ITR भरताना AIS फॉर्म का महत्वाचा असतो?

फॉर्म 26AS मध्ये तुम्ही वर्षभरात खरेदी केलेल्या कोणत्याही मालमत्तेचा तपशील आणि मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीचा तपशील, TDS आणि TCS या सगळ्याची माहिती असते. AIS मध्ये ही सर्व माहिती तर असतेच, त्यासोबतच ऍडव्हान्स टॅक्स, सेविंग अकॉउंटवर मिळणारं व्याज, डिविडेंड, शेअर्सची खरेदी विक्री, FD वर मिळालेलं व्याज, GST आणि इतर माहिती असते. थोडक्यात, AIS हे करदात्याने केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचं कन्सॉलिडिटेड स्टेटमेंट आहे.

दर वर्षी ITR भरणं हे अतिशय महत्वाचं काम असतं.

ITR वेळेवर नाही भरला तर पेनल्टी लागू शकते. पण ITR भरून देखील पेनल्टी लागू शकते. असं होऊ नये यासाठी आपल्याला ITR भरायच्या आधी काही कागदपत्र तपासणं अत्यंत आवश्यक आहे. असं नाही केलं तर ITR भरताना चूक होऊ शकते, आणि टॅक्स बुडवण्याचा प्रयत्न केला म्हणून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस येऊ शकते. या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक महत्वाचा फॉर्म आहे AIS अर्थात एन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट. AIS म्हणजे काय, ITR भरताना त्याची काय गरज आहे आणि ITR भरताना काही चूक झाली तर ती कशी दुरुस्त करायची, ते आता जाणून घेऊया. IT डिपार्टमेंटने नोव्हेंबर 2021 मध्ये AIS म्हणजेच एन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली. हे एक महत्त्वाचं फायनान्शिअल डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये तुम्ही वर्षभरात केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे तपशील असतात. हा फॉर्म 26AS चं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. फॉर्म 26AS मध्ये तुम्ही वर्षभरात खरेदी केलेल्या कोणत्याही मालमत्तेचा तपशील आणि मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीचा तपशील, TDS आणि TCS या सगळ्याची माहिती असते. AIS मध्ये ही सर्व माहिती तर असतेच, त्यासोबतच ऍडव्हान्स टॅक्स, सेविंग अकॉउंटवर मिळणारं व्याज, डिविडेंड, शेअर्सची खरेदी विक्री, FD वर मिळालेलं व्याज, GST आणि इतर माहिती असते. थोडक्यात, AIS हे करदात्याने केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचं कन्सॉलिडिटेड स्टेटमेंट आहे.

 

AIS कुठून डाउनलोड करायचा, ते आता जाणून घेऊया.

आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करून AIS डाउनलोड करता येईल. यासाठी पॅन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावं लागेल. मेन्यूमध्ये तुम्हाला AIS चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर नवीन विंडो उघडेल, तिथे वर्ष निवडल्यावर AIS फॉर्म डाउनलोड करता येईल. तसेच, तुम्ही AIS अँपवरून हा फॉर्म डाउनलोड करू शकता. पण AIS फॉर्म का महत्वाचा आहे, ते आता जाणून घेऊया. आपण अनेक बँकांमध्ये अकॉउंट उघडतो. कोणत्या अकॉउंटवर किती व्याज मिळालं आहे, ते आपल्याला माहित नसतं. तसेच, एखादं अकॉउंट आपल्या वापरात नसेल आणि त्यात काही रक्कम असेल तर त्यावर व्याज जमा होतं. हे उत्पन्न ITR मध्ये डिक्लेअर केलं नाही तर इन्कम टॅक्स कडून नोटीस येऊ शकते. सेविंग अकॉउंट, FD, शेअर्स आणि म्युच्युअल फंडवर मिळालेला कॅपिटल गेन, डिविडेंड अश्या प्रकारचे सगळे इन्कम ITR मध्ये डिक्लेअर करावे लागतात. त्यामुळे, AIS आणि ITR मध्ये असणारी माहिती टॅली होणं गरजेचं आहे.

 

AIS मध्ये चुकीची माहिती असेल तर ती कशी दुरुस्त करायची, ते आता जाणून घेऊया.

तुम्हाला तुमच्या AIS मध्ये काही अनियमितता आढळली तर, तुम्ही त्यावर फीडबॅक देऊ शकता आणि ते दुरुस्त करून शकता. यासाठी तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करून AIS ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. एकदा तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला AIS आणि TIS असे 2 पर्याय दिसतील. AIS वर क्लिक केल्यावर, तुम्हाला 2 भाग दिसतील, A आणि B. तिथे चुकीची माहिती हा पर्याय निवडून तुमचा अभिप्राय सबमिट करू शकता. IT डिपार्टमेंट कदाचित पुरावा म्हणून काही कागदपत्र मागू शकतं. तुमचा दावा बरोबर असेल तर कागदपत्र तपासल्यावर IT डिपार्टमेंट AIS मध्ये दुरुस्ती करेल. ITR भरताना AIS फॉर्म बघणं का महत्वाचं आहे, ते आता तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे, आता ITR भरताना ITR आणि AIS टॅली करा, असं केल्यानं तुम्हाला IT डिपार्टमेंटकडून नोटीस येणार नाही आणि पेनल्टी भरावी लागणार नाही.

Published: December 22, 2023, 19:14 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App