डेट म्युच्युअल फंडात 66 हजार कोटींची गुंतवणूक

तुमच्या उत्पन्नावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

खाद्य वस्तू,वीज,क्रच्चे तेल तसेच इतर पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू तसेच इतर उत्पादनाच्या दरात वाढ झाल्यानं घाऊक महागाई निर्देशांक म्हणजेच wholesale price index मध्ये वार्षिक 1.26 टक्क्यांची वाढ झालीय. तर मार्च महिन्याच्या तुलनेत घाऊक महागाईच्या निर्देशांकामध्ये 0.53 टक्क्यांची वाढ झालीय.अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलीय. एप्रिल महिन्यातील घाऊक निर्देशांक गेल्या तेरा महिन्यानंतर पहिल्यांदाच मोठया प्रमाणात वाढला.. एप्रिल महिन्यात खाद्य पदार्थाच्या महागाई ही 7.74 टक्के होती तर मार्च महिन्यात 6.88 टक्के होती. अन्नधान्याच्या किमती वाढत असल्यानं किरकोळ महागाईतही नाममात्र घसरण पाहायला मिळाली. अन्नधान्याच्या किंमती वाढत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.

आता बातमी pf संदर्भातली

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF कार्यालयानं एक मोठा निर्णय घेतलाय. शिक्षण, घर खरेदी आणि लग्न याबाबतच ईपीएफओ योजना 1952 च्या अंतर्गत नियमात एक मोठा बदल करण्यात आलाय.आता शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी Auto Claim Advance Settlement ला आता ऑटो मोडमध्ये होणार आहेत. तसेच दाव्याची रक्कम ही पन्नास हजारांहून एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलीय. तसेच आता रक्कमही दहा दिवसांऐवजी तीन ते चार दिवसात मिळणार आहे.

आता बातमी म्युच्युअल फंडा संदर्भातली

 

लोकसभा निवडणुकांमुळे सध्या शेअर बाजारात तीव्र चढ-उतार होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा डेट म्युच्युअल फंडाकडे वळवलाय. गेल्या तीन वर्षांपासून डेट म्युच्युअल फंडाकडे गुंतवणुकीचा ओघ कमी झाला होता. मात्र, एप्रिल महिन्यात डेट म्युच्युअल फंडात 66 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांनी केलीय. विशेष म्हणजे गिल्ट फंडात सर्वाधिक म्हणजे 5,210 कोटी रुपयांचा निधी आलाय. सप्टेंबरनंतर व्याज दरात कमी होण्याची अपेक्षा अनेक जणांना असल्यानं डेट फंड गुंतवणूक वाढत आहे

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा ओघ वाढल्यानं गेल्या तीन वर्षांपासून दर महिन्याला फंड हाऊसेस दर महिन्याला दहा ते 12 इक्विटीवर आधारित नवीन फंड म्हणजेच NFO बाजारात आणत आहेत. या वर्षात आतापर्यंत 67 नवीन फंड लॉण्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व फंड ऍक्टिव्ह फंड आहेत.

बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

 

Published: May 14, 2024, 15:45 IST

डेट म्युच्युअल फंडात 66 हजार कोटींची गुंतवणूक