-
आपल्या प्रत्येकाची काही स्वप्न असतात, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण जिवापाड मेहनत करतो. भविष्यात सुखी आयुष्य जगण्यासाठी त्याच मेहनतीचा पैसा वाचवतो, त्याची कुठेतरी गुंतवणूक करतो. त्यातून त्याला भविष्यात खूप काही करायचं असतं, आणि हेच करण्यासाठी काय करावं, गुंतवणुकीचा योग्य पर्याय काय? बचत किती फायदेशीर ठरु शकते? हेच आपण या मालिकेतून पाहणार आहोत...
-
गुंतवणूक, बचत वा आर्थिक निर्णय घेताना बऱ्याचदा गडबड होते, लहान-सहान चुकाही कधी कधी आक्राळ-विक्राळ रुप धारण करतात, आणि त्यानंतर सगळं आर्थिक गणित कोलमडतं. अशावेळी गरज पडते ती एखाद्या उत्तम आर्थिक सल्लागाराची, जो या सगळ्या परिस्थितीतून तुम्हाला कमीत कमी नुकसान झेलत, बाहेर काढू शकेल, या मालिकेत आपण अशाच समस्या आणि त्यावरील उपाय सांगणार आहोत...
-
आर्थिक व्यवहार करताना बऱ्याचदा खाचखळगे असतात, जे आपल्याला दिसत नाही. परिणामी अनेकदा नुकसान झेलावे लागते, अशावेळी आर्थिक बाबींची सगळी माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकडून नुकसान तर होणार नाही, मात्र त्यातून चांगले आर्थिक लाभ मिळतील, या मालिकेत आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत...
-
गुंतवणूक असो की संपत्तीची खरेदी- विक्री किंवा विम्याचे कवच यावर आपल्याला कर म्हणजेच टॅक्स द्यावा लागतो. एवढेच नव्हे तर दररोजच्या प्रत्येक गोष्टींवर आपण कर देतच असतो. तुम्हाला कराचं ओझं वाटत असले तरीही देशाची प्रगतीही कर उत्पन्नातूनच होत असते. तरीही कर वाचवण्यासाठी अनेक पर्यायही असतात याची माहिती आपण बुरा ना मानो टॅक्स आहे यात पाहूयात
-
या भागात जीवनात गुंतवणूक करण्यासोबतच पैशांची बचत करणेही तेवढंच महत्वाचे आहे. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी किंवा शॉपिंग करताना खर्च बहाद्दरच्या टीप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतील.
-
घर आणि दुकानं खरेदी करावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, घर आणि दुकान खरेदी करताना अनेक अडणींचा सामनाही करावा लागतो. या अडचणींवर उपाय या शोमध्ये पाहूयात.
-
आर्थिक गणितं सोडवायची झाली तर फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे. दैनंदिन आयुष्यात व्यवहार करतानाही याच फॉर्म्युल्यांची गरज पडते. कधी कुठला निर्णय घ्यावा, नक्की पैसा कधी, कुठे आणि कसा गुंतवावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी जसे फॉर्म्युले लागतात, तसा एक आर्थिक सल्लागार म्हणजेच फॉर्म्युला गुरुही गरजेचा असतो. मनी 9 मराठीचा हा फॉर्म्युला गुरु तुम्हाला हीच मदत करणार आहे.
-
कंपन्यांनध्ये काय चाललंय याची माहिती दर आठवड्याला जाणून घ्या कंपनीनामा या शो मधून. लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या कंपनीच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
-
कॉर्पोरेट विश्वातील दररोजच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
-
तुमच्या जीवनावर आणि खिशावर प्रभाव टाकणाऱ्या पर्सनल फायनान्स बद्दल विशेष बातम्या