लोकसभेच्या निकालाआधी सुरक्षित शेअर्समध्ये पोर्टफोलिओ शिफ्ट करावा का?

आपल्याला आणखी नफा कमवायचा आहेच, पण त्याच वेळेला मागच्या 4 वर्षात कमावलेला प्रॉफिट रिटेनदेखील करायचा आहे. प्रॉफिट रिटेन करायचा असेल तर पोर्टफोलिओचा काही भाग आपल्याला फार्मा आणि FMCG सारख्या डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये शिफ्ट करावा लागेल.

गुंतवणुकीची प्रत्येक संधी शोधून योग्य वेळेला ती तुमच्यासमोर आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. फार्मा सेक्टरमध्ये मोठी तेजी चालू होणार, असं भाकीत आम्ही 29 जून 2023 ला केलं होतं. त्यावेळेला निफ्टी फार्मा इंडेक्स 13600 ला ट्रेड करत होता. त्यानंतर, निफ्टी फार्मा इंडेक्सने जवळपास 40% रिटर्न आहे तर निफ्टीने साधारण 18% रिटर्न दिला आहे. याचा अर्थ मागच्या 10 महिन्यात फार्मा इंडेक्सने निफ्टीला तब्बल 22 टक्याने आऊटपरफॉर्म केलं आहे. पण ज्यांनी त्यावेळेला फार्मा शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली नाही, त्यांच्याकडे अजूनही हि संधी आहे का, ते जाणून घेणं महत्वाचं आहे. यामागे मुख्य कारण आहे, स्मॉल, मिड आणि लार्जकॅपचं व्हॅल्युएशन. कोविडच्या निच्चांकापासून निफ्टी तिप्पट वाढलाय तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये तब्बल 5 पट वाढ झाली आहे. या अपट्रेन्डचा बऱ्यापैकी भाग आता पूर्ण झाला आहे, त्यामुळे आपल्याला आणखी नफा कमवायचा आहेच, पण त्याच वेळेला मागच्या 4 वर्षात कमावलेला प्रॉफिट रिटेनदेखील करायचा आहे. प्रॉफिट रिटेन करायचा असेल तर पोर्टफोलिओचा काही भाग आपल्याला फार्मा आणि FMCG सारख्या डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये शिफ्ट करावा लागेल. FMCG सेक्टरमध्ये कश्या पद्धतीने गुंतवणूक करायची, यासाठी आम्ही काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ बनवला आहे. त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही FMCG सेक्टरमध्ये गुंतवणूक करू शकता. आजचा आपला विषय आहे फार्मा सेक्टरमध्ये गुंतवणुकीचा. चला तर मग फार्मा सेक्टरचं एनालिसिस करूया आणि यातून चांगला रिटर्न कमावता येतोय का ते जाणून घेऊया.

आम्ही मागच्या वर्षी निफ्टी फार्मा इंडेक्समध्ये मोठी तेजी येईल, असं प्रेडिक्शन केलं होतं. यामागे 2 प्रमुख कारणं होते. पहिलं कारण म्हणजे फार्मा इंडेक्समध्ये मंथली चार्टवर झालेला ब्रेकआऊट. ब्रेकआऊटनंतर फार्मा इंडेक्समध्ये 4000 पॉईंट्सची तेजी झाली आहे, मात्र हा ब्रेकआऊट तब्बल 8 वर्षानंतर झाला होता. त्यामुळे, हि तेजी इतक्यात थांबण्याची शक्यता खूप कमी आहे. फार्मा इंडेक्स जर 15 किंवा 16000 पर्यंत खाली आला तर ब्रेकआऊटचा रिटेस्ट होईल आणि ती गुंतवणुकीची सुवर्णसंधी असेल. आम्ही फार्मा इंडेक्समध्ये तेजीचं प्रेडिक्शन केलं होतं, त्यामागे दुसरं कारण होतं फार्मा इंडेक्स आणि निफ्टीचा रेशिओ चार्ट. हा चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. मे 2023 मध्ये हा चार्ट खूप महत्वाच्या सपोर्टवर आला होता, त्यामुळे नवीन गुंतवणुकीसाठी रिस्क-रिवॉर्ड अतिशय फेव्हरेबल होता. 0.65 ला ट्रेड करणारा हा रेशिओ आता 0.85 च्या वर गेला आहे. मात्र, हा अपट्रेंड आत्ताच चालू झाला आहे. 2030 पर्यंत हा रेशिओ 1.50 च्या वर जाऊ शकतो. असं झालं तर निफ्टीपेक्षा फार्मा इंडेक्समध्ये वार्षिक 5 ते 7% जास्त रिटर्न मिळेल. रिटर्न तर जास्त मिळेलच पण दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे फार्मा हा डिफेन्सिव्ह सेक्टर आहे. उद्या जगात खूप मोठी मंदी आली किंवा युद्ध चालू झालं तरी फार्मा कंपन्यांच्या व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही. म्हणजे फार्मा सेक्टरमध्ये रिस्क कमी आहे आणि रिटर्न जास्त मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ रिस्क रिवॉर्ड रेशिओ अजूनही फेव्हरेबल आहे. आता कोणत्या फार्मा शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायची ते जाणून घेऊया.

जून 2023 मध्येदेखील आम्ही फार्मा शेअर्सपेक्षा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करावी, असा सल्ला आम्ही दिला होता. तोच सल्ला आम्ही आत्तादेखील देणार आहोत. फार्मा कंपन्यांचा व्यवसाय समजून घेणं बऱ्यापैकी अवघड आहे. प्रत्येक कंपनीचं बिझनेस मॉडेल वेगळं आहे, त्यातच US FDA कधी कोणता निर्णय घेईल आणि कंपनी अडचणीत येईल ते सांगता येत नाही. नेमका आपल्याकडे तो शेअर असेल पूर्ण पोर्टफोलिओवर नकारात्मक परिणाम होईल. म्हणूनच, फार्मावर आधारित सेक्टरल फंड्समध्ये गुंतवणूक केली तुलनेने कमी जोखीम असेल. SBI हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज फंड, ICICI प्रुडेन्शिअल फार्मा फंड, निप्पोन इंडिया फार्मा फंड, HDFC फार्मा अँड हेल्थकेअर फंड, कोटक हेल्थकेअर फंड किंवा अन्य फार्मा फंडमध्ये एकरकमी आणि SIP अश्या दोन्ही पद्धतीने गुंतवणूक केली तर चांगला फायदा होईल. एकरकमी गुंतवणूक करायची असेल तर 3 टप्प्यात करा. फार्मा इंडेक्स सध्या 19000 ला ट्रेड करतोय, त्यामुळे सध्याची किंमत 16000 आणि 13000 या इंडेक्स लेव्हल आपण एकरकमी गुंतवणूक केली तर आपली जोखीम कमी होईल. अश्या पद्धतीने आपण फार्मा सेक्टरमध्ये पोर्टफोलिओचा काही भाग शिफ्ट केला तर चांगला रिटर्न मिळेल आणि रिस्कदेखील कमी होईल.

Published: May 7, 2024, 16:49 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App