बिझनेस रियालिटी शो शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन सुरू होणार आहे. जानेवारी 2024 पासून हा शो ऑन एअर होणार असून शोचे शूटिंगही सुरू झाले आहे. या शोमध्ये एका नवीन जजने शार्क टँक इंडियाच्या सीझन 3 मध्ये प्रवेश केला आहे. एडलवाईस एमएफच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी या शोमध्ये जज म्हणून प्रवेश केला आहे.
शार्क टँक इंडिया या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या सीझन 3 मध्ये अनेक नवीन जज सामील झाले आहेत. आता या यादीत राधिका गुप्ता यांचे नावही सामील झाले आहे. 40 वर्षीय राधिका गुप्ता एडलवाईस MF च्या MD आणि CEO आहेत. .याआधी त्यांनी एडलवाईस मल्टी-स्ट्रॅटेजी फंड्सचे बिझनेस हेड पदही भूषवले आहे. याशिवाय राधिका गुप्ता या WEA द्वारे मान्यताप्राप्त तरुण जागतिक लीडर आणि एक उत्तम लेखिका आहे. राधिकाने ‘द व्हार्टन स्कूल’मधून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन केले आहे. यासोबतच त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंगही केले आहे.
राधिका गुप्ता व्यतिरिक्त, शार्क टँक इंडियाच्या या नवीन सीजनमध्ये आणखी नवीन जज सामील झाले आहेत. यामध्ये OYO Rooms चे संस्थापक आणि CEO रितेश अग्रवाल, InShorts चे सह-संस्थापक आणि CEO अझहर इकबाल आणि Zomato चे सह-संस्थापक आणि CEO दीपंदर गोयल यांच्या नावांचा समावेश आहे. अॅको जनरल इन्शुरन्सचे सीईओ वरुण दुआ आणि चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचा या वर्षी शार्क टँक इंडियाच्या नवीन जजचा पॅनेलमध्ये समावेश आहे.
याशिवाय boAt चे सह-संस्थापक आणि सीईओ अमन गुप्ता, कार देखोचे सह-संस्थापक आणि सीईओ अमन जैन, एम क्युअरच्या एमडी नमिता थापर, शुगर कॉस्मेटिक्सच्या सह-संस्थापक आणि सीईओ विनीता थापर आणि Shaadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल देखील या सीझनमध्ये दिसणार आहेत .
Published: November 6, 2023, 13:12 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App