Imagica Entertainment शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी?

भारतातील सर्वात मोठा रोलर कोस्टर आपल्या मुंबई जवळ म्हणजे खोपोलीमध्ये आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर इमॅजिका वर्ल्ड हे अम्युसमेंट पार्क आहे. इमॅजिका एंटरटेनमेंट लिमिटेड ही कंपनी हे अम्युसमेंट पार्क ऑपरेट करते.

इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट लिमिटेडमध्ये किंवा IEL हे एक अम्युसमेंट पार्क ज्यामध्ये थीम पार्क, वॉटर पार्क, स्नो पार्क आणि नोवोटेल नावाचं 5-स्टार हॉटेल आहे.
हे सर्व खोपोली, महाराष्ट्र येथे एकाच ठिकाणी 132 एकरमध्ये पसरलेलं आहे. दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे मालपाणी ग्रुपने नुकतीच ही कंपनी विकत घेतली आहे. IEL चा व्यवसाय एप्रिल 2011 मध्ये सुरू झाला आणि 2013 पासून थीम पार्कचूकही भाग चालू झाला… नोव्हेंबर 2013 पासून थीम पार्कचं पूर्ण कामकाज सुरू झाले… तर वॉटर पार्कचे काम ऑक्टोबर 2014 पासून चालू झाले… 116 खोल्यांसह नोवोटेल हॉटेलचा पहिला टप्पा सप्टेंबर 2015 मध्ये चालू झाला आणि उर्वरित 163 खोल्यांचा दुसरा टप्पा सप्टेंबर 2018 पासून चालू झाला. याशिवाय एप्रिल 2016 पासून स्नो पार्कचे काम चालू झाले. याव्यतिरिक्त, IEL नोवोटेल इमॅजिका नावाचं 5 स्टार हॉटेल चालवते जे प्रीमियम मीटिंग रूम सुविधा, दिवसभर जेवणाचे पर्याय, 4 F&B आउटलेट्स आणि इमॅजिका थीमसह 287 खोल्यांचे प्रीमियम लक्झरी रिसॉर्ट आहे. हे पार्कच्या शेजारी आहे.

इमॅजिका थीम पार्क हे 6 थीम-आधारित झोनमध्ये पसरलेले भारतातील अशा प्रकारचं एकमेव अम्युसमेंट पार्क आहे.

यामध्ये बोट राइड, VFX शो, भारतातली सर्वात मोठा रोलर कोस्टर, बुफे आणि जैन रेस्टॉरंटसह अनेक F&B आउटलेट, बार, ग्रिल, कॅफे यांचा समावेश आहे. आणि तिथे अनेक किऑस्क उपलब्ध आहेत. 2016 मध्ये, इमॅजिका स्नो पार्क उघडण्यात आले, जे एक स्नो वर आधारित इनडोअर थीम पार्क आहे. हे पार्क 15,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे…या स्नो पार्कमध्ये बास्केटबॉल, स्लाईड्स, लहान हायकिंग ट्रेल, प्ले एरिया आणि तीन कॅफे आहेत. इमॅजिकाचा ग्रीन फील्ड प्रकल्प देखील आहे आणि कंपनीने डिफेंडर फिल्ट्रेशन सिस्टम किंवा DFS नावाची सर्वोत्तम पायाभूत सुविधा वॉटर री-सायकलिंग मेकॅनिझमसाठी तैनात केली आहे…कंपनीने वॉटर पार्क राइड्स आणि पूल वॉटर फिल्टरेशनसाठी हा DFS स्थापित केला आहे जो खूप प्रगत आहे आणि हे नेपच्यून बेन्सन-यूएसए या कंपनीचं पेटंट आहे. एप्रिल 2015 मध्ये IPO आल्यापासून, कंपनीने व्यवसायवाढीसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं होतं… नंतर, 2020 मध्ये कोविड महामारीचा IEL च्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला… परिस्थिती अशी होती की मार्च 2021 पर्यंत एकूण कर्जाची रक्कम 1417 कोटींपर्यंत वाढली. पुढच्या दोन वर्षात, परिस्थिती आणखी बिकट झाली कारण सरकारने लॉकडाउन जाहीर केला, त्यामुळे कंपनीचा तोटा आणखी वाढला. परंतु 30 ऑगस्ट 2021 रोजी, बँकांनी मालपाणी पार्क्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात MPPL च्या डेट रिजोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली… यामुळे, कंपनीवर 800 कोटींच्या वर असणारं कर्ज आर्थिक वर्ष 2024 च्या शेवटपर्यंत 50 कोटींपर्यंत खाली येईल.

 

एक कर्जाच्या समस्या बाजूला ठेवली तर, इमॅजिकाने अतिशय वाजवी खर्चात खूप चांगली मालमत्ता तयार केली आहे, जी आज बांधायची असेल तर किमान 5-10 पट जास्त पैसे लागतील.

दरडोई उत्पन्नात वाढ, वाढते शहरीकरण आणि सरकारकडून होणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे इमॅजिकाचा व्यवसाय अतिशय वेगाने वाढण्याची शक्यता आहे. IEL ने आर्थिक वर्ष 2023 मध्ये अतिशय मजबूत निकाल जाहीर केले आहेत…कंपनीचं उत्पन्न 3.5 पटीने वाढला आहे आणि ऑपरेटिंग नफा जवळपास 3 पटीने वाढला आहे…तर या कालावधीत कंपनी तोट्यातून नफ्यात आली आहे… मागच्या वर्षी लॉस झाल्यामुळे, कंपनीला वन टाइम टेक्स बेनिफिट मल्लाला आहे. हा टॅक्स बेनिफिट काढून टाकला तरी कंपनीने जवळपास 161 कोटींचा नफा कमावला आहे. या कालावधीत, कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 38.2% होते, जे FY20 च्या तुलनेत 23.9% अधिक आहे…. ऑपरेटिंग मार्जिनमध्ये आणखी सुधारणा करण्याचा कंपनीचा विचार आहे…तसेच, नोव्होटेल रिसॉर्टचा ऑक्युपन्सी रेशो आता 75% च्या वर गेला आहे जो काही वर्षांपूर्वी 55% होता. -60%…विकेंडला या रिसॉर्टमध्ये भरपूर गर्दी असती. इमॅजिकाचे बिझनेस मॉडेल मजबूत आहे आणि डेट रिझोल्यूशन प्लॅनच्या अंमलबजावणीनंतर, कंपनीवर असणारा कर्जाचा बोजा बऱ्यापैकी कमी झाला आहे…प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजच्या मते, FY23 पासून पुढील 3 वर्षांपर्यंत नफ्यात 55-60% CAGR वाढ होईल. व्यवसायवाढीसाठी लागणारं भांडवल कंपनी स्वतःच्या कमाईतून खर्च करेल, त्यामुळे नवीन कर्ज घेण्याची गरज नाहीये.

Published: November 20, 2023, 18:12 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App