50 सेंच्युरी करून विराट कोहलीने सचिनचं रेकॉर्ड तोडलं आहे. 1000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणारा विराट कोहली जितका चांगला बॅट्समन आहे, तितकाच चांगला चांगला तो गुंतवणूकदार आहे. इंश्युरन्स, ट्रॅव्हल आणि हेल्थ सेगमेंटमधील अनेक स्टार्ट-अप्समध्ये विराट कोहलीने गुंतवणूक केली आहे. 2019 साली डिजिट जनरल इंश्युरन्समध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अडीच कोटींची गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये दोघांनीही बक्कळ पैसा कमावला आहे. डिजिट इंश्युरन्समध्ये विराट कोहलीचे पैसे केवळ 4 वर्षात 40 पट वाढले आहेत.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App