पैसा काय बोलतो ?

  • पेमेंटसाठी डेबिट कार्डचा वापर कमी होतोय

    डेबिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची संख्या सातत्याने कमी होतीये. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये हा आकडा ४ बिलियन होता. २०२२ आणि २०२३ हा आकडा अनुक्रमे ३.९ बिलियन आणि ३.४ बिलियनपर्यंत खाली आला आहे. याउलट, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये UPI च्या माध्यमातून ८३.८ बिलियन व्यवहार झाले आहेत.

  • FIIs ची भारतीय शेअर बाजाराला पसंती

    मे महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी केली आहे. केवळ १ महिन्यात FIIs नी ४३,८३८ कोटींचे शेअर्स खरेदी केले आहेत. हा मागच्या ९ महिन्यातला उच्चांकी आकडा आहे. विदेशी गुंतवणूकदार मागच्या ३ महिन्यांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. मात्र, मे २०२३ चा खरेदीचा आकडा ऑगस्ट २०२२ नंतरचा सर्वाधिक आकडा आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी ५१,२०४ कोटींचे शेअर्स खरेदी केले होते.