FD च्या व्याजावर लागणारा टॅक्स कसा वाचवायचा?

इन्कम टॅक्स भरल्यावर बरेच लोकं साठवलेले पैसे FD सारख्या सुरक्षित इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवतात, मात्र FD वर मिळणारं व्याज थेट आपल्या उत्पन्नात ऍड होतं, आणि सर्वात वरच्या स्लॅबनुसार त्यावर देखील इन्कम टॅक्स भरावा लागतो. IT डिपार्टमेंटनी आता PAN सगळीकडे लिंक केला आहे, त्यामुळे मिळालेलं व्याज आणि कॅपिटल गेन ITR मध्ये प्री-फिल्ड असतो. त्यामुळे, हे उत्पन्न लपवणं शक्य नाहीये.

कोविडनंतर अर्थव्यवस्थेमध्ये K शेप रिकव्हरीFD च्या व्याजावर लागणारा टॅक्स कसा वाचवायचा? आली. K शेप रिकव्हरी म्हणजे काही लोकांच्या उत्पन्नात खूप मोठी वाढ झाली तर काही लोकांचं उत्पन्न कमी झालं. ज्यांचं उत्पन्न कमी झालं ते नाराज आहेत, मात्र ज्यांचं उत्पन्न वाढलं आहे, ते देखील नाराज आहेत. आता तुम्ही म्हणाल कि ज्यांचं उत्पन्न वाढलं आहे, त्यांनी नाराज होण्याचं काय कारण आहे. इन्कम टॅक्स हे यामागचं मुख्य कारण आहे. पुणे मुंबईसारख्या शहरात जे कर्मचारी IT सेक्टरमध्ये काम करतात, त्यांच्या उत्पन्नात मागच्या 4 वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे. असे अनेक IT इंजिनिअर आहेत, ज्यांचं पॅकेज कोविडच्या आधी 5 ते 6 लाख होतं, मात्र आता ते 20 लाखाच्या वर गेलं आहे. एकदा वार्षिक उत्पन्न 10 लाखाच्या वर गेलं कि मग टॅक्स वाचवणं अवघड होतं. एखाद्याचा बिझनेस असेल तर बिझनेस एक्सपेन्सेस क्लेम करून टॅक्स लायबिलिटी कमी करता येते, मात्र नोकरदार व्यक्तींना कोणतीच पळवाट काढता येत नाही. इन्कम टॅक्स भरल्यावर बरेच लोकं साठवलेले पैसे FD सारख्या सुरक्षित इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवतात, मात्र FD वर मिळणारं व्याज थेट आपल्या उत्पन्नात ऍड होतं, आणि सर्वात वरच्या स्लॅबनुसार त्यावर देखील इन्कम टॅक्स भरावा लागतो. IT डिपार्टमेंटनी आता PAN सगळीकडे लिंक केला आहे, त्यामुळे मिळालेलं व्याज आणि कॅपिटल गेन ITR मध्ये प्री-फिल्ड असतो. त्यामुळे, हे उत्पन्न लपवणं शक्य नाहीये.

FD वर सध्या 6 ते 8% व्याज मिळतंय. म्हणजे आपण 10 लाख रुपयाची FD केली तर त्यावर साधारण 70000 रुपये वार्षिक व्याज मिळेल. या 70000 रुपयावर 20 किंवा 30% इन्कम टॅक्स भरावा लागला तर FD वर 4 ते 5% पोस्ट टॅक्स रिटर्न मिळतो, जो महागाईपेक्षा बराच कमी आहे. म्हणजे जे करदाते 20 किंवा 30 टक्याच्या इन्कम टॅक्स ब्रॅकेटमध्ये आहेत, त्यांची FD मध्ये गुंतवणूक करून वेल्थ क्रिएट होतं नाहीये. उलट दर वर्षी त्यांच्या पैशाची पर्चेसिंग पॉवर कमी होते. मग अश्या परिस्थितीत काही तरी करून ही टॅक्स लायबिलिटी कमी करणं अतिशय गरजेचं आहे. टॅक्स लायबिलिटी आपण 70 ते 100 टक्यापर्यंत कमी करू शकतो, त्यासाठी टॅक्स कसा वाचवता येईल ते आता जाणून घेऊया. आपण एक उदाहरण बघूया. रणवीरने स्टेट बँकेच्या FD मध्ये 10 लाख रुपयाची गुंतवणूक केली. 5 वर्षाच्या FD वर त्याला साधारण 6.5% वार्षिक व्याज मिळणार आहे. 5 वर्षात त्याला FD वर एकूण 325000 व्याज मिळेल, रणवीर 30 टक्याच्या स्लॅबमध्ये येतो, त्यामुळे या व्याजावर त्याला 30% इन्कम टॅक्स भरावा लागेल. म्हणजे 3 लाख 25 हजारवर त्याला 97500 रुपये टॅक्स भरावा लागेल. टॅक्स वजा केल्यावर त्याच्या हातात केवळ 2 लाख 27 हजार 500 रुपये राहतील. दुसऱ्या बाजूला आलियाने SBI च्या आर्बिट्राज फंडमध्ये गुंतवणूक केली. बऱ्याच लोकांना वाटतं कि म्युच्युअल फंड रिस्की असतात. पण सगळेच म्युच्युअल फंड रिस्की नसतात, हा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे.

डेट म्युच्युअल फंडवर साधारण FD एवढाच रिटर्न मिळतो आणि इक्विटीसारखे चढ-उतार यामध्ये होतं नाही. तुमच्या समोर जो चार्ट दिसतोय, तो SBI च्या आर्बिट्राज फंडचा 10 वर्षाचा चार्ट आहे. हा चार्ट बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे या फंडवर सातत्याने पॉजिटीव्ह रिटर्न मिळतो. मागच्या 10 वर्षात या फंडने सरासरी 6.78% वार्षिक रिटर्न दिला आहे. येणाऱ्या काळात या फंडवर FD एवढाच म्हणजे 6.5% रिटर्न मिळेल, असं आपण गृहीत धरू. त्यामुळे, आलियाला देखील 5 वर्षात 3 लाख 25 हजार रुपये व्याज मिळेल. आता तुम्ही म्हणाल कि FD एवढाच रिटर्न मिळणार असेल, तर मग या फंडचा काय फायदा. या फंडमध्ये फायदा आहे म्हणूनच गुंतवणूकदार आता या फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत. आर्बिट्राज फंडवर मिळालेला प्रॉफिट आपण 1 वर्षानंतर बुक केला तर त्यावर केवळ 10% लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. पहिल्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या प्रॉफिटवर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. तिथून पुढच्या रकमेवर 10% LTCG टॅक्स भरावा लागतो. यानुसार, आलियाला 3 लाख 25 हजारपैकी 2 लाख 25 हजार रुपयावर 10% म्हणजे, 22500 रुपये टॅक्स भरावा लागेल. रणवीरच्या तुलनेत आलियाची तब्बल 75000 रुपयाची बचत झाली. 10 लाखाच्या FD वर वर्षाला 15000 रुपयाची बचत म्हणजे आलियाला रणवीरपेक्षा दिढ टक्का जास्त वार्षिक रिटर्न मिळाला. तुम्ही जर 30 टक्याच्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल आणि FD वर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स वाचवायचा असेल तर आर्बिट्राज फंडचा नक्की विचार करा.

Published: April 4, 2024, 17:14 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App