायोजित केले गेले आहेत की मॅच्युरिटीच्या वेळी गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होईल. अशा प्रकारे KVP मध्ये गुंतवलेले 1000 रुपये हे 115 महिन्यांत दुप्पट होतील.
5 वर्षांच्या FD वरील व्याज बँक ऑफ बडोदा 6.50% SBI 6.50% कॅनरा बँक 6.70% अॅक्सिस बँक 7.00 % HDFC बँक 7.00 %
गुंतवणूक कशी करावी ? KVP मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये देखील उपलब्ध आहे . कोणतीही प्रौढ व्यक्ती KVP मध्ये गुंतवणूक करू शकते. हे प्रमाणपत्र दोन व्यक्ती संयुक्तपणे खरेदी करू शकतात. पालक देखील त्यांच्या मुलाच्या नावावर KVP मध्ये गुंतवणूक करू शकतात. अनिवासी भारतीयांना या योजनेत गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. KVP मध्ये किमान रु 1000 ची गुंतवणूक केली जाऊ शकते. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.
प्रीपेमेंटची सुविधा : अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी सरकारने ही अल्पबचत योजना सुलभ अटींसह तयार केली आहे. जर एखाद्या व्यक्तीला मुदतपूर्तीपूर्वी पैशांची गरज असेल तर ही रक्कम अडीच वर्षांनी काढता येते. तसेच या स्थितीत व्याजात काही कपात केली जाते. कपातीचा दर हा गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून असतो. बँका आणि इतर वित्तीय संस्था देखील KVP वर कर्ज सुविधा देतात.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App