म्युच्युअल फंड संदर्भात 5 बेसिक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

कोणतीही नवीन गुंतवणूक चालू करण्यापूर्वी आपण जर त्या इन्स्ट्रुमेंटची सविस्तर माहिती घेतली तर त्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. म्हणूनच आजच्या व्हिडीओमधून आपण म्युच्युअल फंड संदर्भातल्या काही बेसिक गोष्टी जाणून घेणार आहोत.

भारतातली म्युच्युअल फंड इंडस्ट्री अतिशय झपाट्याने वाढतीये. SIP चा आकडा आता दर महिन्याला 19000 कोटींच्या पार गेला आहे, तर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या एकूण AUM चा आकडा 50 लाख कोटींच्या वर गेला आहे. भारतातली म्युच्युअल फंड इंडस्ट्री तशी 1963 मध्ये चालू झाली, म्हणजे ही इंडस्ट्री 60 वर्ष जुनी आहे. पण पहिल्या 55 वर्षात जेवढी वाढ झाली त्याच्यापेक्षा दुप्पट वाढ मागच्या 5 वर्षात झाली. तुमच्यापैकी अनेकांनी मागच्या काही वर्षात म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक चालू केली असेल किंवा अजून केली नसेल तर भविष्यात तुम्ही ही गुंतवणूक चालू करू शकता. कोणतीही नवीन गुंतवणूक चालू करण्यापूर्वी आपण जर त्या इन्स्ट्रुमेंटची सविस्तर माहिती घेतली तर त्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. म्हणूनच आजच्या व्हिडीओमधून आपण म्युच्युअल फंड संदर्भातल्या काही बेसिक गोष्टी जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट आहे फंडचा प्रकार. म्युच्युअल फंड्समध्ये 3 प्रमुख कॅटेगरी आहेत, इक्विटी, हायब्रीड आणि डेट. इक्विटी कॅटेगरीमध्ये साधारण 15% रिटर्न मिळू शकतो, मात्र यामध्ये सर्वाधिक जोखीम असते. 10 वर्षाच्या एका सायकलमध्ये शेअर मार्केटमध्ये किमान एकदातरी मोठा क्रॅश येतो, ज्यामध्ये उच्चांकापासून 40 ते 70% घसरण होऊ शकते. दुसरी कॅटेगरी आहे हायब्रीड ज्यामध्ये साधारण 10 ते 12% रिटर्न मिळतो आणि मध्यम जोखीम असते. तिसरी कॅटेगरी आहे डेट फंड्सची, ज्यामध्ये खूप कमी जोखीम असते आणि साधारण FD एवढा रिटर्न मिळतो. तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीनुसार कॅटेगरीची निवड करा, गुंतवणूक लॉन्ग टर्मसाठी म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी करायची असेल तर इक्विटीमध्ये गुंतवणूक करा. कालावधी 5 ते 10 वर्ष असेल तर हायब्रीड फंडमध्ये गुंतवणूक करा आणि कालावधी 5 वर्षापेक्षा कमी असेल तर डेट फंडमध्ये गुंतवणूक करा.

म्युच्युअल फंड संदर्भात दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फंडचा प्रकार. प्रत्येक फंडच्या पुढे तुम्हाला रेग्युलर किंवा डायरेक्ट असं लिहिलेलं असतं. डिस्ट्रिब्युटर किंवा बँकेकडून तुम्ही रेग्युलर फंडमध्ये खरेदी करू शकता. तर दुसऱ्या बाजूला झिरोधा, ग्रो, ET मनीसारख्या अँपवरून डायरेक्ट फंड खरेदी करू शकता. डायरेक्ट फंड्समध्ये रेग्युलर फंडपेक्षा साधारण 0.3 ते 0.7% जास्त रिटर्न मिळतो, मात्र रेग्युलर फंडमध्ये तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे, कोणत्या कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करायची त्याचा विचारपूर्वक निर्णय घ्या. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे फंडमध्ये असणारे डिविडेंड आणि ग्रोथ ऑप्शन. डिविडेंड ऑप्शनमध्ये ठराविक कालावधीनंतर नियमित उत्पन्न मिळतं, तर ग्रोथ ऑप्शनमध्ये नियमित डिविडेंड मिळत नाही पण फंडची NAV वाढत जाते. वेल्थ क्रिएशनसाठी ग्रोथ ऑप्शन जास्त चांगला आहे.

पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे एक्सपेन्स रेशिओ. आपण म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतो, त्यातला काही भाग म्युच्युअल फंड कंपनी फंड मॅनेजमेंट फी म्हणून कापते, यालाच एक्सपेन्स रेशिओ म्हणतात. तुमच्यासमोर जी माहिती दिसतीये ती SBI ब्ल्यूचिप फंडच्या रेग्युलर प्लॅनची माहिती आहे. या फंडचा एक्सपेन्स रेशिओ आहे 1.54% याचा अर्थ तुम्ही जर या फंडमध्ये 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर म्युच्युअल फंड कंपनी तुमच्या गुंतवणुकीतून 1540 रुपये काढून घेईल. आपल्याला जो रिटर्न दिसतो तो ही फी कापल्यावर मिळणारा रिटर्न असतो. त्यामुळे, आपल्याला जी NAV मिळते ती फी कापल्यानंतरची असते. पण गुंतवणूक चालू करताना आपण एक्सपेन्स रेशिओ बघितला पाहिजे. आजचा आपला शेवटचा पॉईंट आहे फंडची कामगिरी. आपण गुंतवणूक चालू करताना मागच्या 1 2 किंवा 3 वर्षाचा रिटर्न बघून निर्णय घेतो. मात्र, शेअर मार्केटची साधारण 10 वर्षाची सायकल असते. त्यामुळे, आपण फंडची तुलना करताना 10 वर्षाचा रिटर्न बघितला पाहिजे. मागच्या 10 वर्षात फंडमध्ये जेवढा रिटर्न मिळाला आहे, आपण तेवढ्याच रिटर्नची अपेक्षा ठेवली पाहिजे. त्यापेक्षा खूप जास्त रिटर्न मिळेल असं जर कोणी मार्केटिंग केलं तर त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. SBI ब्ल्यूचिप फंडने मागच्या 1 वर्षात 25% रिटर्न दिला आहे. मात्र आपल्याला तेवढा रिटर्न लॉन्ग टर्म मिळणारं नाही, हे लक्षात ठेवा. या फंडने 10 वर्षात साधारण 12% रिटर्न दिला आहे, आपण तेवढा रिटर्न मिळेल अशी अपेक्षा करू शकतो. त्यामुळे, फायनान्शिअल प्लॅनिंग करताना फंडची दीर्घकालाईन कामगिरी बघा आणि मगच गुंतवणूक चालू करा.

Published: May 7, 2024, 16:54 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App