या कंपनीच्या IPO ची धमाकेदार एंट्री php // echo get_authors();
?>
लिस्टिंग झल्यानंतर जवळपास एका तासाने शेअरने 1413.95 रुपयांच्या उच्चांक गाठला. ज्या लोकांनी फार्मा कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवले त्यांनी बक्कळ कमाई केली आहे.
फार्मा कंपनी मॅनकाइंड फार्माची शेअर बाजारात धमाकेदार एंट्री झाली आहे. केला. 1080 च्या इश्यू किमतीच्या तुलनेत मॅनकाइंड फार्माचा शेअर BSE वर 1300 रुपयांवर म्हणजेच 20 टक्क्यांच्या प्रीमियमवर उघडला आणि लिस्टिंग झल्यानंतर जवळपास एका तासाने शेअरने 1413.95 रुपयांच्या उच्चांक गाठला. ज्या लोकांनी फार्मा कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवले त्यांनी बक्कळ कमाई केली आहे.
संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून या IPO ला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हा IPO एकूण 15.3 पट सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा पूर्ण झालेला नसताना Qualified Institutional Buyers चा हिस्सा 49 पेक्षा जास्त वेळा भरला गेला . तसेच या शेअरवर आउटपरफॉर्म रेटिंगसह आणि 1,400 रुपयांचे लक्ष्य असलेल्या स्टॉकवर कव्हरेज सुरू केले. जे लिस्टिंग झाल्यानंतर झाल्यानंतर तासाभरात साध्य झाले.
गेल्या आठवडाभरापासून शेअर बाजारात तेजी सुरू आहे. मंगळवारी BSEच्या निर्देशांकाने पुन्हा एकदा 62 हजारांची पातळी गाठली. मॅनकाइंड फार्माच्या शेअरच्या लिस्टिंगलाही बाजारातील तेजीचा फायदा मिळाला. अनेक ब्रोकरेज हाऊसेस हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.
डिसेंबर 2022 पर्यंत या कंपनीकडे 280 कोटी रुपयांची रोकड होती. यासोबतच या कंपनीचे दीर्घकालीन म्हणजेच कायमस्वरूपी आजारांशी संबंधित औषधांवर लक्ष केंद्रित केले आहे ज्यामुळे व्यवसायातील वाढीसह मार्जिनमध्ये आणखी सुधारणा होईल. असे मॅक्वेरीच्या अहवालात सांगितले आहे.
Published: May 9, 2023, 18:53 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App