घेतलेली विमा पॉलिसी चुकीची आहे ? आता काय कराल ?

विमा कंपन्यांचे एजन्ट,ब्रोकर आणि कर्मचारी विक्रीचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि कमिशनच्या लालसेपोटी चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकतात.

  • Team Money9
  • Last Updated : January 22, 2024, 15:17 IST
घेतलेली विमा पॉलिसी चुकीची आहे ? आता काय कराल ?

आकर्षक ऑफर देऊन विम्याची कुणी विक्री करत असल्यास थोडं सावध व्हा आणि विमा एजन्टला दोन, चार प्रश्न अवश्य विचारा. प्रश्न विचारल्यानंतर विमा एजन्ट पॉलिसीऐवजी दुसऱ्याच गोष्टीवर बोलायला सुरूवात करतो. चुकीचे वैशिष्टै सांगून किंवा ऑफरचं लालूच दाखवून विमा विकण्याला मिस-सेलिंग असे म्हणतात. विमा क्षेत्र खुलं करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्या आल्यानं विमा विक्रीची स्पर्धा वाढझलीय. या स्पर्धेमुळे गोड गोड बोलून मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीनं विमा पॉलिसीची विक्री करण्यात येतेय.

2022-23 या वर्षात विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच इरडाकडे विमा कंपनीच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्यात. या तक्रारीमध्ये एकूण तक्रारीच्या दहा टक्के म्हणजेच जवळपास 26 हजार 107 तक्रारी या चुकीच्या पद्धतीनं पॉलिसी विकण्याबाबत होत्या. खोटं बोलून विमा एजन्टने पॉलिसी विकल्या आहेत. उदाहरणार्थ विमा एजन्ट पॉलिसी विकत घेतल्यानंतर कॅशबॅक,बोनस किंवा कर्ज यासारख्या सुविधा मिळणार असल्याचं सांगतो. त्यासोबतच विम्याचे वैशिष्टे सांगत नाही म्हणजेच विम्याचे कव्हर, जोखिमेबाबत अर्धवट माहिती देतो यालाच मिस-सेलिंग म्हणतात.

2022-23 या वर्षात सरकारी विमा कंपन्यांच्या विरोधात एकूण 81 हजार 494 तक्रारी प्राप्त झाल्यात. यापैकी जवळपास साडेतीन टक्के म्हणजेच 2978 टक्के अयोग्य व्यायवसायिक पद्धती संदर्भात होत्या. तर दुसरीकडे खासगी विमा कंपन्यांच्या विरोधात जवळपास पन्नास टक्के म्हणजेच 45 हजार 884 तक्रारी दाखल केल्यात. या दाखल तक्रारीपैकी 23,129 तक्रारी या अयोग्य व्यावसायिक पद्धती संदर्भात होत्या म्हणजेच चुकीची माहिती देऊन विमा पॉलिसींची विक्री करण्यात आली होती.

कोणतीही विमा कंपनी चुकीची माहिती देऊन पॉलिसीची विक्री केलीय हे मान्य करणार नाही. विमा कंपन्यांचे एजन्ट,ब्रोकर आणि कर्मचारी विक्रीचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि कमिशनच्या लालसेपोटी चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकतात. एवढेच नव्हे तर अनेक बँका देखील चुकीची माहिती देऊन विमा पॉलिसी विकतात. बँका शाखा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी विक्रीचा दबाव आणतात तसेच त्यांना मोठ्या कमिशनचंही लालूच दाखवण्यात येतं.

विमा विकताना जास्त परताव्याचं आश्वासन देण्यात येतं. विम्याचे कवचही मिळतंय आणि चांगला परतावाही मिळतोय त्या्मुळे अनेक नागरिक मिस-सेलिंगला बळी पडतात. गारंटिड रिटर्न देणारा विमा असो की एन्युटी प्लान कोणत्या विम्यातून चार ते पाच टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळत नाही. मात्र,हा परतावा एवढा वाढवून सांगितला जातो. तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता.विमा घेतल्यानंतर स्वस्तात कर्ज मिळेल असं आश्वासन देण्यात येतं. तुम्ही विमा घ्या,आम्ही तुम्हाला कमी व्याज दरात पर्सलन लोन मंजूर करून देऊ असं आश्वासन अनेक विमा एजन्ट देत असतात. विमा एजन्टला कर्ज देण्याचा कोणताही अधिकार नसतो. कर्ज मंजूर करण्याचे अधिकार बँकेचा असतो. हे कायम लक्षात ठेवा

विमा एजन्टसोबत अनेक बँका या विम्याचे कार्पोरेट एजन्ट आहेत. त्यामुळे बँकासुद्धा कधी लॉकरच्या नावाखाली किंवा गृहकर्ज मंजूर करताना विमा घेणं बंधनकारक आहे असं सांगत पॉलिसी ग्राहकांच्या माथी मारतात. एवढंच नव्हे तर एफडीची मुदत संपली असल्यास फोन करून चांगला रिटर्न देणारी योजना आहे असं सांगून ULIP योजना गळ्यात घालतात. तक्रारीची संख्या कमी करण्यासाठी विमा पॉलिसीची विक्री करताना एजन्य आणि ग्राहकांचं संभाषण असणारी ध्वनीफित किंवा चित्रफित असावी असा प्रस्ताव ग्राहक मंत्रालयानं विमा कंपन्यांना दिलेत.

ऑडिओ,व्हिडीओचा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी. तुमच्याही गळ्यात चुकीची पॉलिसी टाकली असल्यास सुरूवातीला कंपनीकडे लिखित तक्रार दाखल करा. कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे संपर्क करा. तक्रारीचं निवारण 15 दिवसाच्या आत न झाल्यास इरडाकडे तक्रार दाखल करा. इरडाच्या वेबसाईटवर जाऊन बिमाभरोसा पर्यायावर क्लिक करून तक्रार दाखल करता येते. तसेच
Complaints@irdai.gov.in या मेल आयडीवर मेल पाठवूनही तक्रार दाखल करा. किंवा इरडाचा टोल फ्री नंबर   155255 किंवा 1800 4254 732 संपर्क करा.

डोळे झाकून विमा पॉलिसी खरेदी करू नका. अन्यथा नको असलेली पॉलिसी तुमच्या गळ्यात पडते. विम्यातील सर्व वैशिष्टे समजल्यानंतर पॉलिसी खरेदी करा. एजन्टवर अतिविश्वास ठेऊ नका. एजन्टकडून सर्व दावे लिखित स्वरूपात मागा. त्यानंतर एजन्ट जे दावे करत आहे ते पॉलिसीच्या कागदपत्रांमध्ये कुठं नमूद करण्यात आलंय ते दाखवायला सांगा. जास्त परताव्या देणाऱ्या विम्यावर विश्वास ठेऊ नका. विमा हा गुंतवणुकीसाठी नसतो तर जोखिम कमी करण्यासाठी असतो एवढं कायम लक्षात ठेवा.

Published: January 22, 2024, 11:47 IST