एकाच दिवसात शेअर्स खात्यात जमा होणार

सध्या शेअर बाजारात 'टी प्लस एक' प्रणाली लागू आहे. या प्रणालीनुसार शेअर खरेदी आणि विक्रीची नोंद डिमॅट खात्यात व्यवहारा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी होते. त्यामुळे शेअर्सची विक्री केल्यानंतर पैसे दुसऱ्या दिवशी मिळतात. मात्र,आजपासून या 25 कंपन्यांचे शेअर-खरेदी विक्री केल्यानंतर एका दिवसातच व्यवहार पूर्ण होणार आहे.

SHARE MARKET

एकाच दिवसात शेअर्स खात्यात जमा होणार
‘टी प्लस शून्य’प्रणालीला सुरूवात

शेअर बाजारात शेअर-खरेदी विक्री केल्यानंतर एकाच दिवसात म्हणजेच सेटलमेंट पूर्ण करणाऱ्या नव्या ‘टी प्लस शून्य’प्रणालीची आजपासून सुरूवात झालीय. ‘टी प्लस शून्य’ मधील २५ कंपन्यांची यादी मुंबई शेअर बाजाराकडून जाहीर करण्यात आली होती

‘टी प्लस शून्य’ मधील कंपन्यांची यादी

अशोक लिलेंड, अम्बुजा सिमेंट,बजाज ऑटो, बँक ऑफ बडोदा, बीपीसीएल,बिर्लासॉफ्ट,सिप्ला, कोफोर्ज, डिव्हिस लॅब्रोटरीज, हिंदाल्को इंडस्ट्रीज,इंडियन हॉटेल्स, जेएसडब्लू स्टील, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, एलीआय माइंड ट्री, एमआरएफ,नेस्ले इंडिया, एनएमडीसी, ऑईल अँड नॅशरल गॅस कॉर्पोरेशन, पेट्रोनेट एनएनजी,समवर्धना मदरसन इंटरनॅशनल,स्टेट बँक,टाटा कम्युनिकेशन्स,ट्रेन्ट, युनियन बँक ऑफ इंडिया, वेदान्त या कंपन्यांचा समावेश आहे

सध्या शेअर बाजारात ‘टी प्लस एक’ प्रणाली लागू आहे. या प्रणालीनुसार शेअर खरेदी आणि विक्रीची नोंद डिमॅट खात्यात व्यवहारा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी होते. त्यामुळे शेअर्सची विक्री केल्यानंतर पैसे दुसऱ्या दिवशी मिळतात. मात्र,आजपासून या 25 कंपन्यांचे शेअर-खरेदी विक्री केल्यानंतर एका दिवसातच व्यवहार पूर्ण होणार आहे.

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ ने घेतलेल्या या निर्णयामुळे भारतातील शेअर बाजारातील व्यापारी सुविधा जागतिक मानांकनासोबत आणल्या आहे.  गुंतवणूकदारांच्या हितासाठी सेबीने सेटलमेंटच्या कालावधीत कपात केली आहे. 2002 मध्ये टी प्लस पाचवरूीन टी प्लस तीन आणि त्यानंतंर 2003 मध्ये टी प्लस दोन पर्यंटत व्यवहार सेटलमेंट होत होते.

Published: March 28, 2024, 09:59 IST