सोन्याच्या दरातील तुफान तेजी कशामुळे ?

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

नमस्कार मी श्रावणी बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत बातमीपत्राच्या सुरूवातीला सोन्यातील तेजीची बातमी
सोन्याच्या दरात तेजी सुरूच आहे.
एमसीएक्स आणि कॉमेक्स यादोन्ही ठिकाणी सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात चारशे रुपयांची वाढ झालीय. दहा ग्रॅम सोन्याचा दर हा 68,700 रुपयांवर होचला होता. तर सोमवारी 69,487 रुपयांवर सोन्याचा भाव पोहचला होता. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही तेजदी आलीय. एमसीएक्सवर चांदीच्या दर 600 रुपयांवर पोहचलाय. एक किलोग्रॅम चांदीचा दर हा 76,100 रुपयांच्यावर गेलाय.
अमरिकेतली फेड बँक ही व्याज दर कमी करणार असल्यानं तसेच सुरक्षित गुंतणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे.

आता बातमी जीएसटीची
देशांतर्गत व्यवहारांमुळे मार्चमध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलन वार्षिक तुलनेत ११.५ टक्क्यांनी वाढून १.७८ लाख कोटी रुपये नोंदवले गेले, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले, जे आजवरचे सर्वोच्च दुसरे मासिक संकलन आहे. एप्रिल २०२३ मध्ये आतापर्यंतचे सर्वोच्च १.८७ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन नोंदवले गेले आहे.नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण जीएसटी संकलन २०.१८ लाख कोटी रुपये झाले आहे, जे आधीच्या आर्थिक वर्षातील जमा महसुलापेक्षा ११.७ टक्के जास्त आहे.

आता बातमी आरबीआयची
रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी ९० रुपयांचे नाणे जारी केले. देशात प्रथमच ९० रुपयांचे नाणे जारी करण्यात आले असून, नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे आहे. ९० रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला ९० रुपये असे लिहिलेले आहे. तसेच त्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेले आहे. नाण्याच्या एका बाजूला जिथे RBI लिहिलेले आहे, त्याच्या वरच्या भागात हिंदी तर खालच्या भागात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे. याशिवाय लोगोच्या खाली @९० चा उल्लेख आहे. हे नाणे सामान्य नाण्यांप्रमाणे खरेदी-विक्रीसाठी वापरले जाणार नाही.

बातमी दोन हजार रुपयांच्या नोटाची
रिझर्व्ह बँकेने वितरणांतून काढून टाकलेल्या २,००० रुपयांच्या सुमारे ९७.६९ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत आणि ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा अजूनही लोकांकडे असल्याचे सोमवारी मध्यवर्ती बँकेकडून स्पष्ट करण्यात आले. रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती आणि या नोटा बँक खात्यात जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी लोकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली गेली होती. नंतर ही अंतिम मुदत ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती.
आता बातमी पुण्याची

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात घर, जमीन खरेदी करण्यास नागरिकांची पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, दोन रिंगरोड असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत असलेल्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक केंद्र आणि जिल्ह्यातील औद्योगिक विस्तार यांमुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहरात राहण्यास नागरिक प्राधान्य मिळत आहे. संपलेल्या आर्थिक वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून तब्बल ९१३० कोटी, तर ग्रामीण भागातून २१८७ कोटी असा पुणे जिल्ह्यातून ११ हजार ३१७ कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

 

लोकसभा निवडणूका असल्यामुळे यंदा एक एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल दर वाढीला ब्रेक लागला आहे. आता लोकसभा निवडणूका संपल्यानंतर टोल दरवाढीचा निर्णय होणार आहे. साधारपणे एक एप्रिल पासून टोलदर वाढ करण्यात येते.

Published: April 2, 2024, 16:07 IST

सोन्याच्या दरातील तुफान तेजी कशामुळे ?