गिफ्ट डीड करून स्थावर आणि जंगम या दोन्ही प्रकारच्या मालमत्ता भेट म्हणून देता येतात. गिफ्ट डीड करताना कोणताही आर्थिक व्यवहार होत. आर्थिक व्यवहार होत नाही याचा अर्थ इतर व्यवहारांप्रमाणे यामध्ये पैशाची देवाण-घेवाण होत नाही. घर, जमीन, शेती आणि इतर ऍसेट मुलांच्या नावाने करण्यासाठी गिफ्ट डीडचा वापर केला जातो.
आपलं घर केवळ आपल्याला छप्पर देत नाही तर आपल्याला टॅक्सची बचत करण्यासाठी खूप मोठी मदत करतं.
महागाईवर मात करायची असेल तर सोनं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. मागच्या अनेक वर्षात सोन्यामध्ये गुंतवणूकदारांना 10 ते 12% रिटर्न मिळाला आहे. त्यामुळेच, भारतीय गुंतवणूकदारांचं सोन्यावर विशेष प्रेम आहे. मात्र, आपल्याला मोठ्या प्रमाणावर सोनं आयात करावं लागतं. त्यामुळे, देशाचं परकीय चलन खर्च होतं आणि ट्रेड डेफिसिट वाढतं. यावर उपाय म्हणून सरकारने सॉव्हरिन्ग गोल्ड बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुले केले.
प्राप्तीकर भरताना तुमच्याकडून एखादे उत्पन्न लपवले गेले असेल किंवा दाखवायचे राहिले असेल तर तुम्हाला प्राप्तीकर विभगाकडून नोटिस येऊ शकते.
घटस्फोटानंतर मिळणारी पोटगीची रक्कम कशी ठरते आणि मिळणाऱ्या रकमेवर टॅक्स द्यावा लागतो का
ज्यावेळेला मुलांचं वय 18 पेक्षा कमी असतं, त्यावेळेला त्यांना मिळणारं उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडलं जातं. याला इन्कम क्लबिंग म्हणतात.
विशाल जरा काळजीत आहे, त्याचं लग्न नोव्हेंबरमध्ये होणार आहे. लग्न होणार हि समस्या नाहीये तर लग्नानंतर त्याला टॅक्स भरावा लागेल हि समस्या आहे. त्याला लग्नात नातेवाईक आणि मित्रांकडून मिळालेल्या गिफ्टवर टॅक्स भरावा लागेल, असं त्याच्या एका मित्राने सांगितलं आहे.
दिवाळीची सुट्टी संपल्यावर ते जेव्हा ऑफिसमध्ये गेले, तेव्हा मात्र त्यांना धक्का बसला. आपल्याला जो 1 लाख रुपये बोनस मिळाला आहे, त्यावर इन्कम टॅक्स स्लॅबप्रमाणे म्हणजे साधारण 33000 रुपये टॅक्स भरावा लागेल, असं त्यांच्या एका मित्राने सांगितलं. मिळालेले सगळे पैसे तर खर्च करून टाकले, आता टॅक्स भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे म्हणून राकेश यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. पण त्यांच्या मित्राने दिलेली माहिती खरी आहे का, बोनसवर इन्कम टॅक्स भरावा लागतो का या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.
बँकेकडून होमलोन घेतल्यावर टॅक्स सवलत मिळते. तशीच सवलत आई-वडिलांकडून कर्ज घेतल्यावर मिळते काय ?
घरभाड्यामध्ये सवलत मिळवायची कशी ते जाणून घ्या.