अवयवदानासाठी विमा कवच किती महत्वाचा ?

अवयवदान केल्यानंतर विमाधारकांनी क्रिटकल इलनेस रायडर घ्यावा असा सल्ला विमा तज्ज्ञांनी दिलाय.

  • Team Money9
  • Last Updated : January 31, 2024, 12:12 IST
अवयवदानासाठी विमा कवच किती महत्वाचा ?

वाणीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात. तात्काळ किडनी प्रत्यारोपण करावं लागणार आहे. किडनी दान करण्यास वाणीची मुलगी तयार होती. दुर्दैवानं दोघांच्याही आरोग्य विम्यात किडनीदात्याचा उपचारा खर्च आरोग्य विम्यात कव्हर होत नव्हता. अखेर कोणताही पर्याय नसल्यानं वाणीला स्वत:च्या खिशातूनच किडनी प्रत्यारोपणाचा खर्च करावा लागला.

भारतात दहा लाख लोकांपैकी फक्त 0.86 टक्के लोकंच अवयवदान करतात. जगात सर्वात कमी अवयवदान करणाऱ्या देशाच्या यादीमध्ये भारताचेही नाव आहे. 2023 पर्यंत भारतात अवयवाची गरज असणाऱ्या लोकांची संख्या पाच लाखांहून जा्त आहे. वेळेवर अवयव न मिळाल्यानं भारतात दर वीस मिनिटाला एकाचा मृत्यू होतोय.

अवयवदानाची प्रक्रिया खर्चिक असल्यानं कुटुंबावर खर्चाचा ताण पडतो. खासगी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी जवळपास 15 लाख रुपयांचा खर्च होतो. हृदयरोपणासाठी 30 लाख, तर यकृतासाठी 25 लाख रुपयांचा खर्च होतो.

मात्र,सध्या उपलब्ध असलेल्या अवयवरोपण कव्हर करणारे फारसे विमा नाहीत. सध्याच्या आरोग्य विम्यात अवयव दाता आणि याचक या दोघांसाठी आर्थिक संरक्षण खूप कमी आहे. आता वाणीचंच उदाहरण पाहूयात. वाणीच्या आरोग्य विम्यात तिचं सर्जरी,डायग्नोस्टिक चाचण्या आणि इतर उपचारांवर होणारा खर्च कव्हर होतो. हा खर्च सम इंश्योर्डनुसार कव्हर होतो. मात्र,पॉलिसीमध्ये अवयवदात्याच्या उपचाराचा खर्चाचा समावेश नाही. अवयव दात्याचा वैद्यकीय खर्च याचकाच्या अंगावर पडतो.

वाणीच्या प्रकरणात तिची मुलगी अवयवदान करणार आहे. तिच्याकडेही आरोग्य विमा आहे. मात्र, त्या विम्यातही अवयवदात्याच्या उपचारासाठी खर्चाची तरतूद नाही. अवयवदान केल्यानंतर दात्याची तब्डेत बिघडल्यास याचकाला खर्चाचा भार सोसावा लागतो.

बहुतांशवेळी अवयवदात्याकडे आणि याचकाकडे आधीपासूनच एखादा आरोग्य विमा नसल्यास अवयवदानानंतर आरोग्य विमा मिळणं अवघड जातं. ऑपरेननंतर दोघंही विम्यासाठी दावा करून शकतात त्यामुळे विमा कंपन्या कव्हर वाढवण्यास नकार देतात. एखाद्या वेळी विम्याचे कव्हर जरी मिळालं तरीही अनेक अटी लादल्या जातात. या अटींमध्ये दान केलेल्या अवयवला वगळल्या जातं. हप्तात वाढ केली जाते आणि तसंच प्रतिक्षा कालावधीत देखील वाढ करण्यात येते.

आरोग्य विम्याची निवड करताना अवयव दानाच्या अटी शर्थी नीट समजून घ्या आणि त्यानंतर आरोग्य विम्याची खरेदी करा,असा सल्ला Go Digit General Insurance चे प्रॉडक्ट हेड अंशुल बोहरा यांनी सल्ला दिलाय. अवयवदानाची प्रकरणं क्विचितच असतात. मात्र,अवयवदानाचा खर्च मोठा असल्यानं अवयवदानाचा कव्हर पॉलिसीमध्ये असणं आवश्यक आहे. अवयदान हे अतिरिक्त कव्हर म्हणूनही घेता येतं. तसेच यासाठी प्रतिक्षा कालावधी असतो, सब-लिमिट,को-पेमेंट किंवा अवयवदानाच्या विविध खर्चाबाबत काही मर्यादाही असू शकतात अशी माहितीही बोहरा यांनी दिलीय.

अवयवदान केल्यानंतर विमा कंपनी विमा नूतनीकरण करण्यास नकार देऊ शकत नाही,असे स्पष्ट निर्देश इरडानं दिलेत. मात्र,विमा नूतनीकरण करताना तुम्ही सत्य परिस्थितीची माहिती विमा कंपनीला द्यावी. तुम्ही माहिती न देता विम्याचं नूतनीकरण केल्यास पॉलिसी रद्दही होऊ शकते.

अवयवदान केल्यानंतर विमाधारकांनी क्रिटकल इलनेस रायडर घ्वावा,असा सल्ला विमा तज्ज्ञांनी दिलाय. विविध 12 गंभीर आजारांवर विम्याचं कवच मिळतं,असं इरडानं माहिती दिलीय. यात अववयदानाचाही समावेश आहे.

उदाहरणार्थ मॅक्स लाईफ क्रिटीकल इलनेस आणि डिसेबेलिटी रायडच्या प्लॅटिनम योजनेत विविध 64 गंभीर आजाराला विम्याचे कवच मिळतं. या विम्यात अवयवदान, बोन मॅरोचा समावेश आहे. हा रायडर घेतल्यास एक लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत विमा मिळतो. रायडर घेतल्यानंतर अवयवदानाला विमा मिळतो. त्यामुळे विम्याचा हप्ता हा सम इंश्योर्ड,पॉलिसीचा कालावधी, वय, सध्याचं आरोग्य,लिंग आणि विमा कंपनीवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ Manipal Cigna च्या lifestyle protection critical care च्या enhanced cover मध्ये 30 गंभीर आजारांना विम्याचे संरक्षण मिळते. 40 वर्षाच्या महिलेनं एक कोटी रुपयाचं सम इंश्योर्ड घेतल्यास तिला 69,000 हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागतो. तर पुरूषाला एक कोटीच्या सम इश्योर्डसाठी 62,700 रुपयांचा हप्ता भरावा लागतो.

आरोग्य विमा घेताना कोणत्या आजारांसाठी विमा आहे आणि कोणत्याला नाही हे पाहा. तुम्ही तुमच्या मूळ पॉलिसीमध्ये एखादा क्रटिकल इलनेस रायडर अवश्य घ्या. त्यामुळे दुर्देवानं अवयवदानाची वेळ ओढावल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसणार नाही.

Published: January 27, 2024, 12:54 IST