सोन्याचा नवा उच्चांक, यंदा सोनं 70 हजार होणार

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

नांदेड जिल्ह्यातील MVK Agro Food Product ही कंपनी एनएसईच्या SME प्लटफॉर्मवर लिस्ट झाली आहे. मात्र, कंपनीचा शेअर 120 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या ३४.१७ टक्के कमी म्हणजे 79 रुपयांवर लिस्ट झाला आहे. लिस्ट झाल्यानंतर शेअरला पाच टक्क्यांचा अप्पर सर्किट लागलाय.
नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे सध्या कंपनीचा साखर कारखाना, गूळ कारखाना आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा प्रकल्पा आहे.
आयपीओद्वारे उभारण्यात आलेल्या भांडवलाचा वापर इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी, तसेच बायेसीएनजी आणि खत निर्मिती प्रकल्पासोबतच कंपनीच्या दररोजच्या कामकाजासाठी वापरला जाणार आहे. शेअर लिस्ट झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मात्र नुकसान सोसावं लागलंय.

बँकांनी ग्राहकांना क्रेडिट अथवा डेबिट कार्ड देताना वेगवेगळ्या कार्ड नेटवर्कचा पर्याय उपलब्ध करून द्यावा,असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिलेत. आरबीआयच्या या निर्मयामुळे ग्राहकांना नूतनीकरणावेळी व्हिसा,मास्टरकार्ड, रूपे, अॅमेक्स यापैकी कोणतंही कार्ड निवडता येणार आहे.
2025 ते 2031 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6.7%.टक्के दरानं वाढल्यास अर्थव्यवस्था सात लाख कोटी रुपयांची होणार असल्याचं क्रिसिल या संस्थेनं म्हटलंय. त्यामुळे भारताची जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल त्यासोबतच दरडोई उत्पन्नातही वाढ होणार असल्यानं 2031 मध्ये भारत उच्च मध्यमवर्गीयांचा देश होऊ शकतो,असं अहवालात नमूद करण्यात आलंय

निवडणूक रोख्यांचा तपशीर जाहीर करण्यास एसबीआय दिरंगाई करत असल्यानं लोकशाही सुधारणा मंच म्हणजेच The Association for Democratic Reforms ने भारतीय स्टेट बँकेच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. सहा मार्चपर्यंत भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करावेत,असे निर्देश दिले होते. मात्र,भारतीय स्टेट बँकेने तपशील सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ देण्याची विनंती न्यायालयात केली आहे.

जागतिक बाजारात मजबूती निर्माण झाल्यानं सोन्याचे दर पुन्हा एकदा नव्या उच्चाकांवर पोहचले आहेत. 2024 मध्ये सोन्याचा दर प्रति तोळ्याला सत्तर हजार रुपयांपर्यंत पोहचू शकतो. गुरूवारी एमसीएक्सवर दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 65,205 वर पोहचला. तर एक किलो चादीचा दर हा 74,444 रुपयांवर पोहचलाय.

2023-24 या आर्थिक वर्षात पंतप्रधान पीक योजनेअंतर्गत सुमारे चार कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केलीय.2022-23 च्या तुलनेत पिक विमा योजनेत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 37 टक्के वाढ झालीय. विशेष म्हणजेच 42 टक्के शेतकऱ्यांनी पीक कर्ज न घेताही पिक विमा योजनेत सहभाग घेतलाय. पिक विमा योजनेअतंरग्त सहा कोटी हेक्टर क्षेत्राला विम्याचे कवच मिळालेआहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त एक रुपये भरून पिक विमा योजनेत सहभाग घेता येतो. भारतातील पिक विमा योजना ही जगातील तिसरी मोठी योजना आहे.
बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथंच थांबूयात . तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी पाहात राहा मनी9 मराठी

Published: March 7, 2024, 15:54 IST

सोन्याचा नवा उच्चांक, यंदा सोनं 70 हजार होणार