देशात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. फसवणुकीशी संबंधित लोक फसवणुकीच्या नवनवीन पद्धती अवलंबत आहेत. नुकतेच हरियाणातील नूह येथे एक मोठी टोळी उघडकीस आली आहे. ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आरबीआयने बँकांना इशारा दिला आहे. मध्यवर्ती बँकेने ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी बँकांना जागरूक करण्यास सांगितले आहे. सर्व मोठ्या बँकांनी या दिशेने मोहीम सुरू केली आहे.
रिझर्व्ह बँकेचा अहवाल :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत एकूण 36,316 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. जी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 19,485 कोटी इतकी . तसेच 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीपासून ते 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीपर्यंत केवळ कार्ड आणि इंटरनेट बँकिंगद्वारे केलेल्या फसवणुकीत 27 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.तर आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत ऑनलाइन बँकिंग फसवणूक आणि कार्ड फसवणूक प्रकरणांची एकूण संख्या 1,532 होती ती आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या सहामाहीत 2,321 पर्यंत वाढली आहे.
बँकांकडून जागरूकता अभियान :
बँका सध्या त्यांच्या ग्राहकांना सायबर आर्थिक फसवणुकीपासून एसएमएस, ईमेलपासून फोन कॉलपर्यंत ग्राहकांना ते सुरक्षित कसे राहू शकतात हे सांगितले जात आहे. खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने गेल्या एका वर्षात फसवणुकीच्या जागृतीसाठी ग्राहकांना 2 कोटी एसएमएस मजकूर संदेश आणि 85 लाख ईमेल पाठवले आहेत. HDFC बँकेने 62,500 हून अधिक ग्राहकांना फसवणूक जागृती आणि सुरक्षित बँकिंगवर 5,900 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत. इतर बँकाही अशाच पद्धतीचा अवलंब करत आहेत.
कोणती काळजी घ्यावी :
ग्राहकांना जागरूक करण्यासाठी ICICI बँक त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यांमध्ये आणि क्रेडिट कार्डमधील प्रत्येक व्यवहारासाठी ईमेल अलर्ट पाठवत आहे. या अलर्टमध्ये बँक ग्राहकांना व्यवहाराची पडताळणी करण्यास आणि फसवणूक झाल्यास तक्रार करण्यास सांगितले जाते. बँकेने म्हटले की, ‘प्रत्येक अलर्टमध्ये आम्ही ग्राहकांना सतर्क राहण्याची आठवण करून देत असतो.समोरच्या व्यक्तीने बँक कर्मचारी असल्याचा दावा केला असला तरीही ओटीपी, पासवर्ड, सीव्हीव्ही यासह गोपनीय माहिती कोणालाही शेअर करू नये असे त्यांना सांगण्यात आले आहे. ICICI बँकेने आपल्या मोबाईल अॅप iMobile मध्ये एक नवीन फीचर आणले आहे जे कोणत्याही स्क्रीन शेअरिंग पर्यायाला परवानगी देत नाही. आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा आणि तुमची वैयक्तिक माहिती फोनवर कोणाशीही शेअर करू नका असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Published: May 8, 2023, 11:48 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App