अर्थसंकल्पामध्ये महिलांना मिळणार खास भेट

सार्वत्रिक निवडणूकांआधी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पांत महिलांसाठी देखील महत्वाच्या घोषणा होऊ शकतात 

खासकरुन नोकरी करणाऱ्या महिलांना अनेक अपेक्षा  आहेत 

कॉँग्रेस सरकारने करदात्या महिलांसाठी असलेल्या सवलती रद्द केल्या होत्या 

12 वर्षापूर्वी भारतात महिलांसाठी वेगवेगळे स्लॅब होते 

बेसिक एग्जेम्पशन लिमिट पुरुषांपेक्षा अधिक  होती 

कॉँग्रेस सरकारने ही 2012-13 ला ही सिस्टिम बंद केली आणि सर्व महिला आणि पुरुषांना समान स्लॅबमध्ये ठेवले 

त्यानंतर महिलांसाठी विशेष स्लॅब नसून आयकरामध्ये देखील सवलतीचा लाभ नाही

मोदी सरकार कडून महिलांसाठी उपाययोजना केल्या जाऊ शकतात

सध्या नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर द्यावा लागत नाही 

ही मर्यादा आता महिलांसाठी वाढून 8 लाख रुपये होऊ  शकते