टर्म इंश्युरन्समध्ये "ह्युमन लाईफ व्हॅल्यू" म्हणजे काय?

जयवंतच्या आर्थिक सल्लागाराने त्याला ह्युमन लाईफ व्हॅल्यू ही कन्सेप्ट समजून सांगितली होती. प्रत्येक आपली ह्युमन लाईफ व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ही कन्सेप्ट माहित नसेल, तर काळजी करू नका. पुढच्या 1 मिनिटात तुम्हाला ही कन्सेप्ट समजलेली असेल.

45 वर्षाचा जयवंत हा घरातला एकमेव कमावणारा व्यक्ती होता. त्याचं मागच्या महिन्यात ऍक्सीडेन्टमध्ये दुर्दैवी निधन झालं. तो एका फंक्शनसाठी बायको आणि मुलासोबत बँगलोरला चालला होता. बेळगावच्या पुढे एक लहान मुलगी अचानक जयवंतच्या कारसमोर आली, तिला वाचवण्यासाठी त्याने अचानक टर्न मारला आणि स्टिअरिंगवरचा त्याचा कंट्रोल सुटला आणि त्यांची गाडी एका झाडावर जाऊन धडकली. त्याच्या छातीला इतका जब्बार मार लागला कि हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधीच त्याने प्राण सोडला. जयवंतच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलाला खूप जास्त मार लागला नाही. मात्र, जयवंतच्या पत्नीला जेव्हा त्याच्या जाण्याची बातमी कळली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. एका बाजूला जयवंतच्या जाण्याचं दुःख होतं आणि दुसऱ्या बाजूला आपलं पुढे कसं होणार याच टेन्शन होतं. आपला मुलगा केवळ 5 वर्षाचा आहे, अजून त्याचं शालेय शिक्षण व्हायचं आहे. मुलाला IT इंजिनिअर करायचं जयवंत आणि त्याच्या पत्नीचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाचं काय होणार. त्यांचा बाणेरमध्ये फ्लॅट आहे, त्याचे EMI चालू आहेत, ते EMI नाही भरले तर आपण राहणार कुठे आपल्या दर महिन्याला घर खर्चासाठी किमान 30000 रुपये लागतात, ते पैसे कुठून आणायचे असे अनेक प्रश्न जयवंतच्या पत्नीच्या मनात आले.

जयवंत गुंतवणुकीसंदर्भात खूप सिरिअस होता. त्याने आर्थिक सल्लागाराच्या ऐकून व्यवस्थित फायनान्शिअल प्लॅनिंग करून ठेवलं होतं. जयवंतच्या आर्थिक सल्लागाराने त्याला ह्युमन लाईफ व्हॅल्यू ही कन्सेप्ट समजून सांगितली होती. प्रत्येक आपली ह्युमन लाईफ व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ही कन्सेप्ट माहित नसेल, तर काळजी करू नका. पुढच्या 1 मिनिटात तुम्हाला ही कन्सेप्ट समजलेली असेल. आज आपण नोकरी व्यास करतोय म्हणून आपल्याला उत्पन्न मिळतंय आणि आपलं घर चालतंय. पण दुर्दैवाने आपण जर या जगात राहिलो नाहीतर काय? हा खूप सिरिअस प्रश्न आहे. ह्युमन लाईफ व्हॅल्यू हा असा आकडा आहे, कि तेवढी रक्कम आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला मिळाली तर आपल्या पगाराएवढं उत्पन्न त्यांना FD च्या व्याजातून मिळेल. याचा फॉर्म्युला खूप सोपा आहे, आपलं जेवढं वार्षिक उत्पन्न आहे ते उत्पन्न गुणिले 20 म्हणजे आपलं ह्युमन लाईफ व्हॅल्यू. जयवंतचं वार्षिक उत्पन्न होतं 10 लाख रुपये. 10 गुणिले 20 झाले 2 कोटी रुपये. म्हणजे जयवंतची ह्युमन लाईफ व्हॅल्यू झाली 2 कोटी रुपये. जेवढी आपली ह्युमन लाईफ व्हॅल्यू आहे, किमान तेवढा टर्म इंश्युरन्स कव्हर आपण घेतला पाहिजे.

जयवंतने आर्थिक सल्लागारचं ऐकून 2 कोटींचा टर्म इंश्युरन्स खरेदी केला होता. त्याचं निधन झाल्यावर त्याच्या पत्नीला लाईफ इंश्युरन्स कंपनीकडून 2 कोटींचा कव्हर मिळाला. अर्थातच जयवंतच्या पत्नीने हे पैसे FD सारख्या सुरक्षित इंस्ट्रुमेन्टमध्ये गुंतवले पाहिजे. जर त्यांनी या 2 कोटींची FD केली आणि त्यांना टॅक्स वजा केल्यावर साधारण 5% रिटर्न मिळाला तरी दर वर्षी 10 लाख रुपये किंवा दर महिन्याला साधारण 80 हजार रुपये व्याज मिळेल. जयवंतच्या या एका निर्णयामुळे त्याची फॅमिली या मोठ्या आर्थिक संकटातून वाचली. घराचा EMI, मुलाचं शिक्षण आणि इतर गुंतवणूक, यापैकी कोणताही खर्च कमी करण्याची वेळ त्याच्या पत्नीवर आली नाही. मित्रांनो, ज्या वेळेला आपल्या घरातली कमावणारी व्यक्ती जाते, त्या वेळेला ती व्यक्ती गेल्याचं दुःख तर असतंच. पण त्यानंतर, बरेच लोकं आर्थिक संकटात सापडतात. एखादी व्यक्ती गेली तर तिची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. मात्र, आपण ह्युमन लाईफ व्हॅल्यूची कन्सेप्ट समजून त्यानुसार टर्म इंश्युरन्स खरेदी केला तर आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.

Published: May 14, 2024, 17:11 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App