जिंदाल ड्रिलिंग या कंपनीचा मालकीहक्क DP जिंदाल ग्रुपकडे आहे. हि कंपनी ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये भारतात मागचे ३० वर्ष काम करत आहे. कंपनीकडे समुद्राच्या आत जाऊन ऑफशोर ड्रिलिंग करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. कंपनी ऑफशोर ड्रिलिंग, हॉरीझॉन्टल आणि डायरेक्शनल ड्रिलिंग आणि मड लॉगिंगच्या सेवा देते.
ऑइल अँड गॅस इंडस्ट्री ही भारतातली टॉप ८ इंडस्ट्रीमधील एक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर या इंडस्ट्रीचा परिणाम होतो. भारत हा एक डेव्हलपिंग देश असल्यामुळे, देशात ऑइल आणि गॅसच्या उत्पादनात सतत वाढ होत आहे. यामुळे, ऑइल आणि गॅसची निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना फायदा होतोय.
२०२१ च्या इंडिया एनर्जी आऊटलूकनुसार, २०४० पर्यंत भारताचा GDP ८.६ ट्रिलियन डॉलरच्या वर जाण्याची शक्यता आहे. यामुळे, ऊर्जेच्या मागणीमध्ये दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. देशाला २०४० पर्यंत 1123 MTOE म्हणजेच मिलियन टन ऑइल इक्विव्हॅलेंट ऊर्जा लागेल, असा अंदाज आहे. १ मेट्रिक टन ऑइल जाळल्यावर जी ऊर्जा निर्माण होते त्याला MTOE म्हणतात.
भारतात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. तसेच, प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार नॅचरल गॅसच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. यामुळे, येणाऱ्या काळात देशात नॅचरल गॅसची मागणी वाढणार आहे. एकूण मागणीपैकी ४०% मागणी इंडस्ट्रियल सेगमेंटमधून येईल, असा अंदाज आहे. तसेच, गृह निर्माण, वाहतूक आणि एनर्जी सेगमेंटमधून अतिरिक्त मागणी येण्याची शक्यता आहे.
ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये JDIL चा व्यवसाय मजबूत आहे. समुद्र किनाऱ्या पासून लांब जाऊन तेल काढण्यासाठी कंपनीकडे ६ जॅक अप रिग आणि ६ डायरेक्शनल ड्रिलिंग सेट आहेत. तसेच, कंपनीने १६७ मिलियन डॉलर खर्चून व्हीनस ड्रिलिंगकडून अजून एक ऑफशोर जॅक अप रिग खरेदी केली आहे. कंपनीने या रिगला जिंदाल सुप्रीम असं नाव दिलं आहे. कंपनीने ही रिग ONGC ला भाडेतत्वावर दिली आहे. कंपनीकडे ONGC सोबतच ऑइल इंडिया, GSPC , GAIL , Canaro Resources, Salpem आणि Essar सारखे नामांकित ग्राहक आहेत.
JDIL ला जवळपास सगळ्याच रिग्सवर १००% एफिशिअन्सी स्टॅंडर्ड मिळ्वण्यामध्ये यश मिळालं आहे. यामुळे, कंपनीचे डे रेट आणि युटिलायझेशन दोन्ही वाढणार आहेत. अनेक मोठ्या मार्केट्समध्ये कंपनीचा व्यवसाय पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे, ग्लोबल ऑफशोर ड्रिलिंग मार्केटसाठी येणार काळ चांगला आहे. एक दिवस रिग भाड्याने देऊन मिळणाऱ्या उत्पन्नाला डे रेट म्हंटल जातं. २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यात आशिया पॅसिफिक भागात डे रेट ६७००० ते ९०००० डॉलर राहण्याची शक्यता आहे.
मात्र, चांगल्या मागणीमुळे डे रेट सध्या १ लाख २०००० डॉलर पर्यंत वाढला आहे. २०२३ मध्ये मागणीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता असून, रिग्सच्या पुरवठ्यामध्ये वाढ होणार नाही. त्यामुळे, डे रेटमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
KG बेसिन आणि सागर सम्राटसारखे प्रॉजेक्ट चालू होणार आहेत, त्यामुळे ONGC च्या उत्पादनातदेखील वाढ होईल. याचा JDIL ला फायदा होईल. JDIL डिस्कव्हरी 1 आणि जिंदाल स्टार या रिग्ससाठी दिवसाला अंदाजे २५ ते २६००० डॉलर भाडं आकारतात. तर, एक्सप्लोरर, व्हर्च्यू आणि स्टार या रिग्ससाठी दिवसाला ४० ते ४५००० डॉलर भाडं आकारलं जातं.
पुढच्या काही दिवसात रिग रेट ५५००० ते ५७००० डॉलरच्या वर जातील, असा अंदाज मॅनेजमेंटने व्यक्त केला आहे. ऑईलच्या मागणी वाढ होत आहे, मात्र रिग्सचा पुरवठा यायला बराच वेळ लागेल. याचा ऑइल रिग पुरावणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल. आर्थिक वर्ष २०२४ ते २०२६ दरम्यान डे रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. JDIL सारख्या कंपनीचं उत्पन्न वाढेल, मात्र खर्चात त्या प्रमाणात वाढ होणार नाही. त्यामुळे, कंपनीच्या प्रॉफीटमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
मागच्या १ महिन्यात JDIL च्या शेअरमध्ये 15% तेजी आली आहे. सध्या हा शेअर २८५ रुपयाला ट्रेड करतोय. आर्थिक वर्ष २०२४ च्या उत्पन्नानुसार हे शेअर सध्या ६ च्या PE रेशोला ट्रेड करतोय. आर्थिक वर्ष २०२४ आणि २०२५ च्या उत्पन्ननुसार हा शेअर अनुक्रमे ४ आणि ३ च्या EV / EBITDA ला ट्रेड करतोय. कंपनीकडे असणारी मजबूत ऑर्डर बुक, नफ्यामध्ये होणारी वाढ आणि मजबूत कॅश फ्लो असल्यामुळे कंपनीला भविष्यात ६ ते ७ चा EV टू EBITDA चं व्हॅल्युएशन मिळू शकतं. असं झालं तर पुढच्या १२ ते १५ महिन्यात हा शेअर ५०१ रुपयाच्या वर जाऊ शकतो.
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App