दरडोई विमा हप्ता 52 डॉलरवरून 92 डॉलरवर

भारतानं विमा क्षेत्रात परकीय भांडवलाचे नियम शिथिल केल्यानंतर गेल्या नऊ वर्षांमध्ये 54 हजार कोटी रूपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे,अशी माहिती केंद्रीय वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी दिलीय. 2014 मध्ये विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26 टक्के होती, 2015 मध्ये 49 टक्के होती तर 2021 मध्ये 74 टक्के करण्यात आली

दरडोई विमा हप्ता 52 डॉलरवरून 92 डॉलरवर

विमा क्षेत्रात 54 हजार कोटींची परकीय गुंतवणूक 

गुंतवणुकीमुळे विम्याचा विस्तार वाढला

विमा कंपन्यांच्या एयूएममध्येही वाढ 

विमा हप्त्याच्या संकलनातही वाढ

विमा क्षेत्रात थेट परकीय भांडवलाचे म्हणजेच एफडीआयला दार खुलं केल्यानंतर विमा क्षेत्रात भांडवलाचा ओघ वाढत चालला आहे. भारतानं विमा क्षेत्रात परकीय भांडवलाचे नियम शिथिल केल्यानंतर गेल्या नऊ वर्षांमध्ये 54 हजार कोटी रूपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे,अशी माहिती केंद्रीय वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी दिलीय.

थेट परकीय गुंतवणुकीमुुळे विमा कंपन्यांच्या संख्येत वाढ

2014 मध्ये विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26 टक्के होती, 2015 मध्ये 49 टक्के होती तर 2021 मध्ये 74 टक्के करण्यात आली. तर विमा क्षेत्रातील मध्यस्थ सेवा कंपन्यांसाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 2019 मध्ये शंभर टक्क्यांवर नेण्यात आलीय. त्यामुळे डिसेंबर 2014 ते जानेवारी 2024 या कालावधीत विमा कंपन्यांमध्ये 53 हजार 900 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली. तसेच या कालावधीत विमा क्षेत्रातील कंपन्यांची संख्या 53 वरून वाढून 70 वर गेली,अशी माहिती जोशी यांनी दिली आहे.

विमा क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत म्हणजेच AUM तिप्पटीने वाढला

तसेच विमा क्षेत्राचा प्रसार सकल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजेच जीडीपीच्या तुलनेत विमा हप्त्यांच्या संकलनाचे प्रमाण 2013-14 मध्ये 3.9 टक्के होते,ते प्रमाणही 2022-23 मध्ये चार टक्क्यांवर पोहचले. तसेच याच कालावधीत दरडोई विमा हप्ता 52 डॉलरवरून 92 डॉलरवर पोहचलाय. तर विमा क्षेत्राच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ही तिपप्टीनं वाढून 21.07 लाख कोटींहून 60 लाख कोटींवर पोहचलीय.

Published: March 19, 2024, 15:05 IST