सणासुदीच्या काळात तुम्हीही मुदत ठेव करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एफडीवर अधिक व्याज मिळवू शकता. आज एफडीवरील व्याज दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत जास्त आहे. एफडीमध्ये गुंतवणूक करणे ही बहुतेक लोकांची पहिली पसंती असते. तुम्हाला चांगला परतावाही मिळतो. अनेक बँका एफडीवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत. या बँकांबद्दल जाणून घेऊया.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 9.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्के व्याज देत आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँक सामान्य लोकांना 8.10 टक्के आणि दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 8.80 टक्के व्याज देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
ही बँक 999 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 8.51 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.76 टक्के व्याज देत आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून 560 दिवसांच्या एपडीवर सर्वसामान्यांना 8.00 टक्के व्याज दिले जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 8.75 टक्के व्याज मिळत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 700 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 8.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.75 टक्के व्याज देत आहे.
Published: November 3, 2023, 12:00 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App