-
सोन्यानं पुन्हा एकदा विक्रमी झेप घेतलीय. भारतातच नव्हे तर जगभरात सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे कॉमेक्सवर पहिल्यांदाच सोनं 2100 डॉलर प्रति औंसचा टप्पा पार केलाय. MCX वर प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 64,000 रुपयांवर पोहचलाय. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ होऊन प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 64,350 रुपयांवर पोहचलाय. तर 18 कॅरेट सोन्यामध्येही 330 रुपयांची वाढ होत प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 48270 रुपयांवर पोहचलाय. इस्राईल- पॅलेस्टाईन युद्धामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झालीय त्यामुळेही सोन्याचे दर वाढत आहेत. अमेरिकेत फेड व्याज दर कमी करण्याची शक्यता असल्यानं सोन्याच्या दरात वाढ झालीय. तसेच बिटकॉईनमध्येही तेजी दिसून येत आहे.
-
RBI या बॉण्डवर वार्षिक अडीच टक्के व्याज देखील देते. यामुळे, गुंतवणूकदारांना गोल्ड बॉण्डवर मागच्या 8 वर्षात वार्षिक 12 टक्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाला आहे. गोल्ड बॉण्डवर चांगला रिटर्न मिळतो आणि मॅच्युरिटीपर्यंत हे बॉण्ड विकले नाही तर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत नाही, हे फायदे आपल्यापैकी अनेकांना माहित आहेत. मात्र, गोल्ड बॉण्डचा आणखी एक फायदा आहे, तो म्हणजे त्यावर लोन घेता येतं.
-
सोन्याची आयात वाढल्यानं पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार असलेले निलेश शाह यांनी टीका केलीय. सोन्याची आयात कमी राहिली असती तर भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी पाच लाख कोटींच्या वर गेला असता असंही शाह यांनी म्हटलं आहे. गेल्या 21 वर्षात भारतीयांनी 500 बिलियन डॉलरच्या सोन्याची आयात केल्याची माहितीही शाह यांनी दिलीय.
-
गोल्ड बॉण्डमधून पैसे काढता येतील का, पैसे काढले तर काही पेनल्टी लागेल का आणि पैसे काढायची प्रोसेस कशी करायची, असे अनेक प्रश्न मीराच्या मनात आहेत. जर मीराप्रमाणे तुम्हीदेखील RBI च्या गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केली असेल, तर या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेणं तुमच्यासाठी देखील महत्वाचं आहे. भविष्यात कधी पैसे काढायची वेळ आली, तर या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल. गोल्ड बॉण्ड रिडिम करण्याची प्रोसेस काय आहे, ते आता जाणून घेऊया.
-
तुम्ही सोन्यात अनेक प्रकारे गुंतवणूक करू शकता आणि त्यावर वेगवेगळे कर नियम आहेत.
-
डिजिटल सोन्याला प्रचंड लोकप्रियता मिळत असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास अधिक पसंती दर्शवली आहे.
-
अनेक ज्वेलर्सकडे सणासुदीच्या काळात ऑफर असतात पण त्याआधी या बाबी जाणून घ्या.
-
दुकानात जाऊन सोन्याचे दागिने खरेदी केले तर 15 ते 20% रक्कम मेकिंग चार्जेसमध्ये जाते. सोनं मोडायच्या वेळेला परत घट धरली जाते. म्हणजे, दोन्हीकडून नुकसान होतं. गोल्ड कॉईन खरेदी करायचा असेल तरी GST भरावाच लागतो. शिवाय सोनं सांभाळायची जोखीम असते ती वेगळीच. या संदर्भात कार्तिक त्याच्या मित्रांसोबत चर्चा करत होता, त्यावेळेला हरीशने कार्तिकला गोल्ड म्युच्युअल फंडबद्दल माहिती दिली.
-
राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.
-
देशभरात नवरात्रौत्सव सुरू आहे. नवरात्रौत्सवानंतर 24 कॅरेट सोन्याचा भावही साठ हजार रुपयांच्यावर पोहचलाय. इस्त्रायल-हमास युद्ध आणि वाढती मागणी यामुळे सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळतेय. भारतातील सर्वच शहरात सोन्याच्या दरात तेजी आहे. शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात 500 ते एक हजार रुपयांची वाढ पाहायला मिळाली. 22 कॅरेट सोन्याचा दर 55,000 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 60,100 रुपये प्रति तोळ्यावर पोहचलाय. एक किलो चांदीचा दर हा 74,100 रुपयांवर पोहचलाय.