राजकीय पक्षांना देणगी देऊन कर चुकवण्याचा प्रयत्न?

अज्ञात राजकीय पक्षांना देणगी देऊन कर चुकवण्याचा हा खेळ कसा चालू आहे आणि त्यावर IT डिपार्टमेंटची काय प्रतिक्रिया आहे, ते जाणून घेऊया. आयकर विभागाने अश्या करदात्यांना नोटिसा बजावल्या आहेत, ज्यांनी नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना देणगी दिली आहे. या नोटिसा 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

लहान राजकीय पक्षांना देणगी देऊन कर चुकवण्याचा प्रयत्न केला म्हणून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी अनेक करदात्यांवर आणि कंपन्यांवर कारवाई चालू केली आहे. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या आरोपाखाली आतापर्यंत जवळपास 5000 नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत… यामध्ये वैयक्तिक करदाते आणि कंपन्यांचा समावेश आहे… येत्या काही दिवसांत आणखी करदात्यांना अश्या प्रकारच्या नोटिस मिळू शकतात… अज्ञात राजकीय पक्षांना देणगी देऊन कर चुकवण्याचा हा खेळ कसा चालू आहे आणि त्यावर IT डिपार्टमेंटची काय प्रतिक्रिया आहे, ते जाणून घेऊया…. आयकर विभागाने अश्या करदात्यांना नोटिसा बजावल्या आहेत, ज्यांनी नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना देणगी दिली आहे… या नोटिसा 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी पाठवण्यात आल्या आहेत… लहान आणि अज्ञात पक्षांना दिलेल्या या देणग्या करचोरी आणि मनी लाँड्रिंगसाठी आहेत का, असा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला संशय आहे. आयकर विभागाच्या रडारवर असे अनेक करदाते आहेत, ज्यांनी किमान 20 राजकीय पक्षांना देणगी दिली आहे… हे राजकीय पक्ष नोंदणीकृत आहेत, परंतु त्यांना निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळालेली नाही… मान्यता नसलेले पक्ष म्हणजे ज्या पक्षांनी विधानसभेच्या किंवा राष्ट्रीय निवडणुका लढवल्या नाहीत किंवा निवडणुकीत त्यांना ठराविक टक्के मतं मिळाले नाहीत…

आयकर कायद्याच्या कलम 80GGC नुसार राजकीय पक्षांना देणगी देऊन टॅक्स बेनिफिट मिळवता येतो… या तरतुदीनुसार, एखाद्या व्यक्तीने राजकीय पक्ष किंवा निवडणूक ट्रस्टला देणगी दिल्यास, तो देणगीच्या 100 टक्के कपातीचा दावा करू शकतो… सेक्शन 80 GGB नुसार कंपन्यांना अश्या प्रकारची देणगी देऊन टॅक्स बेनिफिट मिळवण्याचा अधिकार आहे. आता तुमच्या मनात असा विचार येईल यामध्ये बेकायदेशीर काय आहे. मात्र, या करदात्यांची एकूण कमाई आणि त्यांनी दिलेली देणगी याचा विचार केला तर संशयाला जागा आहे. एखादी व्यक्ती 100 रुपये कमवत असेल आणि त्यापैकी 70 ते 80 रुपये देणगी देत असेल तर याचा अर्थ ही देणगी कर चुकवण्यासाठी देण्यात आली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. राजकीय पक्षांना देणगी द्यायची आणि त्यांच्याकडून हेच पैसे कॅश स्वरूपात परत घ्यायचे, असा प्रकार चालू असल्याचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला संशय आहे. याला आपण बोगस देणगी म्हणू शकतो. समजा एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपये कमावले आणि त्यापैकी 10 किंवा 20% रकमेची देणगी देऊन टॅक्स बेनिफिट मिळवला तर त्यात संशय येण्यासारखं काहीच नाही. मात्र, तीच व्यक्ती 10 लाख रुपये कमवून 8 लाख रुपये देणगी देत असेल आणि त्यावर टॅक्स बेनिफिट मिळवत असेल तर नक्कीच काही तरी गडबड आहे.

राजकीय पक्षांना देणगी देऊन टॅक्स बेनिफिट मिळवायचा असेल तर काही अटी आहेत. ज्या राजकीय पक्षाला आपण देणगी देतोय तो पक्ष लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 29A अंतर्गत नोंदणीकृत असला पाहिजे. तसेच, कोणतीही देणगी कॅश स्वरूपात देता येत नाही. जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला बोगस देणगी संदर्भात संशय आला तर ते या देणग्यांची सत्यता पडताळण्यासाठी पुराव्यांची मागणी करू शकतात. यामध्ये काही अनियमितता आहे, असं लक्षात आलं तर करदात्याला त्याच्या टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल. तसेच, त्याच्यावर कठोर कारवाईदेखील होऊ शकते. म्हणूनच, राजकीय पक्षाला देणगी देताना, करदात्यांनी त्यांचं नोंदणी प्रमाणपत्र तपासावं… यावरून राजकीय पक्षाची नोंदणी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 29A अंतर्गत झाली आहे का नाही ते लक्षात येईल. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर नोंदणीची पडताळणी करता येईल. तसेच, राजकीय पक्षाच्या पॅन कार्डची तपासणी करा. कोणतीही देणगी कॅश स्वरूपात देऊ नका. दिलेल्या प्रत्येक देणगीचं तुमच्याकडे रेकॉर्ड ठेवा. देणगी दिल्यावर पूर्ण रकमेची रिसीट राजकीय पक्षाकडून घ्यायला विसरू नका. ही काळजी नाही घेतली तर देणगी देऊन आपल्यालाच मनस्तापाला सामोरं जावं लागेल.

Published: March 6, 2024, 18:36 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App