ज्येष्ठ नागरिकांनी इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी का?

महागाई हा ज्येष्ठ नागरिकांचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्यांना पुरेशी पेन्शन मिळतिये, त्यांना महागाईची झालं बसलं नाही, कारण त्यांचा महागाई भत्ता वाढत जातो. त्यामुळे, महागाई वाढली तर त्याचं प्रमाणात त्यांची पेन्शन वाढते. मात्र, ज्या ज्येष्ठ नागरिकांचा खर्च FD च्या व्याजावर चालू आहे, ते महागाईमुळे अडचणीत सापडतात. सुरुवातीला उत्पन्न आणि खर्चाचं गणित जमतं, मात्र कालांतराने महागाई वाढत जाते पण FD चं व्याज आहे तेवढंच राहतं किंवा ते कमीदेखील होऊ शकतं.

सुबोध यांनी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये 35 वर्ष नोकरी केली, मागच्या महिन्यात ते रिटायर झाले. खाजगी नोकरी असल्यामुळे त्यांना खूप जास्त पेन्शन मिळणार नाही, त्यांना केवळ दरमहा 7000 रुपये पेन्शन मिळणार आहे. मात्र, प्रोविडेंट फंड आणि ग्रॅच्युइटीचे मिळून त्यांना 40 लाख रुपये मिळाले. त्यांनी केंद्र सरकारच्या सिनिअर सिटीझन सेविंग्स स्कीममध्ये ही रक्कम गुंतवली. या योजनेवर केंद्र सरकार सध्या 8.2% व्याज देतंय, जे कोणत्याही बँकेच्या FD पेक्षा जास्त आहे. या सरकारी FD तुन त्यांना दर महिन्याला साधारण 28000 व्याज मिळेल आणि 7000 रुपये पेन्शन, असं एकूण 35000 रुपये नियमित उत्पन्न चालू होईल. सुबोध यांचे दोन्ही मुलं नोकरी करतात, त्यामुळे सोबोध यांना केवळ त्यांचा पत्नीचा एवढाच खर्च करायचा आहे. घर स्वतःचं आहे, सगळे लोन निल झाले आहेत. त्यामुळे, दैनंदिन खर्च आणि औषधांचा खर्च एवढे 2 प्रमुख खर्च त्यांना करावे लागतील. यासाठी त्यांना दर महिन्याला 25000 रुपये खर्च करावा लागेल. 35 मधून 25 गेले म्हणजे त्यांच्याकडे 10000 रुपये शिल्लक आहेत. सुबोध यांच्याप्रमाणे इतर ज्येष्ठ नागरिकांकडे काही पैसे दर महिन्याला शिल्लक राहत असतील, तर त्यांना इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी का, ते जाणून घेऊया.

ज्येष्ठ नागरिकांनी इक्विटीमध्ये गुंतवणूक करू नये, असा आमचा सल्ला आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक मध्यम जोखीम असणाऱ्या बॅलन्स्ड एडव्हान्टेज फंड किंवा मल्टी-ऍसेट फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. करू शकतात नाही तर त्यांनी या फंड्समध्ये गुंतवणूक केलीच पाहिजे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने मासिक उत्पन्नाच्या किमान 10 ते 20% नियमितपणे या फंड्समध्ये टाकली पाहिजे. आम्ही असं का म्हणतोय, ते आधी समजून घेऊया. महागाई हा ज्येष्ठ नागरिकांचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्यांना पुरेशी पेन्शन मिळतिये, त्यांना महागाईची झालं बसलं नाही, कारण त्यांचा महागाई भत्ता वाढत जातो. त्यामुळे, महागाई वाढली तर त्याचं प्रमाणात त्यांची पेन्शन वाढते. मात्र, ज्या ज्येष्ठ नागरिकांचा खर्च FD च्या व्याजावर चालू आहे, ते महागाईमुळे अडचणीत सापडतात. सुरुवातीला उत्पन्न आणि खर्चाचं गणित जमतं, मात्र कालांतराने महागाई वाढत जाते पण FD चं व्याज आहे तेवढंच राहतं किंवा ते कमीदेखील होऊ शकतं. सुबोध यांचं उत्पन्न सध्या आहे 35000 रुपये आणि त्यांचा खर्च आहे 25000 रुपये. मात्र, 10 वर्षानंतर खर्च डबल होईल, म्हणजे खर्च होईल महिन्याला 50000 रुपये आणि FD तुन मिळणारं व्याज राहील 35000 रुपये. थोडक्यात काय तर महागाईमुळे त्यांच्या FD ची परजेसिंग पॉवर कमी झाली. भारतात सध्या 15 कोटींपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आणि दिवसेंदिवस हा एकदा वाढतच जाईल. त्यामुळे, महागाईवर मात करून आपली परजेसिंग पॉवर टिकवण्यासाठी काय मार्ग आहे, ते जाणून घेऊया.

सुबोध यांनी दर महिन्याला बॅलन्स्ड एडव्हान्टेज किंवा मल्टी-ऍसेट फंड्समध्ये 10000 रुपयाची SIP चालू केली आणि त्यांना या गुंतवणुकीवर वार्षिक 12% रिटर्न मिळाला, तर 10 वर्षात त्यांच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू होईल 22 लाख 42 हजार रुपये. 10 वर्षानंतर त्यांना FD तुन 35000 रुपये व्याज मिळेल, पण त्यांचा खर्च असेल 50000 रुपये. त्यांना आता अतिरिक्त 15000 रुपयाची गरज आहे, ही रक्कम ते दर महिन्याला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमधून SWP च्या माध्यमातून काढू शकतात. त्या 22 लाख 42 हजारच्या पोर्टफोलिओवर 10 ते 12 % रिटर्न त्यांना मिळेल, याचा अर्थ त्यांनी महिन्याला 15 ते 20 हजार रुपये यातून काढले तरी त्यांचा पोर्टफोलिओ कमी होणार नाही. अश्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांनी हायब्रीड फंड्समध्ये दर महिन्याला SIP च्या माध्यमातून गुंतवणूक केली तर त्यांना उतार वयात पैशाचं टेन्शन घ्यावं लागणार नाही.

Published: May 4, 2024, 19:43 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App