रिलायन्सच्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी का?

रिलायन्सने योग्य वेळेला विविध सेक्टरमध्ये डायव्हर्सिफाय केलं आहे. त्यांच्या पारंपरिक पेट्रोकेमिकल्स बिझनेसमधून मिळणारा पैसा त्यांनी रिटेल, टेलिकॉम आणि न्यू एनर्जी बिझनेसमध्ये गुंतवला. आता या बिझनेससाठी लागणारं कॅपेक्स जवळपास संपलं आहे. त्यामुळे, याआधी केलेली गुंतवणूक रिलायन्सच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये आता दिसायला सुरुवात होईल. रिलायन्सला आता कोणते महत्वाचे ट्रिगर आहेत, शेअर ओव्हर वॅल्यूड आहे का अंडर वॅल्यूड आणि या शेअरमध्ये आता गुंतवणूक करावी का, ते आता जाणून घेऊया.

काही कंपन्या अश्या असतात, ज्यांचा व्यवसाय कोणतंही सरकार आलं तरी टिक्याच वेगाने वाढतं. अशीच कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. 1990 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, त्या वेळेला रिलायन्सचा व्यवसाय वाढला. त्यानंतर 1990 आणि 91 मध्ये VP सिंग आणि चंद्रशेखर साधारण 1 1 वर्ष पंतप्रधान राहिले. त्यानंतर, कधी काँग्रेस तर कधी NDA चं सरकार आलं. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी मेजॉरिटी मिळवली आणि सरकार बनवलं. या सगळ्या फेजमध्ये रिलायन्सने तितक्याच वेगाने त्यांचा व्यवसाय वाढवला. एकेकाळी पेट्रोकेमिकल्सवर अवलंबून असणारी ही कंपनी आणि टेलिकॉम, रिटेल, न्यू एनर्जी, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि मीडियासारख्या अनेक सेक्टर्समध्ये मार्केट लीडर झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचं मार्केट कॅप आता 19 लाख कोटींच्या वर गेलं आहे. मागच्या 10 वर्षात रिलायन्सच्या उत्पन्नात साधारण दुप्पट वाढ झाली आहे, पण कंपनीचा नफा 20000 कोटींपासून 80000 कोटींच्या जवळ गेला आहे. याचा अर्थ कंपनीने सातत्याने प्रॉफिट मार्जिनमध्ये वाढ केली आहे. एवढ्या मोठ्या बेसवर उत्पन्न आणि प्रॉफिट मार्जिन वाढवण्याचं शिवधनुष्य केवळ मुकेश अंबानीच पेलू शकतात. रिलायन्सने योग्य वेळेला विविध सेक्टरमध्ये डायव्हर्सिफाय केलं आहे. त्यांच्या पारंपरिक पेट्रोकेमिकल्स बिझनेसमधून मिळणारा पैसा त्यांनी रिटेल, टेलिकॉम आणि न्यू एनर्जी बिझनेसमध्ये गुंतवला. आता या बिझनेससाठी लागणारं कॅपेक्स जवळपास संपलं आहे. त्यामुळे, याआधी केलेली गुंतवणूक रिलायन्सच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये आता दिसायला सुरुवात होईल. रिलायन्सला आता कोणते महत्वाचे ट्रिगर आहेत, शेअर ओव्हर वॅल्यूड आहे का अंडर वॅल्यूड आणि या शेअरमध्ये आता गुंतवणूक करावी का, ते आता जाणून घेऊया.

रिलायन्सला जिथे जिथे व्यवसायाची संधी दिसली, तिथे त्यांनी जोरदार एक्सपान्शन केलं. सुरुवातीला थोडं नुकसान झालं तरी चालेल पण पैसा खर्च करायचा आणि काहीही झालं तरी त्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर बनायचं ही मुकेश अंबानींची व्यवसाय करण्याची पद्धत आहे. आता व्यवसायाची वाढ करायची असेल तर कर्ज हे घ्यावंच लागतं. रिलायन्सने मागच्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं. 2013 मध्ये कंपनीच्या बॅलन्स शीटवर साधारण 1 लाख कोटींचं कर्ज होतं, 2013 मध्ये हा आकडा साडे चार लाख कोटींच्या पार गेला. मात्र, मागच्या अनेक AGM मध्ये मुकेश अंबानींनी कर्ज कमी करण्याबाबत प्लॅन जाहीर केला आहे. त्यानुसार, कंपनीने कर्ज कमी करायला सुरुवात केली. 2023 मध्ये साडे लाख कोटींच्या कर्जाच्या तुलनेत रिलायन्सवर 2024 च्या अखेरीला 3 लाख 46 हजार कोटींचं कर्ज होतं. टेलिकॉम बिझनेसमध्ये 5 G च्या लॉन्चिंगसाठी रिलायन्सने खूप मोठी गुंतवणूक केली, मात्र ही गुंतवणूक आता पूर्ण झाली आहे. तसेच, कंपनीने अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी, कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीसारख्या संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवल उभं केलं आणि कर्जाची परतफेड केली. आमच्या मते रिलायन्सने डेट रिडक्शनला आता सुरुवात केली आहे, त्यामुळे कंपनीचा व्याजावर होणारा खर्च कमी होईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या प्रॉफिटॅबिलिटीवर होईल.

रिलायन्ससाठी दुसरा महत्वाचा ट्रिगर आहे डी-मर्जरचा. मुकेश अंबानींना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. कोणत्या मुलाला कोणता व्यवसाय द्यायचा हे मुकेश अंबानींनी ठरवलं आहे. सक्सेशन प्लँनिंगचा भाग म्हणून कंपनीने डी-मर्जरची प्रक्रिया चालू केली आहे. मागच्या वर्षी जिओ फायनान्सचं डी-मर्जर झालं. साधारण 240 रुपयाला हा शेअर ट्रेड करत असताना आम्ही या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. 23 एप्रिलला या शेअरने 394 रुपयाचा उच्चांक नोंदवला आणि हा शेअर आता 360 रुपयाच्या जवळ ट्रेड करतोय. ऑगस्ट 2023 मध्ये या शेअरचं लिस्टिंग झालं तेव्हा पासून जिओ फायनान्सच्या शेअरने साधारण 40% रिटर्न दिला आहे, तर या दरम्यान रिलायन्सचा शेअर केवळ 15% वाढला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, डी-मर्जरमुळे रिलायन्सच्या शेअरहोल्डरला फायदाच झाला आहे. आता अश्याच प्रकारचं डी-मर्जर रिटेल, टेलिकॉम, न्यू एनर्जी आणि इतर बिझनेसचं होऊ शकतं. हे डी-मर्जर नक्की कधी होईल ते सांगता येत नाही, मात्र पुढच्या काही वर्षात हे होणार हे निश्चित आहे. त्यामुळे, ज्यांच्याकडे रिलायन्सचे शेअर्स असतील त्यांना डी-मर्जरनंतर नवीन कंपनीचे शेअर्स स्वस्तात मिळतील. या सगळ्या गोष्टींचा विचार करता, रिलायन्सच्या शेअरमध्ये आपण टप्याटप्याने गुंतवणूक करू शकतो. 7 मे ला या शेअरने महत्वाचा सपोर्ट ब्रेक केला आहे, त्यामुळे शेअरमध्ये पुढचे काही दिवस घसरण होऊ शकते. 2200 ते 2600 रुपयाच्या रेंजमध्ये आपण रिलायन्सचा शेअर टप्याटप्याने खरेदी केला तर व्हॅल्यू बाईन्ग करता येईल. त्यानंतर, हे शेअर्स दीर्घकालावधीसाठी होल्ड केले तर चांगला रिटर्न मिळू शकेल. त्यामुळे, रिलायन्सच्या शेअरकडे लक्ष ठेवा आणि प्रत्येक घसरणीमध्ये शेअरमध्ये गुंतवणूक करा.

Published: May 15, 2024, 14:26 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App