करोडपती होण्यासाठी फॉर्म्युला 12-15-20

लिक्विड ऍसेट्स असणारा करोडपती होण्यात खरी मजा आहे. मात्र, हे उद्दिष्ट साध्य करणं इतकं सोपं नाहीये. यासाठी फॉर्म्युला 12 15 20 आपल्याला उपयोगी पडेल. 1 कोटींचा लिक्विड पोर्टफोलिओ बनवण्यासाठी दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल, यावर किती % रिटर्न मिळेल आणि किती वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण होईल. ते आता जाणून घेऊया.

करोडपती होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. तसं बघितलं तर पुणे मुंबईसारख्या ज्यांचं घर आहे किंवा ज्यांच्याकडे 10 एकारपेक्षा जास्त शेती आहे, ते करोडपती आहेतच. मात्र, घर किंवा शेती आपण सहसा विकत नाही. यापैकी बरीच संपत्ती आपल्याकडे वारसाहक्काने आलेली असते. त्यामुळे, स्वतःच्या कर्तृत्वावर करोडपती होण्याचं समाधान यातून मिळत नाही. 1 कोटीची रिअल इस्टेट असणं आणि 1 कोटींचे लिक्विड ऍसेट्स म्हणजे सोनं, FD , म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्स असणं यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. रिअल इस्टेटमध्ये कितीही संपत्ती असली तरी ती आपण लगेच विकू शकत नाही. मात्र, सोनं, FD , म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्समधून आपण काही तासात पैसे काढू शकतो. म्हणूनच, लिक्विड ऍसेट्स असणारा करोडपती होण्यात खरी मजा आहे. मात्र, हे उद्दिष्ट साध्य करणं इतकं सोपं नाहीये. यासाठी फॉर्म्युला 12 15 20 आपल्याला उपयोगी पडेल. 1 कोटींचा लिक्विड पोर्टफोलिओ बनवण्यासाठी दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल, यावर किती % रिटर्न मिळेल आणि किती वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण होईल. ते आता जाणून घेऊया.

फॉर्म्युला 12 15 20 मध्ये 12 हा अपेक्षित वार्षिक रिटर्न आहे, 15 हा गुंतवणुकीचा कालावधी आहे, म्हणजे आपल्याला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. शेवटी 20 म्हणजे 20000 रुपये ही आपली दर महिन्याची गुंतवणूक आहे. याचा अर्थ जर आपण 15 वर्षांसाठी दर महिन्याला 20000 रुपयाची गुंतवणूक केली आणि त्यावर आपल्याला सरासरी 12 ते 12.5% वार्षिक रिटर्न मिळाला तर आपला 1 कोटींचा पोर्टफोलिओ तयार होईल. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही गुंतवणूक नक्की कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये करायची? याचं उत्तर सोपं आहे, ज्या ऍसेटमध्ये आपल्याला 12% रिटर्न मिळू शकतो, अश्याच ऍसेटमध्ये आपल्याला ही गुंतवणूक करावी लागेल. ऐतिहासिक आकडेवारीचा विचार केल्यास, 12 टक्यापेक्षा जास्त रिटर्न म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये मिळतो. याचं बरोबर आता आपल्याकडे आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे तो म्हणजे रिजर्व बँकेचे गोल्ड बॉण्ड. गोल्ड बॉण्डवर सरकार अतिरिक्त अडीच % व्याज देतं, त्यामुळे सोन्यात दर वर्षी सरासरी मिळणारं 10% ऍप्रिसिएशन आणि अडीच % व्याज, असा एकूण 12 ते 12.5% वार्षिक रिटर्न मिळू शकतो. आपण RBI च्या गोल्ड बॉण्डमध्ये 20000 पैकी काही रक्कम टाकली, तर आपलं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं. सोनं आणि शेअर मार्केट विरुद्ध दिशेला चालतात, त्यामुळे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होतो. शेअर मार्केट खाली आलं तर सोन्यात चांगला रिटर्न मिळतो आणि जोखीमदेखील कमी होते. आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंड्सचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

तुम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये जी रक्कम गुंतवायची आहे, त्याचे 5 भाग करा आणि 5 वेगवेगळ्या फंड्समध्ये गुंतवणूक करा. ब्ल्यू चिप, फ्लॅक्सि कॅप, व्हॅल्यू फंड, बॅलन्स्ड एडव्हान्टेज आणि मल्टी- ऍसेट एलोकेशन या 5 कॅटेगरीमध्ये आपण सिप चालू करू शकतो. यापैकी, ब्ल्यू चिप आणि फ्लॅक्सि कॅपची कामगिरी शेअर मार्केटवर अवलंबून असेल. व्हॅल्यू फंड हादेखील इक्विटी फंड आहे, मात्र यामध्ये व्हॅल्यू इन्वेस्टींग केलं जातं. त्यामुळे, हा फंड इतर इक्विटी फंड्सला कॉम्प्लिमेंट करतो. बॅलन्स्ड एडव्हान्टेज आणि मल्टी-ऍसेट एलोकेशन फंड हे मिडीयम रिस्क फंड आहेत, ज्यामध्ये साधारण 12% रिटर्न मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये पडझड झाली तर या फंड्समध्ये कमी जोखीम होते. मल्टी-ऍसेट एलोकेशन फंड शेअर्स, सोनं आणि इतर ऍसेट्समध्ये गुंतवणूक करतो. त्यामुळे, या फंडमध्ये खूप जास्त चढ-उतार होत नाहीत. SBI ब्ल्यूचिप फंड, पराग पारीख फ्लॅक्सि कॅप फंड, ICICI व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड, कोटक बॅलन्स्ड एडव्हान्टेज फंड आणि HDFC मल्टी-ऍसेट फंड अश्या 5 फंड्सचा पोर्टफोलिओ बनवून जर आपण नियमित SIP केली तर आपला 1 कोटींचा पोर्टफोलिओ नक्की तयार होईल. या कॉर्पसवर आपल्याला नंतर वार्षिक 6% रिटर्न मिळाला, तरी दर महिन्याला 50000 रुपयाचा पॅसिव्ह इन्कम चालू होईल. फॉर्म्युला 12 15 20 चा वापर करा आणि लिक्विड ऍसेट्सच्या माध्यमातून करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करा.

Published: May 8, 2024, 14:30 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App