आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

कोणत्या ऍसेटमध्ये गुंतवणूक सुरक्षित राहील. कोणता ऍसेट चांगला आहे, यावर आपण बराच विचार करतो, पण आपला आर्थिक सल्लागार चांगला आहे का किंवा चांगला आर्थिक सल्लागार कसा शोधायचा याचा आपण विचार करत नाही. आर्थिक सल्लागार का महत्त्वाचा आहे आणि त्याची निवड करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, ते आता जाणून घेऊया.

विष्णू त्याच्या आर्थिक सल्लागाराशी फोनवर बोलत होता.

सध्या मार्केट खाली येत आहे, त्यामुळे शेअर्समध्ये गुंतवणूक करा. तुम्हाला चांगला परतावा मिळेल, असं आर्थिक सल्लागार विष्णूला म्हणाला. पण कोणतया शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आणि या शेअर्समध्ये किती रिटर्न मिळेल, असा प्रश्न विष्णूने आर्थिक सल्लागाराला विचारला. त्यानंतर, विष्णू आणि विपुल या संदर्भात चर्चा करत होते. मला एका आर्थिक सल्लागाराची फोन आला होता. तो मला काही शेअर्सची लिस्ट पाठवणार आहे, त्या शेअर्समध्ये खूप चांगला रिटर्न मिळेल असं तो सांगत होता, असं विष्णू विपुलला सांगत होता. अरे विष्णू, पण हा आर्थिक सल्लागार खरंच चांगला आहे. सध्या अश्या अनेक आर्थिक सल्लागारांचे फोन येतात, पण यापैकी खूप कमी लोक विश्वास ठेवण्या लायक असतात, असं विपुल विष्णूला सांगतो. पण मग आर्थिक सल्लागार चांगला आहे का नाही, हे कसं ठरवायचं असा प्रश्न विष्णू विचारतो.

जेव्हा तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा गुंतवता, तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात.

उदारणार्थ, आपण कुठे गुंतवणूक करावी?… शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, FD सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण कोणत्या ऍसेटमध्ये चांगला रिटर्न मिळेल… तसेच, कोणत्या ऍसेटमध्ये गुंतवणूक सुरक्षित राहील. कोणता ऍसेट चांगला आहे, यावर आपण बराच विचार करतो, पण आपला आर्थिक सल्लागार चांगला आहे का किंवा चांगला आर्थिक सल्लागार कसा शोधायचा याचा आपण विचार करत नाही. आर्थिक सल्लागार का महत्त्वाचा आहे आणि त्याची निवड करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, ते आता जाणून घेऊया. आर्थिक किंवा गुंतवणूक सल्लागाराचे काम तुमचे आर्थिक जीवन सोपे बनवणे आहे…तो तुमची कमाई, खर्च आणि आर्थिक उद्दिष्टे समजून घेऊन तुमचे आर्थिक नियोजन करतो…तुमची गुंतवणूक मॅनेज करतो जेणेकरून तुम्हाला हा त्रास टाळता येईल…आर्थिक सल्लागार तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करतो. …त्यानुसार गुंतवणुकीची निवड करतो आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे लवकर कसे साध्य करता येतील याकडे लक्ष देतो… खरं तर, वित्तीय सल्लागार तुमच्या आर्थिक जीवनात मार्गदर्शक किंवा प्रशिक्षकाची भूमिका बजावतो.

आपल्याला खरंच आर्थिक सल्लागाराची गरज आहे का, हे आधी आपल्याला ठरवावं लागेल.

तुमचं फायनान्समध्ये शिक्षण झालं असेल आणि गुंतवणुकी संदर्भात सखोल माहिती तुमच्याकडे असेल, तर तुम्ही गुंतवणुकीचे निर्णय स्वतः घेऊ शकता. तुमच्याकडे नॉलेज आहे पण वेळ नसेल, तर मात्र तुम्हाला चांगला आर्थिक सल्लागार शोधावा लागेल. तुम्हाला फायनान्स संदर्भात काहीच माहिती नसेल, तर तुमच्यासाठी आर्थिक सल्लागार खूप महत्वाचा आहे. आर्थिक सल्लागार किंवा SEBI RIAs गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजनासाठी किती शुल्क आकारतात, हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या मनात असतो. आपल्या देशात आर्थिक सल्लागारांचा एकच प्रकार आहे…ज्याला SEBI नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार किंवा RIA म्हणतात….नियमांनुसार, लोकांचे आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक व्यवस्थापन करण्याचा अधिकार केवळ SEBI RIA ला आहे. याशिवाय, जो कोणी गुंतवणुकीचा सल्ला देतो तो उत्पादन विक्रेता आहे आणि तो ग्राहकाकडून पैसे घेऊ शकत नाही. जर एखादी व्यक्ती आर्थिक सल्लागार असल्याचा दावा करत असेल तर त्याच्याकडे सेबी नोंदणी असणे आवश्यक आहे. तुम्ही त्याचा रजिस्ट्रेशन नंबर विचारा आणि सेबीच्या वेबसाइटवर तपासा… सध्या 1307 गुंतवणूक सल्लागार सेबीकडे नोंदणीकृत आहेत.

आजकाल, अनेक अॅप्स आणि वेबसाइट्स उपलब्ध आहेत, जे लोकांना गुंतवणुकीशी संबंधित सल्ला देतात.

गुंतवणुकीसाठी मदत करतात…हे पोर्टल कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात?… ते RIA पेक्षा कसे वेगळे आहेत, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे… तुम्ही या अॅप्सद्वारे कोणत्या लोकांसाठी गुंतवणूक करू शकता? हे आमच्या तज्ञांकडून जाणून घेऊया. आर्थिक सल्लागार निवडण्याची पहिली पायरी म्हणजे 4 ते 5 सल्लागारांना भेटणे आणि त्यांचा RIA नोंदणी क्रमांक तपासणे…त्यांच्याकडे जितका अधिक अनुभव असेल तितका चांगला…आर्थिक सल्लागाराला किमान 5 वर्षांचा अनुभव असावा…त्याने थेट ग्राहकाकडून शुल्क आकारले पाहिजे. क्लायंटच्या गुंतवणुकीवर कमिशनच्या स्वरूपात कमाई करू नये… जर त्याने ग्राहकाकडून पैसे नाही घेतले तर त्याचा कल कमिशन वाढवण्याकडे असेल… आर्थिक सल्लागाराची विश्वासार्हता जाणून घेण्यासाठी, त्याच्याकडे असणाऱ्या सध्याच्या ग्राहकांशी बोलतात…तो टीव्ही, डिजिटल किंवा प्रिंट मीडियामध्ये दिसल्यास त्याची विश्वासार्हता वाढते…तसेच तो आर्थिक नियोजन करून गुंतवणूक हाताळेल की फक्त आर्थिक नियोजन करेल की फक्त गुंतवणूक व्यवस्थापन करेल हे देखील पहा… तुमची गरज काय आहे आणि आर्थिक सल्लागार त्या गरजा कश्या पूर्ण करणार आहे, याची माहिती घ्या. समजा गुंतवणूक सल्लागाराने चुकीचा सल्ला दिला तर, तक्रार कुठे केली जाऊ शकते आणि त्यावर कोणत्या प्रकारची कारवाई केली जाऊ शकते? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.

चुकीचा आर्थिक सल्लागार निवडणे म्हणजे तुमचा मेहनतीने कमावलेला पैसा चुकीच्या हातात सोपवणे.

यामुळे खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं…आर्थिक उद्दिष्ट पूर्ण न होण्याचा धोकाही असतो…कारण सल्लागार तुमच्यापेक्षा स्वतःच्या फायद्याबद्दल बोलत असतो. आजकाल, सोशल मीडियावर अनेक फिन इन्फ्ल्यूएंसर आहेत… जे लोकांना शेअर्स, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या टिप्स देत आहेत… सेबीने अशा नोंदणी नसलेल्या सल्लागारांवर कडक कारवाई केली आहे… सेबीने त्यांना ‘फादर ऑफ चार्ट’ असे नाव दिले आहे. चॅनल चालवणाऱ्या नसीरुद्दीन अन्सारी यांच्यावर सेबीने बंदी घातली आहे… आणि फॉलोअर्सकडून जमा केलेले १७ कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत… गुंतवणूकदारांना अशा नोंदणी नसलेल्या सल्लागारांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे… P R सुंदर यांच्यावर देखील काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती.

Published: November 21, 2023, 00:14 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App