गोल्ड बॉण्डमधून 5 वर्षात 147 टक्के परतावा

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

नमस्कार मी मंगेश बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत
बातमीपत्राच्या सुरूवातीला बातमी कुटुंबाच्या बचतीसंदर्भातली
गेल्या तीन वर्षात घरगुती बचतीत मोठी घट झालीय घरगुती बचतीत 9 लाख कोटींची घट होऊन 14.16 लाख कोटींवर बचत पोहचलीय.कुटुंबाच्या बचतीचा वेग मदावणे आणि कर्ज आणि उसनावारीत वाढ होणे हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेची गती आणि बचत क्षमता यांचा सकारात्मक संबंध असतो. अर्थव्यवस्था वाढत असल्यास नागरिकांचं उत्पन्न आणि बचत देखील वाढते. बचत कमी होत असताना कुटुंबीयांच्या कर्जात देखील वाढ होतेय. विशेषत: बँकेत्तर वित्तीय संस्था म्हणजेच NBFC कडून अनेक कुटुंब मोठ्या प्रमाणात कर्ज घेत आहेत.

आता बातमी सोन्यातल्या गुंतवणुकीची

केंद्र सरकारच्या 2017-18 या वर्षात सुवर्ण रोख्यात म्हणजेच गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना पाच वर्षात 147 टक्के परतावा मिळालाय. 20 नोव्हेंबर 2017 मध्ये 2,901 रुपये प्रति ग्रॅम दरानं गुंतवणूकदारांनी गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केली होती. सध्या आरबीआयनं प्रति ग्रॅम सोन्यासाठी 7,165 रुपयांचा दर जाहीर केलाय. म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 2,264 रुपयांचा नफा मिळालाय. गोल्ड बॉण्डची मुदत आठ वर्षांची आहे. तसेच पाच वर्षानंतर गोल्ड बॉण्डमधील गुंतवणूक मुदतीपूर्वी काढता येते.

आता बातमी डिमॅट खात्यांची
भांडवली बाजारात लिस्टेट असलेली सेंट्रल डिपॉझिटी सव्हिर्सेस लिमिटेड म्हणजेच CDSL नुकत्याच संपलेल्या मार्च महिन्याअखेरच्या तमाहीत एक कोटी 9 लाख डिमॅट खाती उघडली आहेत. कोणत्याही तिमाहीत पहिल्यांदाच एवढे खाते उघडण्यात आले आहेत. 2022-23 या आर्थि वर्षात 3 कोटी 26 लाख नवीन डिमॅट खाती उघडली आहेत. सध्या सीडीएसएलकडे 11 कोटी 56 लाख डिमॅट खाती आहेत. शेअर बाजारातील तेजीमुळे अनेक किरकोळ गुंतवणूकदार गुंतवणूक करत असल्यानं डिमॅट खात्यांची संख्या वाढत आहे.
आता बातमी मॉल्सची
देशभरात रिकाम्या मॉल्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील प्रमुख आठ शहरात गेल्या वर्षी 57 मॉल्स बंद होते त्यात आता वाढ होऊन बंद असलेल्या मॉल्सची संख्या 64 वर पोहचलीय. या मॉल्समधील 40 टक्के दुकानं बंद असल्यानं यांना भुताचे मॉल म्हणजेच घोस्ट मॉल असे म्हणतात.
बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: May 8, 2024, 15:36 IST

गोल्ड बॉण्डमधून 5 वर्षात 147 टक्के परतावा