Digital Gold मधील गुंतवणूक सुरक्षित आहे का?

सोनं खरेदी करण्यासाठी आता मोठ्या रकमेची गरज नाहीये. PayTM, Google Pay आणि PhonePe सारख्या फिनटेक ॲप्सद्वारे, गुंतवणूकदार आता अगदी 1 रुपयातदेखील सोनं खरेदी करू शकतात. सोनं डिजिटल असलं तरी त्याच्या शुध्दतेमध्ये कोणतीच तडजोड होत नाही. आता काही ज्वेलरी कंपन्यादेखील डिजिटल सोनं खरेदी करण्याची सुविधा देता आहेत. या माध्यमातून 100 रुपयांची किमान गुंतवणूक करून सोनं खरेदी करता येतं.

जुही अनेक दिवसांपासून सोनं खरेदी करण्याचा विचार करतीये, मात्र सोन्याच्या किमती भव्य उच्चांक पोहोचल्या आहेत. सध्या सोनं 62000 रुपयाच्या वर ट्रेड करतंय. त्यामुळे, काही कारणास्तव सोनं 60000 च्या खाली आलं तर आपल्याला व्हॅल्यू बाईन्गची संधी मिळेल, असा तिचा विचार आहे. कोणत्या किमतीला सोनं खरेदी करायचं हे तिने ठरवलं आहे, मात्र तिच्या मनात आणखी गोष्टीबद्दल गोंधळ आहे. ती नेहमी ज्वेलरकडे जाऊन फिसिकल गोल्ड खरेदी करते, मात्र तिची जवळची मैत्रीण ऐश्वर्या मात्र आता ऑनलाईन पद्धतीने गोल्ड खरेदी करते. मग आपण आता फिसिकल गोल्ड खरेदी करावं का ऑनलाईन पद्धतीने खरेदी करावं, असा प्रश्न जुहीला पडला आहे. जुहीसारख्या लोकांकडे सोनं खरेदी करण्याचा एक नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे. सोनं खरेदी करण्यासाठी आता मोठ्या रकमेची गरज नाहीये. PayTM, Google Pay आणि PhonePe सारख्या फिनटेक ॲप्सद्वारे, गुंतवणूकदार आता अगदी 1 रुपयातदेखील सोनं खरेदी करू शकतात. सोनं डिजिटल असलं तरी त्याच्या शुध्दतेमध्ये कोणतीच तडजोड होत नाही. आता काही ज्वेलरी कंपन्यादेखील डिजिटल सोनं खरेदी करण्याची सुविधा देता आहेत. या माध्यमातून 100 रुपयांची किमान गुंतवणूक करून सोनं खरेदी करता येतं.

सगळ्यात आधी आपल्याला डिजिटल गोल्ड म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. ज्या प्रकारे आपण डिमॅट अकॉउंटच्या माध्यमातून शेअर्सची खरेदी विक्री करतो, त्याच पद्धतीने आपण डिजिटल गोल्डची खरेदी विक्री करू शकतो. आपण अँपवरून सोनं खरेदी केलं कि आपल्या बँकेतून रक्कम डेबिट होते आणि डिजिटल अकॉउंटमध्ये डिजिटल गोल्ड जमा होतं. त्यानंतर, सोन्याच्या किमतींमध्ये ज्या प्रकारे चढ-उतार होईल, त्यानुसार आपल्या वॉलेटमध्ये असणार्या सोन्याची किंमत कमी जास्त होतं राहील. ज्या वेळेला आपल्याला सोनं विकायचं असेल तेव्हा आपण अँपच्या मदतीने डिजिटल गोल्ड विकू शकतो, त्यानंतर वॉलेटमधून डिजिटल गोल्ड डेबिट होईल आणि मार्केट रेटनुसार आपल्याला पैसे मिळतील. हे पैसे थेट आपल्या बँक अकॉउंटमध्ये जमा होतील. अश्या पद्धतीने कुठेही न जात आपण घर बसल्या डिजिटल गोल्डमधे गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवू शकतो.

विशेष म्हणजे आपल्याला डिजिटल गोल्डच्या बदल्यात फिसिकल गोल्ड पाहिजे असेल तर ती सुविधा या अँप्सनी दिली आहे. तसेच, कोणाला हे सोनं ट्रान्स्फर करायचं असेल तर ते देखील या माध्यमातून करता येतं. सोनं डिजिटल पद्धतीने स्टोअर होतं, त्यामुळे सोनं सांभाळण्याची आणि हरवण्याची जोखीम नसते. मात्र, डिजिटल गोल्ड खरेदी करण्यापूर्वी आपण काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. फिनटेक कंपन्या आपल्याला डिजिटल गोल्ड खरेदी करण्याची आणि स्टोअर करण्याची सुविधा देतात, त्या बदल्यात ते आपल्याकडून काही शुल्क आकारतात. प्रत्येक व्यवहारावर आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागतं, तसेच काही कंपन्या स्टोरेज चार्जेस देखील आकारतात. मात्र, फिसिकल गोल्डपेक्षा हे खर्च बऱ्यापैकी कमी आहेत. आपण दुकानात जाऊन फिसिकल गोल्ड खरेदी केलं तर त्यावर आपल्याला 3% GST भरावा लागतो. तसेच, सोनं घरात ठेवायचं नसेल तर बँक लॉकरसाठी शुल्क भरावं लागतं. त्यामुळे, फिसिकल पेक्षा डिजिटल गोल्ड खरेदी करणं बऱ्यापैकी स्वस्त आहे. सोन्यामध्ये मध्यम जोखीम असते, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडपेक्षा कमी चढ उतार होतात, आणि महागाईपेक्षा जास्त म्हणजेच 10 ते 12% रिटर्न मिळतो. त्यामुळे, प्रत्येक गुंतवणूकदाराने पोर्टफोलिओचा काही भाग सोन्यात ठेवला पाहिजे, असं मत केडिया एडव्हायजरीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी व्यक्त केलं आहे. सोन्यात गुंतवणूक करणं फायदेशीर तर आहेच, पण ज्यांना सोन्यात दार म्हण्याला लहान गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी डिजिटल गोल्ड हा चांगला पर्याय आहे. मात्र, गुगल पे किंवा फोन पे सारख्या सुरक्षित अँप्सवरून ही गुंतवणूक करावी, असा आमचा सल्ला आहे.

Published: February 23, 2024, 13:01 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App