म्हणून गोल्ड ETF ची लोकप्रियता वाढतीये

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजेच AMFI च्या डेटानुसार, गोल्ड ETF मधील वार्षिक गुंतवणूक 2023 मध्ये सहा पटीने वाढून 2,820 कोटींवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, गोल्ड ETF मध्ये असणाऱ्या फोलिओ किंवा अकॉउंटची संख्या 2 लाख 73 हजार होती, हा आकडा केवळ एका वर्षात 50 लाखांच्या वर गेला आहे.

  • Team Money9
  • Last Updated : February 20, 2024, 14:48 IST

भारतातल्या गुंतवणूकदारांनी नेहमीच सोन्यात गुंतवणूक करण्याला पसंती दिली आहे, विशेष म्हणजे सर्व वियोगटातले गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करतात. सोन्यात साधारण 10 ते 12% रिटर्न मिळतो, तसेच 3 ते 5 वर्षासाठी गुंतवणूक केली तर चांगला रिटर्न मिळतो, हे गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं आहे. मात्र, आता लोकं सोन्यात गुंतवणूक करत आहेत, मात्र काळानुसार त्याचं माध्यम बदललं आहे. पूर्वी लोकं दुकानात जाऊन फिसिकल गोल्ड खरेदी करायचे, मात्र आता लोकांनी सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड आणि गोल्ड ETF सारख्या आधुनिक इन्स्ट्रुमेंटला पसंती दिली आहे. सॉव्हरिन गोल्ड बॉण्डची लोकप्रियता पहिल्यापासून आहे, मात्र मागच्या 1 वर्षात गोल्ड ETF ची लोकरीप्रियता सर्वाधिक वाढली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजेच AMFI च्या डेटानुसार, गोल्ड ETF मधील वार्षिक गुंतवणूक 2023 मध्ये सहा पटीने वाढून 2,820 कोटींवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, गोल्ड ETF मध्ये असणाऱ्या फोलिओ किंवा अकॉउंटची संख्या 2 लाख 73 हजार होती, हा आकडा केवळ एका वर्षात 50 लाखांच्या वर गेला आहे.

ETF ची किंमत सोन्याच्या किमतींवर अवलंबून असते, त्यामुळे सोन्याच्या किमती जेवढ्या वाढतील तेवढाच रिटर्न गोल्ड ETF मध्ये मिळतो. गोल्ड ETF हे सोन्याच्या किमतींवर आधारित ओपन-एंडेड म्युच्युअल फंड आहे. पॅसिव्ह फंड असल्यामुळे त्यात गुंतवणुकीची किंमत खूपच कमी आहे, इतर फंड्सच्या तुलनेत त्यांचा एक्सपेन्स रेशिओ बऱ्यापैकी कमी असतो. गोल्ड ETF मध्ये फंड मॅनेजरचा फारसा रोल नसतो, त्यांना केवळ सोन्याच्या किमतींमध्ये होणाऱ्या चढ-उतारानुसार रिटर्न जनरेट करायचा असतो. गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यामध्ये केवळ 1 युनिट खरेदी करता येतो. म्हणजेच खूप कमी पैशात गुंतवणूक करता येते. याउलट, फिसिकल गोल्ड किंवा गोल्ड बॉण्डमध्ये किमान 1 ग्रॅम सोन खरेदी करावं लागतं ज्यासाठी साधारण 6 हजार रुपयाची किमान गुंतवणूक करावी लागते. गोल्ड ईटीएफची खरेदी आणि विक्री शेअर्सप्रमाणेच BSE आणि NSE वर केली जाऊ शकते. मात्र, यामध्ये फिसिकल गोल्ड मिळत नाही, त्यामुळे सोन सांभाळण्याची जोखीम नसते. गोल्ड ETF ची विक्री केली कि त्यावेळच्या मार्केट रेटनुसार आपल्याला पैसे मिळतात.

ज्या वेळेला शेअर मार्केट आणि इक्विटी फंड्समध्ये मंदी असते, तेव्हा सोन्याच्या रेटमध्ये तेजी येते. त्यामुळे, ज्यांना पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा आहे, त्यांच्यासाठी गोल्ड ETF हा चांगला पर्याय आहे, असं मत पर्सनल फायनान्स एक्सपर्ट जितेंद्र सोळंकी यांनी व्यक्त केलं आहे. सोन्यामध्ये मध्यम जोखीम घेऊन साधारण 10 ते 12% रिटर्न मिळतो. महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळत असल्याने प्रत्येक गुंतवणूकदाराने सोन्यात गुंतवणूक केली पाहिजे. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रमुख पर्याय आहेत, यामध्ये फिसिकल गोल्ड, RBI चे गोल्ड बॉण्ड आणि गोल्ड ETF यांचा समावेश आहे. ज्यांना सोन्यामध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी गोल्ड ETF हा सर्वात चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही ऑटो-डेबिट फॅसिलिटीचे वापर करून सिस्टिमॅटिकली गुंतवणूक करू शकता. ज्यांना गोल्डमधे स्विंग किंवा पोजीशनल ट्रेडिंग करायचं आहे, त्यांच्यासाठी गोल्ड ETF हा चांगला पर्याय आहे. ज्याप्रकारे आपण डिमॅट अकॉउंटमधून शेअर्सची खरेदी विक्री करतो, त्याचं प्रकारे गोल्ड ETF ची खरेदी विक्री करता येते. या सगळ्या फायद्यांचा विचार करता, प्रायटेक गुंतवणूकदाराने गोल्ड ETF ची माहिती घेतली पाहिजे. यातून आपले उद्दिष्ट पूर्ण होणार असतील तर या गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे.

Published: February 20, 2024, 13:49 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App