टॅक्स वाचवण्यासाठी महत्वाच्या टिप्स !

इन्कम टॅक्स वाचवायचा असेल तर आपल्याकडे आता केवळ 31 मार्चपर्यंतची मुदत आहे. ज्यांनी जुनी टॅक्स रिजिम निवडली आहे, ते करदाते विविध ठिकाणी गुंतवणूक करून किंवा खर्च दाखवून टॅक्सची बचत करू शकतात. मात्र, आपण जर अजूनही प्लॅनिंग केलं नसेल तर नाईलाजाने टॅक्स भरावा लागेल. टॅक्स वाचवायचा असेल तर सर्वात आधी टॅक्स वाचवण्यासाठी आपल्याकडे कोणते पर्याय आहेत, ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.

आर्थिक वर्ष संपायला आता अगदी काही दिवस शिल्लक आहेत. इन्कम टॅक्स वाचवायचा असेल तर आपल्याकडे आता केवळ 31 मार्चपर्यंतची मुदत आहे. ज्यांनी जुनी टॅक्स रिजिम निवडली आहे, ते करदाते विविध ठिकाणी गुंतवणूक करून किंवा खर्च दाखवून टॅक्सची बचत करू शकतात. मात्र, आपण जर अजूनही प्लॅनिंग केलं नसेल तर नाईलाजाने टॅक्स भरावा लागेल. टॅक्स वाचवायचा असेल तर सर्वात आधी टॅक्स वाचवण्यासाठी आपल्याकडे कोणते पर्याय आहेत, ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. याचा फायदा आपल्याला चालू आर्थिक वर्षासाठी तर होईलच त्यासोबतच पुढच्या आर्थिक वर्षाचं प्लॅनिंग करण्यासाठी देखील या माहितीचा फायदा होईल. आपल्याला टॅक्स वाचवायचा असेल तर सगळ्यात आधी टॅक्स लायबिलिटी कॅल्युलेट करणं महत्वाचं आहे. जर आपण कोणतंच डिडक्शन क्लेम नाही केलं, तर किती इन्कम टॅक्स भरावा लागेल, ते जाणून घेणं महत्वाचं आहे. यासाठी आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या (incometaxindia.gov.in) या वेबसाईटवर जाऊन टॅक्स कॅल्युलेटरचा वापर करू शकतो. या टूलचा वापर करून आपण जुन्या आणि नवीन टॅक्स रिजिमची तुलना करू शकतो आणि सर्वात फायदेशीर व्यवस्था निवडू शकतो. जर कोणतंच डिडक्शन क्लेम न करता नवीन टॅक्स रिजिममध्ये जास्त टॅक्स वाचत असेल तर आपलं काम सोपं होईल. मात्र, जुन्या कर व्यवस्थेमध्ये जास्त फायदा होत असेल तर मात्र जास्तीतजास्त डिडक्शन क्लेम करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

ज्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना जुन्या कर व्यवस्थेमध्ये कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. मात्र, वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या वर गेलं कि लगेच टॅक्स चालू होतो. असं असलं तरी जुन्या कर व्यवस्थेमध्ये साधारण 70 प्रकारचे टॅक्स डिडक्शन क्लेम करता येतात. यापैकी, सेक्शन 80C चा बेनिफिट सर्वात लोकप्रिय आहे. यामध्ये PPF, लाईफ इंश्युरन्स, प्रोविडेंट फंड, म्युच्युअल फंड्स, टॅक्स सेविंग FD, होम लोनचं प्रिन्सिपल यासारख्या अनेक ठिकाणी गुंतवणूक करून टॅक्स बेनिफिट मिळवता येतो. लाईफ इंश्युरन्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आणखी किती गुंतवणूक करायला पाहिजे त्याचं आधी कॅल्क्युलेशन करा. जेवढी गरज असेल केवळ तेवढीच गुंतवणूक करा, कारण या सगळ्या इंस्ट्रुमेंट्समध्ये लॉक-इन कालावधी असतो. ELSS म्हणजेच टॅक्स सेविंग म्युच्युअल फंड्समध्ये सगळ्यात कमी म्हणजे 3 वर्षाचा लॉक-इन कालावधी असतो, म्हणून अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, ही इक्विटी कॅटेगरीची गुंतवणूक असल्यामुळे कमीतकमी 10 वर्षासाठी गुंतवणूक केली पाहिजे. यामुळे, आपली जोखीम कमी होते आणि कंपाऊंडिंगचा खऱ्या अर्थाने लाभ मिळतो. याशिवाय, सेक्शन 80CCD (1B) अंतर्गत नॅशनल पेन्शन स्कीमच्या टियर 1 अकॉउंटमध्ये गुंतवणूक करून अतिरिक्त 50000 रुपयावर टॅक्स बेनिफिट मिळवता येतो.

यासोबतच, जुन्या कर व्यवस्थेमध्ये मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली असेल, तर 25000 रुपयांपर्यंतच्या रकमेवर टॅक्स बेनिफिट मिळवता येतो. जर स्वतःसोबतच आई वडिलांसाठी हेल्थ इंश्युरन्स खरेदी केला असेल तर एकूण 50000 रुपयावर टॅक्स बेनिफिट मिळतो आणि जर आई वडील ज्येष्ठ नागरिक असतील तर 25 अधिक 50 हजार असं एकूण 75000 रुपयाच्या प्रीमियमवर टॅक्स बेनिफिट मिळवता येतो. मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च अतिशय झपाट्याने वाढतोय, त्यामुळे मेडिक्लेम पॉलिसी घेणं आपल्या फायद्याचं आहे. त्यावर टॅक्स बेनिफिट मिळतो हा अतिरिक्त फायदा आहे. केवळ गुंतवणूकच नाही तर आपण सामाजिक कामासाठी एखाद्या संस्थेला देणगी दिली तर त्यावर देखील आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळवता येतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80G अंतर्गत देणगी दिली तर कर सवलत मिळते. तसेच, जे लोकं रेंटवर राहत आहेत ते HRA म्हणजेच घर भाडं भत्त्याचा टॅक्स वाचवण्यासाठी वापर करू शकतात. अश्या पद्धतीने सर्व डिडक्शनची व्यवस्थित माहिती घेऊन टॅक्स प्लॅनिंग केलं तर आपल्याला इन्कम टॅक्स वाचवता येईल.

Published: March 15, 2024, 19:03 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App