गुंतवणूकदारांनी केली गोल्ड ETF मध्ये 2,820 कोटी रुपयांची गुंतवणूक

तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या

  • Team Money9
  • Last Updated : January 12, 2024, 15:23 IST

नमस्कार मी मंगेश बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत

चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या खजिन्यात भरपूर आवक होतेय. या आर्थिक वर्षात सरकार प्रत्यक्ष कराच्या संकलात 19 टक्के वाढ होत 14.50 लाख कोटींच्यावर पोहचलीय,अशी माहिती सीबीडीटीनं दिलीय. 2023-24 या आर्थिक वर्षात आतापर्यंत प्रत्यक्ष कराचं निव्वळ संकलन 14.71 लाख कोटींवर पोहचलीय.

भारतीय पासपोर्ट दिवसेंदिवस मजबूत होतोय. आता भारतीय पासपोर्टनं तीन पायऱ्या उड्या मारत 80 व्या क्रमाकांवर पोहचलंय. पासपोर्ट इंडेक्सनुसार आता भारतीय पासपोर्ट आता उज्बेकिस्तानच्या पासपोर्टसह संयुक्तपणे 80 व्या स्थानी आहे. आता भारतातील नागरिक भूतान, आयर्लेंड,बारबाडोस,थॉयलँड,जॉर्डन,मलेशिया, मालदिव,श्रीलंका,मॉरीशस आणि इंडोनेशियायासह व्हिसा नसतानाही जाता येतं.

UPI मुळे डिजिटल पेमेंटच्या बाबतीत अमेरिकेसह इतर विकसित देशांना मागे टाकत भारत पहिल्या क्रमाकांवर पोहचलाय,अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलीय. UPI यशस्वी करण्यात खासगी कंपन्यांचाही मोठा वाटा असल्याचंही दास यांनी मान्य करत खासगी कंपन्यांचं कौतुक केलंय.

येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लेखानुदान सादर करणार आहेत. तर 31 जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे. या वर्षात लोकसभेच्या निवडणुका असल्यानं संपूर्ण अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान सादर करण्यात येते.

गूगलमध्ये नववर्षातही अनेक जणांवर नोकरी गमावण्याची नामुष्की आलीय. खर्च कमी करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. गगूलने हार्डवेअर,व्हाईस सेवा आणि अभियांत्रिकी विभागात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. वर्षभरापूर्वीच गुगलनं सुमारे बारा हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे,अशी माहिती दिली होती. या आठवड्याच्या सुरूवातीला ऍमेझॉननं प्राईम व्हिडीओ आणि स्टुडिओ विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात आयटी क्षेत्रात सुमारे दोन लाख 26 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आलाय.

सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडाची मागणी वाढलीय. वार्षिक आधारावर गोल्ड ETF मध्ये सहा पट गुंतवणूक वाढलीय. गोल्ड ETF मध्ये 2,820 कोटी रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांनी केलीय. वाढते व्याज दर आणि जागतिक अस्थिर परिस्थिती यामुळे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढलाय.

आता बातमी साखर कारखान्यांची
केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितावर निर्बंध टाकल्यामुळे साखर कारखाने अडचणीत आलेत. बी-हेवी मोलॅसिसच्या विक्रीचा प्रश्न गंभीर झालाय.अशा कठीण परिस्थितीत कारखान्यांनी कॉम्प्रेस्ड बॉयोगॅस म्हणजेच सीबीजी तयार करण्याचा सल्ला माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलाय. ते पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षुक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागानं थकबाकीदारांविरुद्द धडक कारवाई सुरू केलीय. जप्तीपूर्व नोटीस बजावल्यानंतरही कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांच्या 200 मालमत्ता जप्त करण्यात आल्यात. तसेच 17 थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्यात आलंय. आतापर्यंत महापालिकेनं 680 कोटी रुपयांचा कर वसूल केलाय. जप्तीचे नोटीस पथक घराच्या दारात पोहचल्यानंतर सात हजार 80 जणांनी सुमारे 73 कोटी 28 लाखांचा कर भरणा केलाय.
बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथंच थांबूयात पाहात राहा मनी9 मराठी

Published: January 12, 2024, 15:23 IST

गुंतवणूकदारांनी केली गोल्ड ETF मध्ये 2,820 कोटी रुपयांची गुंतवणूक