• English
  • हिन्दी
  • ગુજરાતી
  • বাংলা
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • money9
  • विमा
  • बचत
  • शेअर मार्केट
  • कर्ज
  • गुंतवणूक
  • ट्रेंडिंग
  • Breaking Briefs
downloadDownload The App
Close
  • Home
  • Shows
  • Podcast
  • कर
  • Money Time
  • म्युच्युअल फंड
  • सोने
  • स्टॉक
  • Exclusive
  • Breaking Briefs
  • विमा
  • बचत
  • शेअर मार्केट
  • कर्ज
  • गुंतवणूक
  • म्युच्युअल फंड
  • बांधकाम व्यवसाय
  • कर
  • ट्रेंडिंग
  • Home / Exclusive }

पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र पोर्टल

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या योजनेला यापुर्वीच गती देण्यात आली होती. त्यांच्या पुढाकाराने ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना प्रभावीपणे राबविली आहे.

  • Team Money9
  • Last Updated : November 14, 2023, 12:43 IST
  • Follow
  • Follow

पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्र अव्वल 

 अधिकाधिक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप  देणार

महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित केले

पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपली बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे असून त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित केले आहे.

            उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या योजनेला यापुर्वीच गती देण्यात आली होती. त्यांच्या पुढाकाराने ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना प्रभावीपणे राबविली आहे. या अव्वल स्थानासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुढाकारासाठी आणि महाऊर्जाशी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचेही अभिनंदन केले आहे.

            मुख्यमंत्री यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, राज्यात नवीन व नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्राचाही आपण आपल्या शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या कृषी पंपांसाठीही प्रभावीपणे वापर करून घेत  आहोत. यामुळे बळीराजाला सिंचनासाठी खात्रीलायक असा ‘ऊर्जा’ पर्याय उपलब्ध होईल. हा पर्याय कमी खर्चाचा आणि विश्वासाचा देखील आहे. ऊर्जा विभागाने केंद्राच्या यंत्रणांशी समन्वय साधून साध्य केलेले उद्दीष्ट हे केवळ एक टप्पा आहे. या योजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळावेत असे शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी महाऊर्जाने आपल्या या कार्यप्रणालीत सातत्य राखावे, तसेच शेतकऱ्यांमध्ये या ऊर्जा स्त्रोताविषयी आणखी जागरुकता निर्माण करावी. महाराष्ट्राचे स्थान कायमच अव्वल राहावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

            केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ‘किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान’ ‘कुसुम’ योजनेत राज्यांना ९ लक्ष ४६ हजार ४७१ सौरपंप बसविण्यासाठी मान्यता दिली आहे. देशात यापैकी एकूण २ लक्ष ७२ हजार ९१६ सौर पंप स्थापित झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त सौर कृषिपंप राज्यात महाऊर्जामार्फत बसविण्यात आले आहेत.

            पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे. महावितरणकडे कृषिपंप जोडणीसाठी अर्ज केलेल्या मात्र अनामत रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंप देण्याच्या योजनेवरही भर देण्यात येत आहे. महाराष्ट्राने अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण २०२० तयार करून या क्षेत्रात महत्वाचे पाऊल यापुर्वीच टाकले आहे. राज्याने पुढील पाच वर्षांसाठी पाच लाख कृषिपंपाना मान्यता दिली आहे.

Published: November 14, 2023, 12:42 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App    

  • INVESTMENT
  • money

Related

  • कांदानिर्यात, उसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी मार्ग काढणार
  • चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर
  • हिंदुस्थान कोका-कोला 2,500 कोटी गुंतवणूक करणार,मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोका कोला प्रकलाचे भूमिपूजन
  • सोळाव्या वित्त आयोगासाठी कार्यविषयक अटी निश्चितीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
  • सीएनजी आणि पीएनजीमध्ये कॉम्प्रेसड बॉयोगॅस मिश्रण करणं बंधनकारक
  • फोनच्या रोमिंग चार्जेसची चिंता आता करू नका

Latest

  • 1. म्युच्युअल फंडसाठी 3 स्ट्रॅटेजी !
  • 2. Tokenizationमुळे बँकिंग व्यवहार सुरक्षित
  • 3. आरोग्य विमा घेताना हे लक्षात घ्या
  • 4. Finfluencer चा सल्ला पडेल महागात
  • 5. HRA नसल्यास घरभाड्यात सवलत कशी मिळवाल ?
  • Trending Stories

  • म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी 3 स्ट्रॅटेजी !
  • Tokenization मुळे बँकिंग व्यवहारांची सुरक्षितता वाढणार
  • कांदानिर्यात, उसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी मार्ग काढणार
  • संतप्त कांदा उत्पादकांचा रास्ता रोको,लिलावही बंद पाडले
  • जीएसटी सुधारणा विधानसभेत विधेयक मंजूर
  • TV9 Sites

  • TV9Hindi.com
  • TV9Telugu.com
  • TV9Marathi.com
  • TV9 Gujarati
  • TV9 Kannada
  • TV9 Bangla
  • News9 Live
  • Trends9
  • Money9 Sites

  • Money9 Hindi
  • Money9 English
  • Money9 Marathi
  • Money9 Telugu
  • Money9 Gujarati
  • Money9 Kannada
  • Money9 Bangla
  • Topics

  • विमा
  • बचत
  • कर्ज
  • स्टॉक, शेअर
  • म्युच्युअल फंड
  • बांधकाम व्यवसाय
  • कर
  • क्रिप्टो
  • ट्रेंडिंग
  • Follow us

  • FaceBook
  • Twitter
  • Youtube
  • Instagram
  • Linkedin
  • Download App

  • play_store
  • App_store
  • Contact Us
  • About Us
  • Advertise With Us
  • Privacy & Cookies Notice
  • Complaint Redressal
  • Copyright © 2023 Money9. All rights reserved.
  • share
  • Facebook
  • Twitter
  • Whatsapp
  • LinkedIn
  • Telegram
close