पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडातर्फे पीजीआयएम इंडिया रिटायरमेंट फंड

गुंतवणूकदारांना सेवानिवृत्ती उद्दिष्टांच्या अनुषंगाने समभाग, समभागाशी संबंधित पर्याय, रिटस् (REITs) आणि इनव्हीट्स (InvITs) तसेच निश्चित उत्पन्न रोखे यांचा समावेश असलेल्या विविध साधनांत एकत्रितपणे गुंतवणूक करून भांडवल वृध्दी आणि उत्पन्न मिळवून देणे, हे या फंडाचे उद्दिष्ट आहे.

पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडातर्फे पीजीआयएम इंडिया रिटायरमेंट फंड

Ø  पीजीआयएम इंडिया रिटायरमेंट फंड गुंतवणूकीसाठी 26 मार्च 2024 ला खुला आणि 9 एप्रिल 2024 ला बंद होणार

Ø  पीजीआयएम इंडिया रिटायरमेंट फंडासाठी एस अॅण्ड पी बीएसई 500 निर्देशांक हा आधारभूत निर्देशांक राहणार

Ø  फंडातील किमान 25 टक्के रक्कम शेअरबाजारात अनुक्रमे लार्ज कॅपमिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये गुंतविली जाणार

 

मुंबई, 26 मार्च 2024ः वाढते आयुष्यमानआरोग्याचा वाढता खर्च आणि महागाईमुळे आयुष्याच्या सुरवातीलाच निवृत्तीपश्चात वयोमानासाठी आगाऊ बचत करणे गरजेचे झालेले आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या उद्दिष्टांसाठी शक्य तितक्या लवकर बचत आणि गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. बचत करण्याच्या काळात म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून निवृत्तीसाठीच्या पर्यायाकरिता समभागांध्ये गुंतवणूक केल्याचे दोन लाभ आहेत. पहिला लाभ म्हणजे दीर्घ मुदतीत समभाग गुंतवणूकीआधारे महागाईवर मात करण्याचा संभाव्य लाभ मिळविणे आणि दुसरा लाभ म्हणजे फंड आधारित ‘निवृत्ती’ रुपी नियोजनातून आपली विशिष्ट उद्दीष्टे साध्य करणेज्याला गुंतवणूक तज्ज्ञ ‘मेंटल अकाऊंटींग’ असे संबोधतात.

 

पीजीआयएम इंडिया म्युच्यूअल फंडाने पीजीआयएम इंडिया रिटायरमेंट फंड ही मुदतमुक्त श्रेणीतील योजना गुंतवणूकदारांसाठी आणत असल्याची घोषणा आज केली आहे. या फंडासाठी गुंतवणूकीसाठी पाच वर्ष कालावधीची (लॉक-इन) अट आहे अथवा निवृत्तीच्या 60 वर्षापर्यंत गुंतवणूक केली जाणार आहे. यातील जी मुदत प्रथम पुर्ण होईल तोपर्यंत या योजनेत गुंतवणूक राहणार आहे.

गुंतवणूकदारांना सेवानिवृत्ती उद्दिष्टांच्या अनुषंगाने समभागसमभागाशी संबंधित पर्यायरिटस् (REITs) आणि इनव्हीट्स (InvITs) तसेच निश्चित उत्पन्न रोखे यांचा समावेश असलेल्या विविध साधनांत एकत्रितपणे गुंतवणूक करून भांडवल वृध्दी आणि उत्पन्न मिळवून देणेहे या फंडाचे उद्दिष्ट आहे.

 

निवृत्तीसाठीच्या नियोजनासाठी आगाऊ बचत आणि गुंतवणूकीचे महत्व स्पष्ट करताना पीजीआयएम इंडिया अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ अजित मेनन म्हणाले, “दीर्घ काळ जगणे ही निवृत्तीसाठी कमी जोखीम आहे आणि प्रत्येकजण पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न करत असतो. घरशिक्षणकार यासारखी आपली जीवनातील बरीचशी उद्दिष्टे पारंपारिक कर्जाने पूर्ण होऊ शकतातपरंतु जेव्हा सेवानिवृत्तीचा विचार केला जातो तेव्हा आपण कर्जरुपी निधी उभारुन ही गरज पूर्ण करू शकत नाही. अशा प्रकारे आपल्या सेवानिवृत्तीपश्चात आयुष्यासाठी निधी उभारणीला प्राधान्य देणे प्रत्येकासाठी आवश्यक कर्तव्य आहे. उद्दीष्ट आधारित पध्दतीने गुंतवणूक नियोजनासाठी विश्वासार्ह आर्थिक सल्लागाराची मदत घेणे केव्हाही श्रेयस्कर आहे. सेवानिवृत्तीसाठी समर्पित केलेल्या फंडासाठी नियमित गुंतवणूक करत गेल्याने ध्येयाप्रती दीर्घकाळ वचनबद्ध राहण्यास आणि दीर्घकालीन चक्रवाढीचा फायदा मिळण्यास मदत होते.”

 

Published: April 4, 2024, 15:11 IST