मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कोणता झोन निवडावा?

शहरानुसार ट्रीटमेंटच्या खर्चात फरक असतो. आता पुणे आणि नगरचं उदाहरण बघूया. पुण्यात हॉस्पिटल चालवायला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा नगरमध्ये कमी खर्च येईल. जमिनीची किंमत, हॉस्पिटल बांधण्याचा खर्च, स्टाफचा पगार असे अणे खर्च जे हॉस्पिटल्सला करावे लागतात, ते मेट्रो शहरांमध्ये जास्त असतात. त्यामुळे, इंश्युरन्स कंपन्यांना मेट्रो शहरांमध्ये जास्त क्लेम द्यावे लागतात. त्यांचा क्लेमचा खर्च अर्थातच ते आपल्याला प्रीमियममधूनच वसूल करतात. शहरानुसार ट्रीटमेंटचा खर्च बदलतो म्हणूनच मेडिक्लेमचा प्रीमियमदेखील बदलतो.

प्रवीणची तब्बेत अचानक खराब झाली म्हणून त्याला नगरच्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन करायला सांगितलं. डॉक्टर या ऑपरेशनसाठी किती खर्च येईल, असं प्रवीणच्या पत्नीने विचारलं. हे ऑपरेशन आपल्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये करावं लागेल, आपल्याकडे हे ऑपरेशन होणार नाही, असं डॉक्टरननी सांगितलं. ऑपरेशनसाठी साधारण 5 लाख रुपये खर्च येईल, असं प्रवीणच्या घरच्यांना सांगितलं गेलं. प्रवीणने 10 लाख रुपयाचा मेडिक्लेम इंश्युरन्स खरेदी केला होता, त्यामुळे त्याला खर्चाचं टेन्शन नव्हतं. त्याचा वेटिंग पिरिअड संपला होता आणि पोलिसीमध्ये को-पेमेंटचा क्लॉजदेखील नव्हता. त्यामुळे, ऑपरेशनसाठी जेवढा खर्च येईल, ते सगळे पैसे इंश्युरन्स क्लेममधून मिळतील अशी प्रवीणला खात्री होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. ऍडमिट करताना त्याच्या पत्नीने मेडिक्लेम पॉलिसीचे डॉक्युमेंट सादर केले. तुम्ही B झोनसाठी पॉलिसी खरेदी केली आहे, पण पुणे A झोनमध्ये येतं. त्यामुळे, तुम्हाला 5 लाखापैकी केवळ 4 लाखाचा क्लेम मिळेल असं मेडिक्लेम ऑफिसरने सांगितलं. हे ऐकल्यावर प्रवीणच्या पत्नीला झोन म्हणजे काय, असा प्रश्न पडला आहे. हा विषय नक्की काय आहे आणि तो प्रत्येकासाठी का महत्वाचा आहे, ते आता जाणून घेऊया.

शहरानुसार ट्रीटमेंटच्या खर्चात फरक असतो. आता पुणे आणि नगरचं उदाहरण बघूया. पुण्यात हॉस्पिटल चालवायला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा नगरमध्ये कमी खर्च येईल. जमिनीची किंमत, हॉस्पिटल बांधण्याचा खर्च, स्टाफचा पगार असे अणे खर्च जे हॉस्पिटल्सला करावे लागतात, ते मेट्रो शहरांमध्ये जास्त असतात. त्यामुळे, इंश्युरन्स कंपन्यांना मेट्रो शहरांमध्ये जास्त क्लेम द्यावे लागतात. त्यांचा क्लेमचा खर्च अर्थातच ते आपल्याला प्रीमियममधूनच वसूल करतात. शहरानुसार ट्रीटमेंटचा खर्च बदलतो म्हणूनच मेडिक्लेमचा प्रीमियमदेखील बदलतो. इंश्युरन्स कंपन्यांनी शहर किंवा गावानुसार A B C किंवा 1 2 3 असे वेगवेगळे झोन केले आहेत. उदारणार्थ, केअर हेल्थ इंश्युरन्स कंपनीने झोन 1 मध्ये दिल्ली, मुंबई, सुरत, ठाणे, गुरगाव, गाझियाबाद, नोएडा, अहमदाबाद आणि सुरत या शहरांचा समावेश केला आहे. तर झोन 2 मध्ये पुणे, बँगलोर, नाशिक आणि गुजरातमधील इतर शहरांचा समावेश आहे. झोन 3 मध्ये भारतातल्या इतर शहरांचा समावेश आहे.

तुम्ही जर झोन 3 मध्ये राहत असाल आणि तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल झोन 2 किंवा 1 मध्ये तर अर्थातच या दोन्ही भागात ट्रीटमेंटच्या खर्चात जो फरक आहे, तो तुम्हाला भरावा लागेल. सुरुवातीला तुम्ही झोन 3 नुसार कमी प्रीमियम भरला आहे, त्यामुळे फायदा मिळताना तुम्हाला झोन 3 नुसारच मिळेल. 1 2 आणि 3 झोनच्या प्रीमियममध्ये फरक असतो. उदारणार्थ, समजा झोन 3 साठी वार्षिक प्रीमियम 14000 रुपये असेल तर झोन 2 साठी हाच प्रीमियम 18000 रुपये असू शकतो आणि झोन 1 साठी हाच प्रीमियम 22000 रुपये असू शकतो. तुम्ही जर झोन 2 किंवा 3 मध्ये राहत असाल, तरी झोन 1 नुसार प्रीमियम भरणं फायदेशीर आहे. दर वर्षी थोडे जास्त पैसे जातील, पण मोठ्या शहरात जाऊन ट्रीटमेंट घ्यायची वेळ आली तर खिशातून पैसे भरावे लागणार नाही. बऱ्याच वेळेला पॉलिसीहोल्डर थोडे पैसे वाचवण्यासाठी चुकीचा झोन निवडतात, पण नंतर ऍडमिट झाल्यावर हि चूक त्यांच्या लक्षात येते. तुम्हीदेखील मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 1 किंवा या झोननुसार प्रीमियम भर. तुम्ही याआधीच पॉलिसी खरेदी केली असेल, तर रिन्यूअलच्या वेळेला तुम्ही झोन बदलू शकता.

Published: May 16, 2024, 14:49 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App