नवी म्युच्युअल फंडातर्फे नवी निफ्टी आयटी इंडेक्स फंडाचा शुभारंभ

नवीचा निफ्टी आयटी इंडेक्स फंड निफ्टी आयटी इंडेक्सच्या कामगिरीनुरूप आपली वाटचाल करत जाणार आहे. हा फंड भारतातील अग्रणी आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणार आहे. फंडाचा एनएफओ 11 मार्च 2024 रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला असून येत्या 22 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. गुंतवणूकदार अवघ्या 10 च्या गुंतवणूकीपासून नवीन फंडात सहभागी होऊ शकतात.

desktop

 

अगदी दहा रुपयांपासून गुंतवणुक करता येणार

~ एनएफओचा 11 मार्च 2024 पासून शुभारंभ, 22 मार्च 2024 ला बंद होणार~

नवीन फंडाची ठळक वैशिष्ट्येः

 

● मुदतमूक्त श्रेणीतील इंडेक्स योजना प्रामुख्याने निफ्टी आयटी इंडेक्सआधारे वाटचाल करत राहणार

● गुंतवणुकदारांना भारतातील अग्रणी आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार

● एनएफओचा शुभारंभ 11 मार्च 2024 ला झाला असून 22 मार्च 2024 ला बंद होणार आहे.

● सर्व आयटी इंडेक्स फंडात सर्वाधिक कमी खर्च, थेट योजनेसाठी अवघे 0.22 टक्के टीईआर गुणोत्तर

● गुंतवणुकीची रक्कम अगदी दहा रुपयांपासून सुरू होते

नवी म्युच्युअल फंडा (“Navi MF”) ने नवी निफ्टी आयटी इंडेक्स फंड हा मुदतमूक्त श्रेणीतील इंडेक्स फंड गुंतवणूकदारांसाठी आणला आहे. निफ्टी आयटी इंडेक्सच्या आधारे हा फंड आपली वाटचाल करत जाणार आहे.

निफ्टी आयटी इंडेक्समध्ये भारतातील दिग्गज आयटी कंपन्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईवर सूचीबद्ध केलेल्या या कंपन्यांच्या तरल बाजार मूल्यावर हा निर्देशांक आधारलेला आहे. यामध्ये इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रोसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. नवीचा निफ्टी आयटी इंडेक्स फंड निफ्टी आयटी इंडेक्सच्या कामगिरीनुरूप आपली वाटचाल करत जाणार आहे. हा फंड भारतातील अग्रणी आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणार आहे. फंडाचा एनएफओ 11 मार्च 2024 रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला असून येत्या 22 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. गुंतवणूकदार अवघ्या 10 च्या गुंतवणूकीपासून नवीन फंडात सहभागी होऊ शकतात.

बाजारात सध्या कार्यरत असलेल्या सर्व आयटी इंडेक्स फंडात नवी निफ्टी आयटी इंडेक्स फंडाचा टोटल एक्सस्पेन्स रेशो(टीईआर) अर्थात एकूण देखभाल खर्च गुणोत्तर सर्वाधिक अल्प आहे. या फंडाच्या थेट (डायरेक्ट) योजनेचा टीईआ अवघा 0.22 टक्के इतका आहे. अॅम्फीच्या 29 फेब्रुवारी 2024 च्या आकडेवारीनुसार, आयटी इंडेक्स फंडाचा सरासरी टीईआर 0.34 टक्के आहे.

नवीन फंडाबाबत माहिती देताना नवीचे प्रवक्ते म्हणाले, “नवी निफ्टी आयटी इंडेक्स फंड सादर करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या फंडाव्दारे आम्ही या क्षेत्रात प्रथमच पदार्पण करत आहोत. कार्यक्षमतेबाबत वचनबध्दता राखताना, या फंडासाठी आम्ही अतिशय कमी टीईआर गुणोत्तर ठेवले आहे. त्यामुळे आमचे गुंतवणूकदार देशातील अग्रणी आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक सक्षम राहतीलच, तसेच या क्षेत्राच्या दीर्घकालीन वाढीत सहभाग कायम राहत त्यांना अधिकाधिक परतावा प्राप्त करणे शक्य होईल, याची आम्ही खात्री घेतो.”

निफ्टी आयटी निर्देशांकाने 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत चक्रवाढ (सीएजीआर) पध्दतीने 29.48 टक्के (एक वर्षातील कामगिरी), 21.49 टक्के (पाच वर्षातील कामगिरी), 16.06 टक्के (दहा वर्षातील कागिरी) आणि 23.37 टक्के (15 वर्षातील कामगिरी) परतावा मिळवून दिलेला आहे. गेल्या 12 वर्षांपैकी 10 वर्षांत निफ्टी आयटी निर्देशांकाने निफ्टी फिफ्टी निर्देशांकापेक्षाही सरस कामगिरी केलेली आहे. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत, निफ्टी आयटी निर्देशांकातील काही प्रमुख घटकांमध्ये इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, विप्रो आणि एलटी माईंडट्रीसारख्या दिग्गज आयटी कंपन्या समाविष्ट आहेत.

 

Published: March 18, 2024, 12:10 IST