देशावर प्रेम असेल तर गोल्ड बॉण्ड खरेदी करा !

सोन्यात मिळणारा रिटर्न, त्याच्यामध्ये असणारी लिक्विडीटी आणि महागाईवर मात करण्याची क्षमता यामुळे, बऱ्याच गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याचं महत्व पटलं आहे. मात्र, सोन्यातली गुंतवणूक आपल्यासाठी फायद्याची असली तरी आपल्या देशाचं त्यात नुकसान आहे. मोठ्या प्रमाणावर सोनं इम्पोर्ट केल्यामुळे भारताचं ट्रेड डेफिसिट वाढतं, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो आणि सबंध देशाला त्याची किंमत चुकवावी लागते.

सर्वात जास्त सोनं इम्पोर्ट करणाऱ्या देशांच्या यादीत भारत नेहमीच आघाडीवर असतो. सोन्यात केलेल्या गुंतवणुकीवर नेहमीच फायदा होतो, असं अनेक अनुभवी लोकं सांगतात. त्यामुळे, अक्षय त्रितिया, दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. असे अनेक गुंतवणूकदार आहेत जे केवळ सोन्यात गुंतवणूक करतात. महागाईवर मात करायची असेल तर महागाईच्या दरापेक्षा जास्त रिटर्न मिळाला पाहिजे. सोन्याने मागचे अनेक वर्ष सरासरी 10% रिटर्न दिला आहे आणि महागाईचा दर साधारण 6 ते 7% असतो, त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी महागाईवर सातत्याने मात केली आहे. सोन्यात मिळणारा रिटर्न, त्याच्यामध्ये असणारी लिक्विडीटी आणि महागाईवर मात करण्याची क्षमता यामुळे, बऱ्याच गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याचं महत्व पटलं आहे. मात्र, सोन्यातली गुंतवणूक आपल्यासाठी फायद्याची असली तरी आपल्या देशाचं त्यात नुकसान आहे. मोठ्या प्रमाणावर सोनं इम्पोर्ट केल्यामुळे भारताचं ट्रेड डेफिसिट वाढतं, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो आणि सबंध देशाला त्याची किंमत चुकवावी लागते.

आर्थिक वर्ष 2021 22 मध्ये भारताने 340 लाख कोटींचं सोनं इम्पोर्ट केलं. 2021 च्या तुलनेत यामध्ये तब्बल 35% वाढ झाली. आता विचार करा हाच पैसा भारतात राहिला असता, तर सरकारला पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक करता आली असती. हेल्थ, एज्युकेशन, इन्फ्रासारख्या सेगमेंटमध्ये हे भांडवल वापरलं गेलं असतं तर अनेक तरुणांना रोजगार मिळाला असता. लाखो स्टार्ट-अप उभे राहिले असते. लोकांचं उत्पन्न वाढलं असतं आणि त्याचा फायदा सगळ्या देशाला झाला असता. सांगण्याचा हेतू असा आहे कि आपण फिसिकल गोल्ड खरेदी करतो, त्यातून आपल्याला फायदा होतो पण देशाला त्याची किंमत चुकवावी लागते. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच नरेंद्र मोदी सरकारने 2015 मध्ये गोल्ड बॉण्ड स्कीम लॉन्च केली होती. लोकांना गोल्ड बॉण्ड खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने, अतिरिक्त अडीच टक्के व्याज आणि मॅच्युरिटीपर्यंत बॉण्ड होल्ड केले तर पूर्ण कॅपिटल गेन टॅक्स फ्री असे फायदे दिले आहेत. या सगळ्याचा हिशोब केला तर फिसिकल गोल्डपेक्षा गोल्ड बॉण्डवर दर वर्षी साधारण 4% जास्त रिटर्न मिळतो. आपला फायदा तर होतोच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशाचं इम्पोर्ट बिल कमी होतं. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास, तुम्हाला ज्या वेळेला सोनं वापरायचं असेल तेव्हाच फिसिकल गोल्ड खरेदी करा. मुलांच्या लग्नासाठी सोनं खरेदी करत असाल, पण मुलं लहान असतील आणि त्यांच्या लग्नासाठी 10 15 किंवा 20 वर्षाचा अवधी असेल तर आत्ताच फिसिकल गोल्ड खरेदी करून ठेऊ नका. सध्या गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करा, त्यावर फिसिकल गोल्डपेक्षा जास्त रिटर्न मिळवा आणि ज्या वेळेला आवश्यकता असेल तेव्हाच फिसिकल गोल्ड खरेदी करा. यामुळे, आपला आणि आपल्या देशाचा नक्कीच फायदा होईल.

Published: January 2, 2024, 13:38 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App