डेट फंडमध्ये इक्विटीपेक्षा जास्त रिटर्न मिळणार?

सगळं जग इक्विटीच्या दिशेने धावत असताना आपण आता डेट फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. सगळी गुंतवणूक नाही केली तरी किमान पोर्टफोलिओचा 10 किंवा 20% गुंतवणूक आपण डेट फंड्समध्ये शिफ्ट करू शकतो. विशेष म्हणजे डेट फंड्समध्ये गुंतवणूक केल्यावर आपली जोखीम तर कमी होईलच, पण आपल्याला रिटर्नमध्ये कोणतीही तडजोड करावी लागणार नाही. कदाचित पुढच्या 3 वर्षात डेट फंड्समध्ये इक्विटीपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो.

शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्समध्ये सगळेच गुंतवणूकदार एकाच ठिकाणी गुंतवणूक करत असतील तर, त्या गुंतवणुकीत शक्यतो चांगला रिटर्न मिळत नाही. सध्या सर्वाधिक गुंतवणूक इक्विटी आणि खासकरून स्मॉल आणि मिडकॅप फंड्समध्ये केली जात आहे. एकूण फोलीओसचा विचार केला तर स्मॉलकॅप फंडच्या फोलिओचा आकडा आता 1 कोटी 90 लाखाच्या वर गेला आहे. इक्विटी कॅटेगरीमध्ये सर्वाधिक फोलिओ स्मॉलकॅप फंड्समध्ये आहेत. याचा अर्थ सोपा आहे, पास्ट परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे गुंतवणूकदार स्मॉलकॅप फंड्समध्ये गुंतवणूक करत आहेत. फोलिओची संख्या पाहिली तर दुसरी सर्वाधिक गुंतवणूक सेक्टरल किंवा थीमॅटीक फंड्समध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर, ELSS , फ्लॅक्सिकॅप, मिडकॅप, आणि लार्जकॅप फंड्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे. आता हे आकडे पाहिल्यावर आपल्यातला कॉन्ट्रा इन्व्हेस्टर जागा झाला पाहिजे. सगळं जग इक्विटीच्या दिशेने धावत असताना आपण आता डेट फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. सगळी गुंतवणूक नाही केली तरी किमान पोर्टफोलिओचा 10 किंवा 20% गुंतवणूक आपण डेट फंड्समध्ये शिफ्ट करू शकतो. विशेष म्हणजे डेट फंड्समध्ये गुंतवणूक केल्यावर आपली जोखीम तर कमी होईलच, पण आपल्याला रिटर्नमध्ये कोणतीही तडजोड करावी लागणार नाही. कदाचित पुढच्या 3 वर्षात डेट फंड्समध्ये इक्विटीपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो. यामागे काय कारण आहे आणि डेटमध्ये कोणती कॅटेगरी सर्वाधिक रिटर्न देईल ते जाणून घेऊया.

डेट फंडवर मिळणारा रिटर्न व्याजदरांवर अवलंबून असतो. जर व्याजदर वाढत असतील तर बॉण्ड्सच्या किमती कमी होतात आणि डेट फंडच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होतो. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला व्याजदर कमी होतात त्यावेळेला बॉण्डच्या किमती वाढतात आणि डेट फंड्सवर खूप चांगला रिटर्न मिळतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुढच्या 3 ते 5 वर्षात व्याजदर सध्याच्या व्याजदराच्या तुलनेत कमी असतील का जास्त? याचं उत्तर आपल्याला भारत सरकारच्या बॉण्डचा मंथली चार्ट देईल. तुमच्यासमोर जो चार्ट दिसतोय, तो 10 वर्ष मॅच्युरिटी असणाऱ्या भारत सरकारच्या बॉण्डचा चार्ट आहे. व्याजदर सध्या 7.2 टक्यावर आहे, चार्ट बघितल्यावर आपण एक गोष्ट क्लिअर होतीये ती म्हणजे हा आकडा आता अतिशय महत्वाच्या रेसिस्टन्सजवळ ट्रेड करतोय. त्यामुळे, व्याजदरात वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे, आणि वाढ झालीच तरी फार फार तर अर्धा टक्का वाढ होऊ शकते. मात्र, व्याजदर कपात चालू झाली तर या चार्टवर सपोर्ट थेट साडे 4 टक्यावर आहे. याचा अर्थ जर व्याजदरकपात झाली तर ती अडीच ते पावणे तीन टक्के होऊ शकते. डिसेंबर 2013 ते डिसेंबर 2016 आणि सप्टेंबर 2018 ते जुलै 2020 दरम्यान व्याजदरांमध्ये अशीच 2 ते 3 टाक्यांची घसरण झाली होती. या काळात लॉन्ग टर्म डेट फंड्सनी सर्वाधिक रिटर्न दिला होता. व्याजदर कमी झाले तर सर्वाधिक फायदा जास्त मॅच्युरिटी असणाऱ्या लॉन्ग टर्म बॉण्ड्सला होतो. या दरम्यान किती रिटर्न मिळाला होता ते आता जाणून घेऊया म्हणजे पुढच्या 3 4 वर्षात आपल्याला किती रिटर्न मिळू शकतो त्याचा अंदाज येईल.

आपण ICICI प्रुडेन्शिअल लॉन्ग टर्म बॉण्ड फंडचा पास्ट परफॉर्मन्स चेक करूया. डिसेंबर 2013 ते डिसेंबर 2016 या 3 वर्षात या लॉन्ग ड्युरेशन डेट फंडने गुंतवणूकदारांना तब्बल 48% रिटर्न दिला. वार्षिक रिटर्नचा विचार केला तर या फंडने त्या 3 वर्षात साधारण 14% CAGR रिटर्न दिला होता. निफ्टीने वार्षिक केवळ 10% रिटर्न दिला. याचा अर्थ ज्यावेळेला व्याजदर कमी होतात त्यावेळेला लॉन्ग ड्युरेशन डेट फंड इक्विटीपेक्षा जास्त रिटर्न देऊ शकतात. आता सप्टेंबर 2018 ते जुलै 2020 या 21 महिन्यात काय झालं, ते जाणून घेऊया. या दरम्यान ICICI प्रुडेन्शिअल लॉन्ग ड्युरेशन फंडने तब्बल 31.4% रिटर्न दिला. वार्षिक रिटर्नचा विचार केला तर या 21 महिन्यात ICICI लॉन्ग ड्युरेशन फंडने 16% CAGR रिटर्न दिला. या दरम्यान निफ्टीने मात्र केवळ अडीच टक्के रिटर्न दिला. याचा अर्थ या सायकलमध्ये देखील लॉन्ग ड्युरेशन फंड्सनी इक्विटीला आऊटपरफॉर्म केलं. आता अश्याच प्रकारची सायकल पुढच्या 3 ते 5 वर्षात पाहायला मिळेल, असा आमचा अंदाज आहे. त्यामुळे, पोर्टफोलिओचा काही भाग आपण लॉन्ग ड्युरेशन फंड्समध्ये शिफ्ट केला तर जोखीम कमी होईल आणि रिटर्न ही चांगला मिळेल.

Published: May 8, 2024, 14:25 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App